ETV Bharat / international

इराणच्या बंदर अब्बास शहरात स्फोट; ५०० हून अधिक लोक जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती - BANDAR ABBAS BLAST

इराणमधील बंदर अब्बास या समुद्र किनाऱ्यावरील शहरात मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात आणि आगीत किमान ५१६ लोक जखमी झालेत. काहींचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ANI

Published : April 26, 2025 at 7:15 PM IST

1 Min Read

बंदर अब्बास (इराण) : राजधानी तेहरानपासून १,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या इराणी बंदर अब्बास येथे आज शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात ५१६ लोक जखमी झाले. या ठिकाणी स्फोटानंतर मोठी आग लागल्यानं लोकांना त्याची मोठी झळ पोहोचली, असं अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक माध्यमांनी सांगितल्याचं वृत्त अल जझीराने दिलं आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी शनिवारी इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील होर्मोज्गान प्रांतात असलेल्या देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक बंदर शाहीद राजाई येथे "मोठा स्फोट" झाल्याचं वृत्त दिलं आहे. यात काहीजण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जखमींना जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवण्यात आलं आहे. इराणी सरकारी दूरचित्रवाणीने सांगितलं की, सुरुवातीच्या बातमीत घटनास्थळी ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणा असल्याचं दिसून आलं आहे. तर तेहरान टाईम्सने वृत्त दिलं आहे की अनेक कंटेनरचा स्फोट हा स्फोटाचं मूळ कारण होता. होर्मोज्गान प्रांताच्या संकट व्यवस्थापन संघटनेचे संचालक मेहरदाद हसनजादेह यांनी सरकारी दूरचित्रवाणीला सांगितलं की, अल जझीराच्या वृत्तानुसार, जखमींना वैद्यकीय सुविधांमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की सुरक्षा अधिकाऱ्यांनी यापूर्वी घटनेच्या ठिकाणी भेट दिली होती आणि सुरक्षा सूचना जारी केल्या होत्या.

नॅशनल इराणी ऑइल प्रोडक्ट्स रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीने स्फोटानंतर एक निवेदन जारी केलं, ज्यामध्ये म्हटलं आहे की, परिसरातील तेल सुविधांवर स्फोटाचा परिणाम झाला नाही. "शाहिद राजाई बंदरातील स्फोट आणि आगीचा या कंपनीशी संबंधित रिफायनरीज, इंधन टाक्या, वितरण संकुल आणि तेल पाइपलाइनशी कोणताही संबंध नाही," असं कंपनीने म्हटलं आहे. यापूर्वी, होर्मोजगन बंदरे आणि सागरी प्रशासनाचे अधिकारी इस्माईल मलेकीजादेह म्हणाले होते की हा स्फोट शाहिद राजाई बंदर गोदीजवळ झाला.

या ठिकाणी जखमींची मदत करताना आणि मालमत्तेचे नुकसान तपासताना परिसरात अनेक लोक दिसले. शाहिद राजाई बंदर प्रामुख्याने कंटेनर वाहतूक हाताळते आणि त्यात तेल टाक्या आणि इतर पेट्रोकेमिकल पदार्थ देखील आहेत. मे २०२० मध्ये, इस्रायलवर त्याच बंदरावर मोठा सायबर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे सुविधेची संगणक प्रणाली क्रॅश झाल्यानंतर दिवसभर वाहतूक गोंधळ निर्माण झाला होता. अल जझीराने वृत्त दिलं की, इराणी अधिकारी संभाव्य नवीन अणु करारावर युनायटेड स्टेट्स अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना हा स्फोट एका संवेदनशील वेळी झाला आहे.

हेही वाचा...

  1. अमेरिका इराणशी करणार थेट चर्चा; ट्रम्प म्हणाले, .....अण्वस्त्र विकसित केली तर खबरदार
  2. करार करा अन्यथा बॉम्ब हल्ले करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.