फ्लोरिडा (वॉशिंग्टन) - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला देण्यात येणाऱ्या २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ( 21 Million USD Fund) निधीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट नाव न घेता बायडेन सरकारकडून भारतात दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप केला. ते फ्लोरिडातील मियामी येथे झालेल्या FII प्रायोरिटी समिटला संबोधित करताना बोलत होते.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप झाल्याचा आरोप झाला होता. त्याचा उल्लेख करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामधील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न झाल्याचं अप्रत्यक्षपणं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "भारतात मतदारांच्या मतदानासाठी आपल्याला २१ दशलक्ष डॉलर खर्च करण्याची आवश्यकता आहे का? ते (बायडेन सरकार) दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते, असे मला वाटते. हे भारत सरकारला सांगावं लागेल. कारण रशियानं आपल्या देशात सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केले होते."
भारतात जास्त कर- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्यानं भारताकडून लागू करण्यात येणाऱ्या आयातशुल्काबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत ट्रम्प म्हणाले, " भारताला मदत देण्यात येणार होती. मात्र, भारताची मजबूत आर्थिक स्थिती आहे, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधलं. अमेरिकन वस्तुंवर भारतात जास्त कर आहे. त्यांना खूप पैसा मिळाला आहे. अमेरिकेच्या बाबतीत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी भारत आहे. भारतात जास्त कर असल्यानं अमेरिका तिथे पोहोचू शकत नाही."
भारताबद्दल खूप आदर- यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ते म्हणाले, " दोन दिवसांपूर्वीच ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) निघून गेले. पण, आम्ही भारतामधील मतदानासाठी २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देत आहोत. मला भारताबद्दल खूप आदर आहे. मला पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. पण, आम्ही मतदारांच्या मतदानासाठी २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देत आहोत. भारतात मतदारांच्या मतदानाच्या टक्केवारासाठी पैसे द्यायचे. पण, येथील मतदारांच्या टक्केवारीचे काय?"
काय आहे भारताला मदत देण्याचं प्रकरण? अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या कार्यक्षमता विभागानं (Dodge) भारतातील मतदारांच्या मतदानासाठी बायडेन सरकारनं राखून ठेवलेला २१ दशलक्ष डॉलरचा निधी देण्याचा निर्णय रद्द केला. त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत ही एक वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं सांगत तेथील मतदान वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता नसल्याचं यापूर्वीच म्हटलं.
मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा कुणाला फायदा? १६ फेब्रुवारी रोजी एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डॉजनं रद्द केलेल्या उपक्रमांची यादी जाहीर केली. यामध्ये भारतामधील मतदानाच्या टक्केवारीसाठी २१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा उल्लेख होता. अमेरिकन करदात्यांकडून पैसे घेऊन विदेशात करण्यात येणारे अनावश्यक खर्च ट्रम्प प्रशासनाकडून थांबविण्यात येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं इतर देशांना देण्यात येणारी मदतदेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते मालवीय यांनी अमेरिकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत देशातील निवडणूक प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. मतदानाच्या टक्केवारीसाठी २१ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात येणार होते. याचा फायदा नक्कीच सत्ताधारी पक्षाला होत नाही, असा आरोप भाजपा प्रवक्त्यानं केला.
हेही वाचा-