वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील लास क्रूसेस शहरातील एका पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, जखमींमध्ये 16 ते 36 वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
नेमकं काय घडलं? : पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यानाच्या मोठ्या भागात 50 ते 60 हँडगनचे केसिंग विखुरलेले होते. यावरुन दोन गटातील वादातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मृतांमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा आणि 18 आणि 19 वर्षांच्या दोन पुरुषांचा समावेश आहे. स्थानिक पोलीस गोळीबाराच्या घटनेचा तपास करत आहेत. न्यू मेक्सिको राज्य पोलीस, डोना आना काउंटी शेरीफ कार्यालय, एफबीआय आणि इतर एजन्सी तपासात मदत करत आहेत.
- जखमींवर उपचार सुरू : लास क्रूसेस फायर चीफ मायकेल डॅनियल्स यांनी सांगितलं की, "11 जखमींना तीन स्थानिक हॉस्पिटल तसंच एल पासोच्या युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर, प्रादेशिक ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलंय. शनिवारपर्यंत, सात जखमींवर एल पासोमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी चार जणांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला."
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "हे एक भयानक आणि मूर्खपणाचं कृत्य आहे. हे न्यू मेक्सिकोच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्पष्ट दुर्लक्षाची आठवण करून देते. या घटनेसाठी सर्व दोषींवर कारवाई जाईल. आम्ही त्यांना फौजदारी न्याय व्यवस्थेच्या कठड्यात उभं करू." शुक्रवारी रात्री ही घटना घडली. तेव्हा पार्कमध्ये बेकायदेशीरपणे कार शो सुरू होता. रात्रीची वेळ असल्यानं पोलिस बंदोबस्त कमी होता, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -