ETV Bharat / international

जशास तसं! ट्रम्प यांना चीनचं चोख प्रत्युत्तर, अमेरिकन वस्तुंवर तब्बल 84 टक्के आयातशुल्क! - CHINA TARIFFS ON US GOODS

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या आयातशुल्क वाढीला प्रत्युत्तर म्हणून चीननं अमेरिकन वस्तूंवर 84% आयातशुल्क लादलंय. 10 एप्रिलपासून हे आयातशुल्क लागू होणार आहे.

US China trade war
Etv Bharat (Source- AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 9, 2025 at 5:54 PM IST

1 Min Read

हैदराबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या परस्पर शुल्कवाढीला तीव्र प्रत्युत्तर देताना, चीननं अमेरिकन वस्तूंवर 84% शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. ही नवीन शुल्कवाढ गुरुवार, 10 एप्रिलपासून लागू होणार आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या 34% शुल्कातून ही वाढ झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी सर्व व्यापारी भागीदार देशांवर किमान 10% आणि अमेरिकेसोबत व्यापारी तूट असणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संबंध बिघडले आहेत.

अमेरिकेन वस्तूवर 84% कर- ट्रम्प यांनी बुधवारच्या मध्यरात्रीपासून लागू होणाऱ्या 104% शुल्कवाढीची अंमलबजावणी केल्याच्या पार्श्वभूमीवर, चीननंही आपल्या ‘प्रतिउत्तर उपाययोजना’ जाहीर केल्या आहेत. चीननं अमेरिकन वस्तूंवर आधी 34% शुल्क लादलं होतं. परंतु आता ते वाढवून 84% केलं आहे. ट्रम्प यांनी परराष्ट्रांकडून अमेरिकन उत्पादनांवर कठोर शुल्क लादल्याचा आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेची लूट केल्याचा आरोप केला . दुसरीकडं, चीननं अमेरिकेच्या कर ब्लॅकमेलला बळी पडणार नसल्याचं स्पष्ट करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चीनची कठोर भूमिका चीनच्या स्टेट कौन्सिलच्या शुल्क आयोग कार्यालयानं जाहीर केलेल्या निवेदनानुसार, "अमेरिकन वस्तूंवरील आयातशुल्क 34% वरून 84% पर्यंत वाढवलं जाईल". अमेरिकेनं 2 एप्रिल रोजी सर्वसमावेशक नवीन शुल्क धोरण जाहीर केलं होतं. जपानसारखे काही देश आयातशुल्कांवर चर्चा करण्यास तयार दिसत असलं तरी, चीननं कठोर भूमिका घेतली आहे. 2 एप्रिलच्या शुल्कवाढीला प्रत्युत्तर म्हणून चीननं सुरुवातीचं पाऊल उचलल्यानंतर, ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर आणखी 50% शुल्कवाढ जाहीर केली. त्यामुळे एकूण आयातशुल्क 104% पर्यंत पोहोचलं आहे.

बाजारावर परिणाम- ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या घोषणेनंतर अमेरिकन शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. मंगळवारी S&P 500 निर्देशांक 5,000 च्या खाली बंद झाला. हा गेल्या वर्षभरातील नीचांकी स्तर आहे. 19 फेब्रुवारीच्या उच्चांकापासून S&P 500 आता 19% खाली आला आहे. 20% घसरण झाल्यास तो ‘बेअर मार्केट’मध्ये प्रवेश करेल. गेल्या आठवड्यात S&P 500 कंपन्यांचे 5.8 ट्रिलियन डॉलर्सचं बाजार मूल्य गमावलं आहे. आशियाई बाजारांमध्येही, जपानच्या निक्केई आणि भारताच्या सेन्सेक्समध्ये मोठी विक्री दिसून आली असून आणखी घसरणीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का :

  1. टॅरिफमुळं जगभरात मंदीची भीती; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले "...तोपर्यंत मागे हटणार नाही"
  2. मैत्रीच्या नावाखाली अमेरिकेने भारतावर लादला 26 टक्के कर, जाणून घ्या काय परिणाम होणार?
  3. करार करा अन्यथा बॉम्ब हल्ले करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.