ETV Bharat / politics

कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze

Atul Londhe On Sachin Waze Allegations : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात उडी घेत मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी आज अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडं असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय, असं सचिन वाजे यांनी सांगितलं. यावर आता काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 5:36 PM IST

Atul Londhe comment on Sachin Waze letter and allegations on Anil Deshmukh
अतुल लोंढे, अनिल देशमुख, सचिन वाजे (ETV Bharat)

मुंबई Atul Londhe On Sachin Waze Allegations : अँटेलिया बंगल्यासमोर धमकीचे पत्र आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाजे यांनी आज (3 ऑगस्ट) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप वाजेंनी केलाय. विशेष म्हणजे याबाबतचं पत्रदेखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय. वाजे यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. वाजे यांच्या याच दाव्यावरुन आता काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केलीय.

काय म्हणाले अतुल लोंढे : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अतुल लोंढे म्हणाले, "भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा कसा गैरवापर करते, हे आम्ही वारंवार उघड केलंय. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या माध्यमातून भाजपानं मविआ सरकारमधील नेत्यांवर खोटे आरोप केले होते. नेत्यांना गोवण्यासाठी कारस्थान रचलं होतं. आताही माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केल्यामुळं फडणवीस यांचा भ्रष्ट चेहरा उघडा पडलाय."

पुढं ते म्हणाले, "पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही, मग सचिन वाजेलाच बोलण्याची परवानगी कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे." तसंच सचिन वाजेच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस होते त्यांना तत्काळ निलंबित करावं, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीय. सचिन वाजेच्यामागे बोलविता धनी कोण? हे सर्वांनाच माहीत असून त्याचीही चौकशी व्हावी, असंही लोंढे यांनी म्हटलंय.

...म्हणून फडणवीस चिडले : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले बिंग फुटल्याचं लक्षात आल्यानं असत्य लपवण्यासाठी कैदेत असलेल्या सचिन वाजेला पुढं केल्याचा आरोप लोंढे यांनी केलाय. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकलंय, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकलं होतं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नबाव मलिक हेसुद्धा जेलमध्ये होते. पण त्यांना कधीही प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी दिली गेली नाही. मग सचिन वाजेलाच प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी आणि कोणी दिली? हा सचिन वाजे सरकारचा कोण लागतो, असा सवालही अतुल लोंढे यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze
  2. सचिन वाझेंच्या आरोपांनी भाजपाच्या हातात आयतं कोलीत; अनिल देशमुख खंडणी प्रकरणावरुन पुन्हा उडणार 'भडका' - Sachin Vaze vs Anil Deshmukh
  3. "निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून गुंडांचा वापर...", संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Sanjay Raut On Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.