प्रत्येक देश धोरणात्मक हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी आणि भू-राजकीय प्रभाव स्थापित करण्यासाठी संघर्ष करतात. पारंपरिक युद्ध, त्याच्यावर होणारा प्रचंड खर्च आणि जोखमींसह, अनेकदा हा संघर्ष खूप त्रासदायक सिद्ध होत आहे. भारताच्या शेजारच्या देशांच्या संदर्भात, चीन आणि पाकिस्तान दोघेही ग्रे झोन युद्धाला प्राधान्य देतात. हे युद्ध म्हणजे एक अशी रणनीती जी खुला संघर्ष टाळून विरोधाचं कार्य करते. हा दृष्टिकोन त्यांच्याबरोबरच्या थेट युद्धाची शक्यता कमी करतात. त्याचवेळी नकारात्मकतेतून राष्ट्रीय उद्दिष्टे पुढे रेटण्यास त्यांना उपयोगी ठरतात. गुन्हेगाराला आपण गुन्हा करतोय हे माहीत असते, त्याचबरोबर त्याच्यात नकारात्मकता भरुन उरलेली असते. तसंच 'ग्रे झोन मोहिमा' याच्यासाठी ठराविक 'झोन केलेले' ठरलेल्या किंवा ठरवलेल्या नसतात. अशा गोष्टी एका ठिकाणी सुरू होतात आणि संपूर्ण देश त्यातून व्यापला जातो. कारण कालांतराने विकसित होण्यासाठीच या मोहिमांचा आराखडा तयार केलेला असतो.
ग्रे झोन युद्ध आणि सुधारणावादी देश - दुसऱ्या महायुद्धानंतर, आंतरराष्ट्रीय नियम या युद्धातील विजेत्यांनी, अमेरिकेने घालून दिले होते. आता रशिया आणि उदयोन्मुख चीन दोघेही अमेरिकेच्या या वर्चस्वाला आव्हान देऊ इच्छितात. पारंपरिक युद्ध महाग झालं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यातून निंदा नालस्ती होण्याचा धोका आहे. पारंपरिक शस्त्रे वापरण्याऐवजी, देश त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आर्थिक जबरदस्ती, सायबर युद्ध, माहिती हाताळणी आणि प्रॉक्सी संघर्षांचा अवलंब करत आहेत.
ग्रे झोन रणनीती वापरणारे देश सामान्यतः सुधारणावादी शक्ती असतात - असे देश जे खुल्या युद्धात सहभागी होत नाहीत तर जागतिक शक्ती संतुलन त्यांच्या बाजूने बदलण्याचा प्रयत्न करतात.
भारताच्या शेजारील चीन आणि पाकिस्तानने कित्येक वर्षांपासून भारताविरुद्ध ग्रे झोन रणनीतींचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. चीनचा दृष्टिकोन नियंत्रित विस्तारावर केंद्रित असला तरी, पाकिस्तानची रणनीती वैचारिक युद्ध आणि प्रायोजित अस्थिरतेवर केंद्रित आहे.

चीनची ग्रे झोन युद्ध रणनीती - ‘ग्रे झोन संकल्पना प्राचीन चिनी धोरणात्मक संस्कृतीशी जुळते. चिनी लोकांचा असा विश्वास आहे की शहाणपण हे निर्णायक, महागडी लढाई उत्कृष्टपणे लढणे यात नाही तर अशा लढाईची गरज टाळण्यात आहे. पारंपरिक शहाणपणातून अप्रत्यक्ष कारवायांना बळ मिळते आणि शक्य असेल तेथे अनावश्यक निर्णायक लढाया टाळते. कमी खर्चाच्या ग्रे झोन मोहिमांचा वापर करून एक-एक पाऊल पुढे टाकत आपली धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करणे हाच एक दृष्टिकोन अशा देशांचा असतो.
