वॉशिंग्टन डीसी - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता येताच नवीन निर्णय घेण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यांनी गुरुवारी संघराज्याकडून चालविण्यात येणारे शिक्षण विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभाग बंद करण्याची अंमलबजावणी करण्याकरिता ट्रम्प (Donald Trump news) यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. गेल्या चार दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढूनही शैक्षणिक सुधारणा झाली नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी शिक्षण विभाग बंद करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. त्यांनी म्हटलं, मी संघराज्याचा शिक्षण विभाग कायमचा रद्द करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत आहे. आपल्याला आपल्या मुलांना शिक्षित करावं लागेल. अनेक वर्षांपासून आपण (अमेरिका) शिक्षणात चांगले काम करत नाहीत. हे किती आश्चर्यकारक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांनी शिक्षण विभागाची स्थापना केली होती. तेव्हादेखील त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि रिपब्लिक पक्षानं विरोध केला होता, असा दावा ट्रम्प यांनी केला.
शिक्षण विभागाच्या निधीत ६०० टक्क्यांची वाढ- ४५ वर्षांनंतरही अमेरिका शिक्षणावर इतर कोणत्याही देशापेक्षा खूप जास्त पैसे खर्च करते. मात्र, यशाच्या बाबतीत आपण यादीत तळाशी आहोत. आपल्या सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आज वाचनात विद्यार्थांना खूपच कमी गुण आहेत. बाल्टीमोरमध्ये ४० टक्के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मूलभूत गणित शिकू येत नाही. शैक्षणिक विभागाच्या अपयशांनंतरही शिक्षण विभागाचा खर्च अल्पावधीतच ६०० टक्क्यांनी वाढल्याची सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
चीनमधील शाळांनी अमेरिकेला टाकले मागे-
शिक्षण विभाग बंद केला असला तरी दिव्यांग विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीचा निधी गोठविण्यात येणार नाही. हा निधी इतर संस्थांना दिला जाणार आहे. माझे प्रशासन शक्य तितक्या लवकर शिक्षण विभाग बंद करण्यासाठी सर्व कायदेशीर पावले उचलेल. शिक्षण विभागाशिवाय नवीन प्रणाली अंतर्गतमधील शाळा युरोप आणि चीनमधील देशांशी स्पर्धा करू शकतात. सध्या युरोप आणि चीनमधील शाळा अमेरिकेला मागे टाकत असल्याची चिंता ट्रम्प यांनी व्यक्त केली.
कशी आहे अमेरिकेतील विद्यार्थ्यांची शिक्षणातील प्रगती?
- व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार १९७९ पासून अमेरिकेच्या शिक्षण विभागानं ३ लाख कोटी डॉलर्सपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. तेव्हापासून, प्रति विद्यार्थ्यावर होणार खर्च २४५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. असे असले तरी १३ वर्षांच्या मुलांची गणित आणि वाचनातील प्रगती दशकांमध्ये सर्वात कमी पातळीवर आहे.
- चौथीच्या दहापैकी सहा आणि आठवीच्या जवळजवळ तीन चतुर्थांश विद्यार्थ्यांना गणितात हुशार नाहीत. चौथी आणि आठवीच्या दहापैकी सात विद्यार्थी वाचनात हुशार नाहीत.
- तर चौथीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांना वाचनाचे मूलभूत ज्ञान नाही.
हेही वाचा