ETV Bharat / politics

फडणवीस साहेब तुमचे राजकीय गणित मीच बिघडवणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा - Jarange On Devendra Fadnavis

Jarange On Devendra Fadnavis : फडणवीस साहेब तुम्ही चूक करू नका, मराठ्यांना गाफील ठेवून तुम्ही आचारसंहिता लागू करू नका. आरक्षण न देता तुम्ही फक्त तारखा जाहीर करूनच दाखवा, मग मराठ्यांचा वचका तुम्हाला कळेल. तुमचे राजकीय गणित मनोज जरांगे पाटील बिघडविणार म्हणजे बिघडवणारच, असा इशाराही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 1:34 PM IST

Manoj Jarange patil
मनोज जरांगे (Etv Bharat File Photo)

छत्रपती संभाजीनगर Jarange On Devendra Fadnavis :- मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे जरांगेंनी लक्ष्मण हाकेंबद्दल जास्त बोलणं टाळलं आहे. लक्ष्मण हाके यांना मी विरोधक मानत नाही, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मी बोलणार नाही. काहींचे संस्कार आडवे येण्याचे असतात, मात्र आपले ते संस्कार नाहीत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांच्याबाबत जास्त काही बोलण्यास नकार दिला.

विरोधक मानत नाही, त्यावर बोलणार नाही: शेवटी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस काय बोलतात ते बघा, बाकी लक्ष देण्यासारखे नाही. मी आधीच सांगितलंय की, शेवटी कर्ताकरविता छगन भुजबळ आहेत, त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नसल्याचंही मनोज जरांगेंनी सांगितलंय. कर्ताकरविता दोषी आहेत, असं मला वाटतं. खरं तर यावर माझं काहीही म्हणणे नाहीच, मी सरळ आहे. मी ज्याला विरोधक मानतो, त्याचा तुकडाच पाडतो. मात्र मी ज्याला विरोधक मानत नाही, त्याच्यावर मी बोलतच नाही. कोणी अडचणीत आला असेल तर त्याला अजून अडचणीत आणण्याचे आमच्यावर संस्कार नाहीत, असंही मनोज जरांगे म्हणालेत.

तुमचे गणित बिघडणार : आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, भाजपामधील मराठेदेखील त्यात आहेत, त्यांनीसुद्धा वरिष्ठांकडे आग्रह धरावा. मी राजकारणात जाणार नाही, मात्र नाईलाज झाला तर तसं होईल, दगाफटका करू नका, असंही जरांगे पाटील यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. फडणवीस साहेब तुम्ही चूक करू नका, मराठ्यांना गाफील ठेवून तुम्ही आचारसंहिता लागू करू नका. आरक्षण न देता तुम्ही फक्त तारखा जाहीर करूनच दाखवा, मग मराठ्यांचा वचका तुम्हाला कळेल. तुमचे राजकीय गणित मनोज जरांगे पाटील बिघडविणार म्हणजे बिघडवणारच, असा इशाराही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

ओबीसींमध्ये पोटजाती कशा? : मराठा आणि कुणबी एकच आहेत, ओबीसींमध्ये बाकीच्या जाती-पोटजाती म्हणून एकत्र केल्या आहेत, त्या कशाच्या आधारावर याचे उत्तर द्या, तुम्हाला अशा किती जाती दाखवू. रोज व्यवसाय करणाऱ्या जातींमध्ये पोट जाती घातल्या आहेत. मग मराठा आणि कुणबी एक हे तुम्ही नोंदी मिळूनदेखील सिद्ध करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. आज तुम्ही आलिशान गाडीत फिरत आहात ते फक्त मराठ्यांच्या पोरांमुळे, मात्र आमच्यावर ही वाईट वेळ तुम्ही का आणली? आरक्षण न देता आचारसंहिता लागू केली तर मराठ्यांच्या रोष्याला तुम्हाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

नारायण गडावर होणार भव्य मेळावा: नारायणगड येथे दसरा मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी खूप मोठा परिसर आहे. 123 एकरात त्यांचं कामं सुरू आहे. सर्व समाज त्या दिवशी हजेरी लावणार आहेत, दर्शनाला येणार आहेत, आम्ही एकमेकांशी संवाद साधणार आहोत. आमचा भेटीगाठीचा तो विराट सण असणार आहे, मी बरोबर 12 वाजता गडावर चढणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. माझ्या समाजाचे दुःख मांडण्यासाठी आम्ही का तिथे येऊन नये असं सांगून अरक्षण नाही दिलं तर यांचा खेळ खल्लास करणार, मग धिंगाणा होणार, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा

  1. देवेंद्र फडणवीस घाबरलेत; भाजपा 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही, रोहित पवारांची भविष्यवाणी - Rohit Pawar On Devendra Fadnavis
  2. "महाराष्ट्राचा बैल बाजार...", राऊतांच्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी घेतला समाचार - Sadabhau Khot On Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.