वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याचे भारतात प्रत्यार्पण (Narendra Modi US Visit ) करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, " माझ्या प्रशासनानं २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील कट रचणाऱ्यांपैकी एक आणि जगातील अत्यंत दुष्ट व्यक्तींपैकी एकाचं (तहव्वुर राणा) प्रत्यार्पण करण्याला मान्यता दिली आहे. तो भारतात परत जात आहे." तहव्वुर राणा याचं भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं अमेरिकेकडून जानेवारीत जाहीर करण्यात आलं होतं.
Addressing the press meet with @POTUS @realDonaldTrump. https://t.co/u9a3p0nTKf
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची ऑफर-भारत-चीनमध्ये सीमावाद असल्यानं अनेकदा तणाव निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. चीन-भारत आणि अमेरिका-रशिया हे दोन्ही काही दशकांपासून कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तरी ते एकत्रित राहू शकतात, असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला. उल्लेखनीय बाब म्हणजे ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा ट्रम्प यांची ऑफर भारतानं फेटाळली होती.
#WATCH | Mumbai, Maharashtra | On US President Donald Trump approved the extradition of 26/11 Mumbai attack accused Tahawwur Rana, Senior Advocate and BJP leader Ujjwal Nikam says, " ...this gives a strong signal to the entire globe because president trump wants to say that us… pic.twitter.com/pJvYZWN47U
— ANI (@ANI) February 14, 2025
संरक्षण उत्पादनांची भारतात विक्री वाढविणार- डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात सैन्यदलाला लागणाऱ्या संरक्षण उत्पादनांची भारताला विक्री करण्यावर जोर दिला. भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने विकण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. संपूर्ण जगाला धार्मिक कट्टर असलेल्या दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारत पूर्वीपेक्षा अधिक एकत्रितपणं काम करणार असल्याचं अमेरिकेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं.
अमेरिकेच्या अध्यक्षांचा ब्रिक्सला इशारा- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा सहभाग असलेल्या ब्रिक्स या संघटनेवर जोरदार हल्लाबोल केला. "जर ब्रिक्सनं चलन आणायचा प्रयत्न केला तर त्याच दिवशी त्यांच्यावर १०० टक्के आयात शुल्ल लागू करण्यात येणार आहे. बिक्सचा वाईट हेतू होता. आता ब्रिक्स संपलं आहे. डॉलरशी खेळ खेळू नका, असा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला.
काय आहे ब्रिक्सच्या चलनाचा वाद- ब्रिक्सकडून चलन जारी झाले तर डॉलरला त्या चलनाशी स्पर्धा करावी लागणार होती. तसेच ब्रिक्सचे चलन हे डॉलरसाठी पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वापरण्यात येण्याची अमेरिकेला भीती होती. असे असले तरी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिक्सचे चलन जारी होणार नसल्याचं म्हटलं होते. भारत हा ब्रिक्सचा संस्थापक देश आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रीय हित सर्वोच्च ठेवतात. त्यांच्याप्रमाणेच मीदेखील भारताच्या हिताला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य देतो. हे माझं भाग्य आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी
दोन्ही देश मानवतेच्या कल्याणासाठी काम करणार- पंतप्रधान मोदींनी अमेरिकेशी असलेले संबंध आणखी दृढ करण्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात पूर्वीपेक्षा गतीपेक्षा दुप्पट वेगाने काम करू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांमधील संबंधाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले,"अमेरिका ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. तर भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारत आणि अमेरिका एकत्र येतात तेव्हा १+१ हे २ होत नाहीत, तर ११ होतात. दोन्ही देश मानवतेच्या कल्याणासाठी काम करणार आहेत."
जगावर चांगले परिणाम होतील-डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याबद्दल ज्येष्ठ वकील आणि भाजपा नेते उज्ज्वल निकम म्हणाले"या निर्णयामुळे संपूर्ण जगाला एक कणखर संदेश मिळाला आहे. अमेरिका ही दहशतवाद्यांसाठी कधीच स्वर्ग राहणार नाही. अध्यक्षांच्या निर्णयावर जगावर दीर्घकालीन आणि चांगले परिणाम होईल. अशीच पावले ब्रिटिश सरकारनं उचलावीत अशी अपेक्षा आहे. कारण आर्थिक दहशतवादीदेखील इंग्लंडमध्ये अधिक वास्तव्य करत आहेत.
कोण आहे तहव्वुर हुसेन राणा- पाकिस्तानी कॅनेडियन दहशतवादी तहव्वुर हुसेन राणा हा शिकागोचा रहिवासी आहे. त्याला 2009 मध्ये मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात कट आखल्याच्या आरोपीवरून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या लष्कर ए तोएबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात 6 अमेरिकी नागरिकांसह 166 जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात तहव्वुर हुसेन राणाला देशात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा-