मुंबई -जसजसे मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तशी निवडणुकीतील प्रचाराची रंगत वाढत आहे. राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. काहीसा असाच प्रकार बुधवारी भल्या पहाटे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात पाहायला भेटला. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अनंत (बाळा) नर यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या समर्थकांकडून महिलांवर मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला.
शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, "जोगेश्वरी पूर्व येथील उबाठा पक्षाचे उमेदवार बाळा नर यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिलांवर हल्ला केला. त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कपडे फाडले. नखानं त्यांना मारण्यात आलं आहे. आमच्या महिला भगिनींची गाडीसुद्धा त्यांनी फोडली. घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक होते. हे सर्व काय आहे? ही कशा पद्धतीची गुंडागर्दी आहे? हे कशासाठी करत आहेत. कारण, हार होणार असल्याचं त्यांना माहित आहे. निवडणूक ते पूर्वीच हरले आहेत. त्यांना एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रमध्ये शांत पद्धतीनं निवडणुकीचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये बाधा निर्माण करायची आहे."
निषेध… निषेध… निषेध !!! जोगेश्वरी मधील उबाठाचे उमेदवार बाळा नर यांनी सुमारे १००ते २०० हुल्लडबाजांच्या मदतीने वाहनांवर दगडफेक करून मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला … शिवसैनिक महिलांचा विनयभंग केला.. त्यांना धक्काबुक्की केली…शिवसेना उमेदवार मनीषाताई वायकर यांच्या… pic.twitter.com/FlmY0ghTTG
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) November 12, 2024
महिलांवर हात उचलले?- शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांमध्ये जबाब नोंदवायचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहितीसुद्धा शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. "उबाठा लोकांनी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व विचार सोडले आहेत. बाळासाहेब, आम्हा महिलांना रणरागिणी म्हणायचे. त्या महिलांवर हात उचलले आहेत. मी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना विचारू इच्छिते की, हे काय सुरू आहे. तुमचे लोकं हे काय करत आहेत? रात्री-अपरात्री तुमचे लोक भीतीचं वातावरण का निर्माण करू इच्छितात?" असा प्रश्नही शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
As we tried opposing the violation of code of conduct theirs goons pelted stones from Matoshri Club, Jogeshwari East
— ShivsenaUBT Jogeshwari शिवसेना जोगेश्वरी विधानसभा (@Sena_Jogeshwari) November 12, 2024
Requesting you to take a strict action against such unconstitutional and shameful act.@AUThackeray @SardesaiVarun @DurgeSainath @rautsanjay61 @advanilparab pic.twitter.com/sU2d9bTHJc
आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप- शिवेसेनेनं (उद्धव ठाकरे) जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात आचारसंहिता भंग होत असल्याचा आरोप केला. शिवसेनेनं (उबाठा) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, "आचारसंहिता भंग होत असताना आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या गुंडांनी जोगेश्वरी पूर्व येथील मातोश्री क्लबवर दगडफेक केली. अशा घटनाबाह्य आणि लाजिरवाण्या कृतीवर कठोर कारवाई करावी ही विनंती."
तिथे महिला कार्यकर्त्याचं नव्हत्या- या प्रकरणावर बोलताना जोगेश्वरी पूर्वचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार बाळा नर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, "शीतल म्हात्रे यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, त्या दरम्यान तिथे महिला कार्यकर्त्याच नव्हत्या. आम्ही कुठल्याही महिलेला अशा पद्धतीची वागणूक दिली नाही. ते आमच्या रक्तातच नाही. व्हिडिओमध्ये बांबू फेकण्यात आले आहेत, असे दिसते. ते बाहेरून फेकले गेले आहेत. आम्ही मातोश्रीच्या आत होतो. हे सर्व कार्यकर्ते मातोश्रीच्या बाहेर होते. आमच्या कार्यकर्त्यांवर कुठलेच गुन्हे दाखल झाले नाहीत. गुन्हे दाखल करायचे असतील तर ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर व्हायला हवेत. याबाबत रवींद्र वायकर हे पत्रकार परिषद घेत आहेत. त्या परिषदेनंतर आमचं योग्य ते उत्तर दिलं जाईल," असंही बाळा नर म्हणाले.
निवडणूक चुरशीची होणार- जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाची स्थापना सन २००९ मध्ये झाली. तेव्हापासून सलग ३ वेळा शिवसेनेचे रवींद्र वायकर हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत. यंदा शिवसेनेत फूट पडल्यानंतर रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून गेले. जोगेश्वरी पूर्व मतदार संघ रवींद्र वायकर यांचा बालेकिल्ला समजला जातो. रवींद्र वायकर लोकसभेवर निवडून गेल्यानं शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर मनीषा वायकर यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांचे शिष्य आणि जवळचे कार्यकर्ते अनंत (बाळा) नर यांना शिवसेनेनं ( उद्धव ठाकरे) निवडणुकीच्या रिंगणात उतरविलं आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत खटके उडत आहेत.
हेही वाचा-