चीनकडे दूरदृष्टीची सुधारणावादी शक्ती म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण चीन त्यांचे हितसंबंध चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी विद्यमान आंतरराष्ट्रीय व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नात आहे. चिनी अशा विद्यमान जागतिक व्यवस्थांना पाठिंबा देत आहे जे त्याच्या उदयाला अनुकूल आहेत. म्हणूनच असे देश त्यांच्या राष्ट्रीय हितांशी जुळणारे पैलू सुधारण्याचा प्रयत्न करतात. चीनची ग्रे झोनची रणनीती कशी आहे ते पाहूयात...
सलामी-स्लाइसिंग स्ट्रॅटेजी - चीन हळूहळू वादग्रस्त भागात आपले प्रादेशिक नियंत्रण छोट्या-छोट्या हालचाली करून वाढवत आहे. ज्यामुळे त्यांना लगेच थेट लष्करी सामना करण्याची गरज पडत नाही. दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटांचे बांधकाम आणि सैन्यीकरण आणि भारत-चीन सीमेवर प्रादेशिक घुसखोरी ही त्याची उदाहरणे आहेत.
आर्थिक जबरदस्ती - चीन इतर देशांवर प्रभाव पाडण्यासाठी व्यापार अवलंबित्व, कर्जे आणि गुंतवणूकींचा वापर करतो. ज्यामुळे त्यांचे धोरणात्मक पर्याय प्रभावीपणे मर्यादित होतात. 'द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)' सारख्या मेगा प्रकल्पांच्यामुळे अनेक देश चीनवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहिले आहेत. ज्यामुळे चीनला आर्थिक आणि राजकीय फायदा मिळू शकतो.

सायबर आणि माहिती युद्ध - चीन आपल्या शत्रूंना कमकुवत करण्यासाठी सायबर हेरगिरी, चुकीची माहिती मोहीम आणि डिजिटल प्रभाव पाडणाऱ्या ऑपरेशन्समध्ये काम करत आहे. चीन भारतीय संरक्षण आणि पायाभूत सुविधांच्या प्रणालींचे हॅकिंगचे सतत प्रयत्न करत आहे. तसंच सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून जनतेच्या धारणा तसंच मते बदलत आहे.
लष्करी पोझिशनिंग आणि निमलष्करी रणनीती - नियमित लष्करी दल तैनात करण्याऐवजी, चीन वादग्रस्त प्रदेशांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अतिरेकी गट, तटरक्षक दल आणि निमलष्करी तुकड्यांचा वापर करतो. इतर देशांना त्रास देणारे चिनी सागरी चाचे, दक्षिण चीन समुद्रात मासेमारी तसंच नौदल जहाजे आणि भारतासोबतच्या LAC वर अशा मोहिमा राबवणे हे अशा कृत्यांचे उदाहरण आहे, जे अन्यथा चिथावणीखोर ठरू शकते.
राजकीय प्रभाव पाडणाऱ्या मोहिमा - चीन इतर देशांमध्ये राजकीय पक्ष, मीडिया संघटना आणि शैक्षणिक संस्थांना निधी देऊन प्रभाव पाडतो. जेणेकरून ते चीनला अनुकूल असणारी धोरणे आखतील. चीनने भारतीय माध्यमांमध्ये गुंतवणूक करून तीही नियंत्रित केल्याचा संशय आहे.
चीन नेमकं करतोय तरी काय - चीनच्या ग्रे झोन स्ट्रॅटेजीचा उद्देश खुल्या युद्धात न अडकता इंडो-पॅसिफिकसारख्या धोरणात्मक क्षेत्रांवर आपलं नियंत्रण वाढवून जागतिक स्तरावर अमेरिकेचं वर्चस्व कमी करणे हा आहे. आशिया खंडामध्ये, चीन भारताला सीमांवर तणाव निर्माण करुन देशातील धोरण विचलित करून आणि अंतर्गत विरोधाभास तसंच संघर्षांमध्ये अडकवून भारताचा प्रभाव कमी करण्याचा चीन प्रयत्न करीत आहे.

पाकिस्तानची ग्रे झोन वॉरफेअर स्ट्रॅटेजी - पाकिस्तानची ग्रे झोन वॉरफेअरची रणनीती चीनच्यापेक्षा वेगळी आहे. पाकिस्तान नियंत्रित धोरणात्मक विस्तारापेक्षा विचारसरणी, प्रॉक्सी संघर्ष आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षा (काश्मीर) द्वारे चालवला जातो. डॉ. मायकेल मजार यांनी त्यांच्या 'मास्टरिंग द ग्रे झोन: अंडरस्टँडिंग अ चेंजिंग एरा ऑफ कॉन्फ्लिक्ट' या पुस्तकात पाकिस्तानी दृष्टिकोनाची लांडग्यांच्या टोळीसारख्या बेपर्वा शिकारीशी तुलना केली आहे. हे युद्धखोर शिकारी अधिक मिळविण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात धोका पत्करण्यासाठी दृढनिश्चयी आहेत. भारतासोबत सततच्या शत्रुत्वाचा जुगार हरल्यानं देशाचा नाश होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे, तरीही स्वतःच्या स्वार्थासाठी ते प्रचंड जोखीम घेण्यास तयार आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर संस्था त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय स्थिरतेपेक्षा भारताचे नुकसान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अनेकदा पाकिस्तानमध्ये आर्थिक आणि राजकीय संकटे निर्माण होतात. कारगिल संघर्षादरम्यान (१९९९) हे स्पष्ट झालं होतं, जिथे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने दीर्घकालीन परिणामांचा विचार न करता धोकादायक लष्करी कारवाई केली. पाकिस्तान भारताविरुद्ध काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांना सक्रियपणे निधी पुरवतो. त्यांना प्रशिक्षण देतो आणि आश्रय देतो. लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या गटांचा वापर काश्मीर आणि संपूर्ण भारतात हल्ले करण्यासाठी केला गेला आहे. पाकिस्तानची रणनीती खालील गोष्टींभोवती फिरते:
कट्टरपंथी विचारसरणी पसरवणे - अतिरेकी गोष्टींना प्रोत्साहन देऊन, पाकिस्तान भारतातील फुटीरवाद आणि अंतर्गत कलहांना प्रोत्साहन देतो. सोशल मीडिया प्रचार आणि धार्मिक नेटवर्कद्वारे काश्मीरमधील तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
चुकीची माहिती पसरवणे - भारताची जागतिक पातळीवर प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकिस्तान सायबर हल्ले, खोट्या बातम्या आणि राजनैतिक डावपेचांचा वापर करतो. काश्मीर आणि पंजाबमधील भारताच्या कृतींना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर एकत्रितपणे चालवलेले चुकीची माहिती देणाऱ्या मोहिमा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

ग्रे झोन युद्धासाठी अणुऊर्जा युद्धाचे कवच म्हणून पाकिस्तान त्याच्या अणुशस्त्रांवर अवलंबून आहे, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तराची भीती न बाळगता भारताविरुद्ध कमी-तीव्रतेचे संघर्ष करू शकतात. सीमापार दहशतवाद आणि युद्धबंदीचे उल्लंघन या विश्वासाने सुरू आहे की भारत अणु युद्धाच्या धोक्यांमुळे मोठे युद्ध टाळेल.
पाकिस्तानचा शेवटचा पर्याय - पाकिस्तानची ग्रे झोन रणनीती भारताला अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक आणि लष्करी प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यापासून रोखण्यासाठी तयार केलेली आहे. प्रचार आणि राजनैतिक दबावाद्वारे काश्मीर वादाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात पाकिस्तान आतापर्यंत यशस्वी झाला आहे. म्हणूनच त्याने भारताच्या सीमावर्ती भागात अस्थिरता राहण्यासाठी प्रयत्न केला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय एकता कमकुवत होत आहे.
भारताविरुद्ध चीन-पाकिस्तान संबंध - पाकिस्तानच्या ग्रे झोन रणनीतींमध्ये फरक असूनही, चीन आणि पाकिस्तान अनेक आघाड्यांवर भारताला आव्हान देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे समन्वय साधतात. चीन पाकिस्तानला लष्करी आणि राजनैतिकदृष्ट्या समर्थन देतो, ज्यामध्ये अणु आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे.
चीनने पाकिस्तानमध्ये (CPEC) गुंतवणूक केल्याने भारताविरुद्ध ग्रे झोन रणनीतींमध्ये सहभागी होण्याची पाकिस्तानची क्षमता बळकट होते. दोघांमधील सहकार्य आणि समन्वयामुळे भारतीय सुरक्षेसाठी 'दोन आघाड्यां'ची कोंडी निर्माण झाली आहे. भारताला उत्तरेकडील चीनशी एकाच वेळी सीमा संघर्ष आणि पश्चिमेकडील पाकिस्तानकडून दहशतवादी धोक्यांचा सामना करावा लागत आहे. एकत्रितपणे, दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान कमकुवत करण्यासाठी जागतिक व्यासपीठांवर भारतविरोधी कारवाया वाढवतात.
ग्रे झोनमधील भारताची असुरक्षितता
भारताची लोकशाही रचना, विविध समाज आणि राजनैतिक दृष्टिकोन यामुळे ते ग्रे झोन युद्धासाठी एक चांगलंच लक्ष्य बनते. प्रमुख कमकुवतपणांमध्ये देशातील जातीय आणि धार्मिक विविधता येते. फूट पाडून यातून कार्यभाग साधता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्थितीवादी परराष्ट्र धोरण. भारत नेहमीच स्थैर्य आणि हस्तक्षेप न करण्याचं धोरण पसंत करतो. त्यामुळे सक्रिय प्रतिकार करण्याची भारताची क्षमता मर्यादित होते.
मर्यादित शक्ती प्रक्षेपण भारताचा प्रतिक्रियात्मक धोरणात्मक पवित्रा खरंतर विरोधकांना कारवायांची चांगलीच सूट देतो. राजनैतिकतेवर अतिरेकी अवलंबित्व भारताचा शांतता-प्रथम दृष्टिकोन यातून प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या कारवाया करण्यासाठी पुष्कळ वेळ देतो. सायबर आणि माहिती कमकुवतपणा भारत चीन आणि पाकिस्तान दोन्हीकडून चुकीच्या माहिती मोहीम आणि सायबर हल्ल्यांचे लक्ष्य आहे. ग्रे झोन युद्धाचा मुकाबला ग्रे झोन धोक्यांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी भारताने खालील गोष्टी करण्यासारख्या आहेत:
- सायबर संरक्षण आणि गुप्तचर नेटवर्क मजबूत करणे.
- सक्रिय लष्करी आणि राजनैतिक दृष्टिकोन स्वीकारणे.
- प्रादेशिक युतींद्वारे चीन-पाकिस्तान सहकार्यात व्यत्यय आणणे.
- अंतर्गत स्थिरता आणि कट्टरतावादविरोधी प्रयत्नांमध्ये सुधारणा करणे.
येत्या काही वर्षांत ग्रे झोन युद्ध भारताच्या सुरक्षा आव्हानांना आकार देत राहील, ज्यासाठी सुधारणावादी धोक्यांपासून बचाव करण्यासाठी बहुआयामी आणि अनुकूल रणनीती आवश्यक असेल. त्यासाठी भारतानं प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हेही वाच....
रशिया-युक्रेन युद्धविराम करार : अडथळे, संधी आणि पुढे काय?
नेपाळच्या लोकशाहीला तडे? राजेशाही पुन्हा स्थापन करण्यासाठी जनरेटा वाढला