तेहरान/जेरुसलेम- इस्त्रायलनं पॅलेस्टाईनला धडा शिकविल्यानंतर आता इराणच्या दिशेनं मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी सकाळी इराणची राजधानी तेहरान आणि त्याच्या आसपासच्या भागात मोठे स्फोट झाल्यानं इराणसह मध्य पूर्वेत खळबळ उडाली. इराणचे काही वरिष्ठ अधिकारी
तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळासह इराणच्या नतान्झ आणि फोर्डो अणु प्रकल्पांमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. इस्रायलनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा पहिला हल्ला असल्याचं इस्त्रायलनं म्हटलं आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं (IDF) शुक्रवारी इराणमधील अनेक शहरांवर रात्रीच्या वेळी हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या तीन वरिष्ठ लष्करी नेत्यांना ठार मारल्याचा इस्त्रालयनं दावा केला.
200 हून अधिक लढाऊ विमानांनी हल्ला- इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे (आयआरजीसी) कमांडर आणि इराणच्या आपत्कालीन कमांडचे कमांडर हे सर्व ठार झाल्याचं इस्त्रायलच्या सैन्यदलानं म्हटलं आहे. ते हत्यारे असून त्यांचे हात रक्तानं माखलेले आहेत. त्यांच्याशिवाय जग चांगले असेल, असे आयडीएफएनं एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. इस्रायलनं इराणवर 200 हून अधिक लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचाही दावा केला.
इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर- इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले कधीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत इस्रायल पूर्णपणे तयार आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी इस्त्रायल तयार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणला दिला. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
लक्ष्य ठेवून लष्करी कारवाई- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं, इस्रायलनं काही वेळपूर्वीच ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केलं आहे. इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून धोका आहे. हा धोका दूर करण्यासाठी एक लक्ष्य ठेवून लष्करी कारवाई केली आहे. इराणपासून असलेला धोका दूर होईपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.
अमेरिकन नागरिकांना पश्चिम आशियातून परत येण्याची सूचना- उल्लेखनीय बाब म्हणजे हल्ल्याच्या काही तासापूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधताना मध्य पूर्वेत भयंकर संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "हल्ला लगेच होईल, असे मी म्हणत नाही. पण, हल्ला नक्कीच होऊ शकतो. इस्रायलचा इराणवर हल्ला कधीही होऊ शकतो याची अमेरिकन अधिकाऱ्यांना चिंता आहे." इराण आणि इस्त्रायलमध्ये तणावाची स्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना पश्चिम आशियातून परत येण्याची सूचना केली आहे.
मध्य पूर्वेतील शांततेला सुरूंग लागण्याचा धोका- इराणकडून आण्विक कराराचं पालन होत नसल्याचा ठराव आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं (IAEA) केला होता. इराणनं आण्विक कार्यक्रम वेगानं करण्याची घोषणा दिली असताना इस्त्रायलनं ही कारवाई केली आहे. इराण आणि इस्त्रायलमध्ये क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले आणि सायबर हल्ले होऊन मध्य पूर्वेतील शांततेला सुरूंग लागण्याचा धोका आहे.
हेही वाचा-