प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभमेळा पार पडला. या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी स्नान केलं. यादरम्यान गंगा नदी जगातील एकमेव गोड्या पाण्याची नदी आहे, जी ५० पट वेगाने जंतू निर्मूलन करते, असं काही प्रतिष्ठित माध्यमांनी आपल्या वृतात म्हटलं आहे. तसंच, गंगा नदी पूर्णपणे जंतूमुक्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे. गंगेच्या पाण्यातील हानिकारण बॅक्टेरियाच्या आरएनएला शोधून प्रदूषण कमी करण्याचे काम १,१०० बॅक्टेरियोफेज करते आणि नंतर स्वत: गायब होते. त्यामुळं गंगा नदीच्या शुद्धतेचं क्रेडिट हे १,१०० बॅक्टेरियोफेजला दिलं जातं.
गंगेच्या पाण्यात एक अद्वितीय नैसर्गिक क्षमता : गंगा नदीतील फेजची इतकी विविधता कधीही उघड न झाल्यामुळं, ही आश्चर्यकारक स्पष्ट संख्या कुठून मिळाली, हे पूर्णपणे स्पष्ट नाही. बॅक्टेरियोफेजना गंगेचे 'सुरक्षा रक्षक' म्हणून देखील ओळखलं जातं, कारण ते नदीचे 'निःस्वार्थ' त्वरित शुद्धीकरण करतात. पुढं असाही दावा केला जातोय की, गंगेच्या पाण्यात एक अद्वितीय नैसर्गिक क्षमता आहे, जी तिला इतर नद्यांपेक्षा वेगळं करते. याबाबत सविस्तर जाणून घ्या...
काय आहे वस्तुस्थिती? : बॅक्टेरियोफेजेस हे गंग नदीपुरते मर्यादित नाहीत, तर ज्या-ज्या ठिकाणी बॅक्टेरिया असतात. त्या-त्या ठिकाणी तिथे सर्वत्र आढळतात. फक्त नद्या, तलाव, समुद्रामध्ये नाही. डिसेंबर २०२२ मध्ये एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये गंगा नदीच्या गाळामध्ये विविध फेज कुटुंबांचा रिपोर्ट देण्यात आला होता. ज्यानुसार, गंगेतील फेज भिन्नता किंवा विविधता जगभरातील इतर नदी सिस्टमसोबत तुलना होईल.
बॅक्टेरिया नष्ट करतात : फेज आपल्या अस्तित्वाचे श्रेय बॅक्टेरिया होस्टला देतात. तसंच, त्यांना "बॅक्टेरियाचे बंधनकारक परजीवी" असं म्हटलं जाऊ शकतं, कारण ते प्रतिरोधक जनुके हस्तांतरित करून त्यांच्या होस्ट जीनोममध्ये बदल करतात. फेज बॅक्टेरिया पेशीमध्ये प्रवेश करून आणि त्यांच्या जेनेटिक मटेरिअलची प्रतिकृती बनवून बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळं ते नवीन फेज सोडण्यासाठी उघडतात. त्यामुळं होस्ट पेशी नष्ट होतात. या जीवनचक्राला लाइटिक सायकल म्हणतात.
गंगा नदी सर्वात प्रदूषित : फेजेस फक्त गंगा नदीतच नव्हे तर कोणत्याही नदीत ई. कोलाय नष्ट करतात. मात्र, भारतातील इतर अनेक जलस्रोतांप्रमाणे गंगा नदीही सर्वात प्रदूषित आहे. तसंच, फेजेस-बॅक्टेरियाच्या परस्परसंवादाची लिमिटेड लेव्हल असूनही, फेजेस आपल्या लौकिक शक्तीची तुलना गंगेत वाहणारा मानवी कचरा आणि औद्योगिक सांडपाण्याशी करू शकत नाहीत, असं विज्ञान म्हणतं.
गंगेच्या शुद्धतेबाबत अहवालाच्या निष्कर्षांशी विसंगत : गंगेच्या शुद्धतेबाबत समोर आलेले दावे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादाला (एनजीटी) सादर केलेल्या अहवालाच्या निष्कर्षांशी थेट विसंगत आहेत. या अहवालात नदीच्या संगमावर, ज्याठिकाणी लोक पवित्र स्नान करत आहेत, त्याठिकाणी विष्ठेच्या कोलिफॉर्म - मानवी आणि प्राण्यांच्या मलमूत्रातून निघणारे सूक्ष्मजंतू - यांचं उच्च प्रमाण दर्शविणारं मोजमाप दिलं आहे.
