वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकलेल्या अमेरिकन अंतराळवीरांची जोडी मंगळवारी संध्याकाळी पृथ्वीवर परत येईल, असं नासानं म्हटलं आहे. रविवारी पहाटे आयएसएसवर (ISS) पोहोचलेल्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानातून बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना आणखी एका अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.
बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाची चाचणी त्यांच्या पहिल्या क्रू प्रवासात तांत्रिक समस्यांमुळे अडचण आली. त्यामुळे ते यान अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यास अयोग्य मानले गेले. त्यानंतर जूनपासून अडकलेले हे दोघे आयएसएसवर आहेत. नासाने रविवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटलं आहे की त्यांनी फ्लोरिडा किनाऱ्यावरून अंतराळवीरांचे आगमन (२१५७ जीएमटी) अंदाजे ५:५७ मिनिटांनी अपेक्षित आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचे आगमन बुधवारपर्यंत अपेक्षित नव्हते.
नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील ड्रॅगन कॅप्सूलमधूनच परततील. सोमवारी संध्याकाळी हॅच क्लोजरची तयारी सुरू झाल्यावर त्यांचा प्रवास थेट प्रक्षेपित केला जाईल. विल्मोर आणि विल्यम्ससाठी, ही हा एक दीर्घकाळानतर सुखद परतीचा प्रवास असेल. त्यांना अंतराळ स्थानकात नऊ महिने अडकून पडावे लागले होते. त्यांचा हा दीर्घकाळचा मुक्काम अंतराळवीरांसाठी साधारण सहा महिन्यांच्या मानक आयएसएस कालावधीपेक्षा खूपच जास्त होता.
दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, २०२३ मध्ये नासाचे अंतराळवीर फ्रँक रुबियो यांनी आयएसएसवर ३७१ दिवसांच्या दीर्घकाळ मुक्काम केला होता. तर मीर अंतराळ स्थानकावर ४३७ सतत दिवस घालवणाऱ्या रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांच्या जागतिक विक्रमापेक्षा हा खूपच कमी कालावधी आहे. तरीही, त्यांच्या कुटुंबांपासून लांब राहण्याच्या अनपेक्षित स्वरूपामुळे तसंच त्यांनी पुरेसे साहित्य बरोबर न घेतल्यामुळे अतिरिक्त कपडे आणि वैयक्तिक वापराच्या वस्तूंची कशीतरी सोय करावी लागली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सुनीता विल्यमच्या सुरक्षित परतण्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भारतीय वंशाची नासा अंतराळवीर सुनिता विल्यम्स या बुच विल्मोर यांच्यासह सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतील. नारायणन यांनी अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या प्रचंड प्रगतीवरही प्रकाश टाकला आणि अंतराळ संशोधनाच्या दिशेने देशाच्या वाटचालीवर त्यांचा दृढ विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा...