वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पहिल्याच दिवशी आयात शुल्कावरून भारतावर निशाणा साधला. ज्या देशांकडून वाढीव आयात शुल्क लादण्यात येईल, त्या देशांवर पुन्हा आयातशुल्क लागू करण्यात येईल, अशी ट्रम्प यांनी घोषणा केली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, काही दशकांपासून अनेक देशांनी अमेरिकेला फसवलं आहे. असे आता पुन्हा होऊ देणार नाही. आयात शुल्क लादणाऱ्या देशांवर आयात शुल्क लादण्याची आता अमेरिकेची वेळ आहे. यावेळी ट्रम्प यांनी युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडा या देशांकडून खूप आयात शुल्क लादण्यात येत असल्याचा आरोप केला. २ एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावानं आयात शुल्क लागू करण्यात येणार आहे.
भारताकडून भरमसाठ लादण्यात येते आयात शुल्क- भारताकडून आमच्यावर १०० टक्क्यांहून अधिक ऑटो उत्पादनांवर आयात शुल्क आकारण्यात येते. आमच्या उत्पादनांवर चीनकडून सरासरी दुप्पटीपेक्षा जास्त आयात कर लागू करण्यात येतो. दक्षिण कोरियाचे सरासरी आयात शुल्क चार पटीहून जास्त आहे. प्रत्यक्षात अमेरिकेकडून दक्षिण कोरियाला सैन्यदलासह इतर अनेक प्रकारे मदत करते. तरीही त्यांच्या व्यवस्था अमेरिकेसाठी कधीच न्याय्य राहिलेली नाही, अशी ट्रम्प यांनी टीका केली.
नवीन नोकऱ्यांची निर्मिती करणार- अमेरिका शेतकरी, उत्पादक आणि कामगारांना संरक्षण देण्यासाठी पावले उचलणार आहे. आपण अब्जावधी डॉलर्स कमवून नोकऱ्या निर्माण करणार आहोत. बायडेन प्रशासन त्याबद्दल काहीही करू शकले नव्हते, असे सांगत त्यांनी मागील सरकारवर जोरदार टीका केली. अमेरिकन अर्थव्यवस्थेला 'निष्पक्षता' आणि 'संतुलन' प्रदान करण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-