वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी अतिरेकी संघटना हमासला उर्वरित सर्व ओलिसांना सोडण्याचा 'अंतिम इशारा' दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासनं नुकत्याच सोडलेल्या आठ ओलिसांची डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "'शालोम हमास' म्हणजे हॅलो आणि गुडबाय- तुम्ही निवडू शकता. सर्व ओलिसांना आता सोडा, नंतर नाही. तसंच तुम्ही ज्यांची हत्या केलीय त्यांचे मृतदेह ताबडतोब परत करा, अन्यथा तुमच्यासाठी सर्व काही संपेल. फक्त आजारी आणि विकृत लोक मृतदेह ठेवतात. तुम्ही आजारी आणि विकृत आहात. काम पूर्ण करण्यासाठी मी इस्त्रायलला आवश्यक ते सर्व पाठवत आहे. ही तुमच्या नेतृत्वासाठी शेवटची चेतावणी आहे. तरीही तुमच्याकडं संधी आहे. ओलिसांना आत्ताच सोडा, अन्यथा नंतर तुम्हालाच त्रास होईल," असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
" 'shalom hamas' means hello and goodbye - you can choose. release all of the hostages now, not later, and immediately return all of the dead bodies of the people you murdered, or it is over for you. only sick and twisted people keep bodies, and you are sick and twisted! i am… pic.twitter.com/88EjVAyWAe
— President Donald J. Trump (@POTUS) March 5, 2025
तत्पूर्वी, व्हाईट हाऊसनं बुधवारी (५ मार्च) एका निवेदनात म्हटलं होतं की, अमेरिकन अधिकारी हमास नेत्यांशी चर्चा करत आहेत. हे पाऊल अतिरेकी गटांशी थेट संबंध न ठेवण्याच्या अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणापासून एक वेगळेपण आहे. अमेरिकेनं १९९७ मध्ये हमासला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले. त्यानंतर अमेरिका आणि हमास यांच्यात ही पहिलीच थेट चर्चा आहे. दरम्यान, कतारची राजधानी दोहा येथे ही चर्चा झाली.
अमेरिकन लोकांच्या हितासाठी एक उदात्त प्रयत्न : व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी चर्चेबद्दल सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. मात्र, असं असलं तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या दूतांना कोणाशीही बोलण्याचा अधिकार दिल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढं त्या म्हणाल्या, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विश्वास आहे की अमेरिकन नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचा हा एक उदात्त प्रयत्न आहे. अमेरिकन नागरिकांचं जीवन धोक्यात असल्यानं हमास नेत्यांशी थेट संबंध ठेवण्याबाबत इस्रायलशी सल्लामसलत करण्यात आली."
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं अमेरिका-हमास चर्चेबाबत म्हटलंय की, "इस्रायलनं हमासशी थेट चर्चेबाबत अमेरिकेला त्यांची भूमिका कळवली आहे. ओलिसांच्या सुटकेसाठी ट्रम्प यांनी विशेष दूत म्हणून नियुक्त केलेले अॅडम बोहेलर यांनी हमासशी थेट वाटाघाटींचे नेतृत्व केले. इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे २४ जण ओलीस आहेत. तर किमान ३५ जणांचे मृतदेह अजूनही गाझामध्ये ठेवण्यात आले आहेत."
हेही वाचा-