नदीच्या पाण्याची गुणवत्ता : याचबरोबर, विविध प्रसंगी निरीक्षण केलेल्या सर्व ठिकाणी नदीच्या पाण्याची गुणवत्ता विष्ठेच्या कोलिफॉर्मसाठी आंघोळीसाठी प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेशी जुळत नाही, असंही अहवालात म्हटलं आहे. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ पासून सध्या महाकुंभ मेळाव्यात शास्त्री पुलाजवळ विष्ठेच्या कोलिफॉर्मची पातळी ११,००० एमपीएन/१०० मिली आणि संगम येथे ७,९०० एमपीएन/१०० मिली पर्यंत पोहोचली आहे. जी २,५०० एमपीएन/१०० मिली आंघोळीच्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, सीपीसीबी गंगेच्या सतत रिअल-टाइम पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण (RTWQM) करत आहे.
त्रिवेणी संगम येथील गंगा नदीचं पाणी असुरक्षित आहे, कारण त्यात बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड लेव्हल जास्त आहे. जी हाय ऑर्गेनिक कंटेन्ट दाखवते. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे मापन आहे, जे एरोबिक जीवांना पाण्यात असलेल्या ऑर्गेनिक पदार्थांचे विघटन करण्यासाठी आवश्यक असते. जर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड लेव्हल प्रति लिटर 3 मिलीग्रामपेक्षा कमी असेल तर नदीचे पाणी आंघोळीसाठी योग्य असल्याचं मानलं जातं. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, संगमावरील नदीचं पाणी सध्या या मर्यादेपेक्षा जास्त आहे. गेल्या १६ जानेवारीला संगमावरील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड लेव्हल प्रति लिटर ५.०९ मिलीग्राम होती. त्यामुळं येथील पाणी पिणं तर सोडाच, त्या पाण्यात डुबकी मारणंही सुरक्षित नव्हतं.
प्रयागराज येथे गंगा नदीतील प्रदूषण : विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (यूपीपीसीबी) महाकुंभमेळ्या दरम्यान प्रयागराज येथे गंगा नदीतील प्रदूषण लेव्हलबाबत न्यायालयात पुरेशी माहिती सादर केली नाही. त्यामुळं एनजीटीनं यूपीपीसीबीला फटकारलं होतं. एनजीटीनं म्हटलं की, यूपीपीसीबीच्या अहवालात महाकुंभ सुरू होण्यापूर्वी १२ जानेवारीपर्यंत गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यांचाच उल्लेख आहे. त्यामुळं फेजेसच्या उपस्थितीमुळं गंगा स्वतः शुद्ध करणारी आहे, असा दावा करणं अतिशयोक्ती आहे. कारण, त्यांची कार्यक्षमता दररोज नदीत सोडल्या जाणाऱ्या अब्जावधी लिटर प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याशी जुळत नाही, ज्यामुळं गंगा सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक बनते.
"गंगा पवित्र आहे, पण ती..." : याबाबत, केरळमधील अनुभवी सार्वजनिक आरोग्य कर्मचारी हेमचंद्रन कुंजुकृष्णन यांच्याशी संपर्क साधला. हेमचंद्रन कुंजुकृष्णन यांचा केरळमधील पंबा नदीचे निरीक्षण करण्यासाठी थेट सहभागी होता. सबरीमाला मंदिरात यात्रेकरूंच्या हंगामी गर्दीमुळे पंबा नदीला प्रदूषणाचा धोका देखील आहे. तर हेमचंद्रन कुंजुकृष्णन यांनी मेलद्वारे माहिती दिली. ते म्हणाले की, केरळमधील इडुक्की, कोट्टायम आणि सबरीमला येथील शेकडो जलस्रोतांना क्लोरीनेशन करण्यास मदत करणारे सार्वजनिक आरोग्य कर्मचारी म्हणून, मला धोका दिसतो. दूषित पाण्यात डुंबणाऱ्या लाखो लोकांना गॅस्ट्रोएन्टेरिटिस, त्वचेचे संक्रमण आणि हिपॅटायटीसचा धोका उद्भवू शकतो. फेज असलेली गंगेची रोमँटिक कल्पना केवळ दिशाभूल करणारी नाही, तर ती धोकादायक आहे. आपल्याला दंतकथांची गरज नाही. आपल्याला सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, कठोर निरीक्षण आणि वस्तुस्थिती तपासणीची आवश्यकता आहे. गंगा पवित्र आहे. पण ती अलौकिक नाही. ती एक नदी आहे, असं हेमचंद्रन कुंजुकृष्णन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -