वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत चर्चा होण्याऐवजी चांगलीच खडाजंगी झाल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं. यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना तुम्ही तुम्ही तिसऱ्या तिसऱ्या महायुद्धाचा खेळ खेळताय, असा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना रशियासोबतचं युद्ध थांबवून शांती प्रस्थापित करण्याबाबत सांगितलं. मात्र या मुद्द्यावरुन त्यांच्यात खडाजंगी झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना त्यांच्या सूचनांचा अनादर केल्याबद्दल चांगलच फटकारलं.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 28, 2025
डोनाल्ड ट्रम्प आणि व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात विविध मुद्द्यांवर शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना खडसावल्यानं हे दोन्ही नेते हातवारे करत बोलत होते. तब्बल 10 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये गरमागरम चर्चा झाली, असं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी दिलजमाई करुन घेत युद्ध थांबवण्याच्या सूचना दिल्या. मात्र व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी या अगोदर 25 वेळा करारावर स्वाक्षरी करुन त्याचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावरुन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी झाल्याचं वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं.
Thank you America, thank you for your support, thank you for this visit. Thank you @POTUS, Congress, and the American people.
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 28, 2025
Ukraine needs just and lasting peace, and we are working exactly for that.
अमेरिका आणि युक्रेनचा करार रखडला : व्होलोदिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात युक्रेनच्या खनिज करार करण्यात येणार होता. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात युद्ध थांबवण्यावरुन झालेल्या खडाजंगीचे परिणाम या करारवर झाला. या दोघांच्या खडाजंगीत खनिज करार मात्र रखडला आहे.
VIDEO | US President Donald Trump (@realDonaldTrump), US Vice President JD Vance (@JDVance) and Ukrainian President Volodymyr Zelensky (@ZelenskyyUa) got into a heated argument in the Oval Office at White House.
— Press Trust of India (@PTI_News) February 28, 2025
(Source: Third Party) pic.twitter.com/U5MNGj0xqc
हेही वाचा :