ETV Bharat / health-and-lifestyle

world liver day 2025: यकृताचे कार्य सुरळीत ठेवण्याकरिता 'हा' आहार आहे सर्वोत्तम - WORLD LIVER DAY

world liver day 2025: यकृताच्या आजारांबद्दल लोकांना जागरूकता यावी म्हणून दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. वाचा सविस्तर

WORLD LIVER DAY 2025  WORLD LIVER DAY 2025 THEME  HOW TO PROTECT LIVER NATURALLY  HOW TO MAINTAIN HEALTHY LIVER
जागतिक यकृत दिन २०२५ (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : April 19, 2025 at 3:27 PM IST

3 Min Read

World liver day 2025: लोकांना यकृताचे महत्त्व कळावे आणि त्याच्या गंभीर जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करता यावे यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. तसेच या दिवशी लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते.

WORLD LIVER DAY 2025  WORLD LIVER DAY 2025 THEME  HOW TO PROTECT LIVER NATURALLY  HOW TO MAINTAIN HEALTHY LIVER
जागतिक यकृत दिन २०२५ (Getty Images)
  • यंदाची थीम: शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. यामुळे यकृताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या वर्षी जागतिक यकृत दिनाची थीम 'अन्न हेच औषध' आहे. यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे नेहमी योग्यरित्या कार्य करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही यकृताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर ते तुमच्या आयुष्यासाठी ते फार धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे यकृताचे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. तसचं यकृत निकामी देखील होऊ शकतो. मात्र, खाण्याच्या योग्य सवयीमुळे यकृत निरोगी ठेवता येवू शकते.
  • यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत: या संदर्भात, चंदीगड पीजीआयचे प्राध्यापक आणि हेपॅटोलॉजी विभागाचे प्रमुख अजय दुसेजा यांनी ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधताना सांगितले की, लोकांना जागरूक करण्यासाठी आपण जागतिक यकृत दिन साजरा करतो. गेल्या काही काळापासून यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत. म्हणून, अशा परिस्थितीत यकृतासंबंधित जनजागृती करणे गरजेचं आहे.
  • चांगले खाल्ले तर तुमचे यकृत निरोगी राहील: यकृताची अनेक कार्ये असतात. त्यापैकी एक म्हणजे अन्न पचवण्यास मदत करणे. तुम्ही जे काही खाता ते पचवण्यासाठी यकृत मदत करते. यकृत पचनसंस्थेशी संबंधित आहे. जर चांगले अन्न खाल्लं तर यकृताचे कार्य देखील सुरळीत चालते. परिणामी रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • भूमध्यसागरीय आहार यकृतासाठी सर्वोत्तम आहे: यकृतासाठी सर्वोत्तम अन्नाबद्दल बोलायचे झाले तर, वनस्पती-आधारित आहार यकृतासाठी चांगले आहे. फळे, भाज्या आणि डाळी आपल्या यकृतासाठी चांगल्या असतात. आजकाल लोक यकृत निरोगी ठेवण्यासाठी भूमध्यसागरीय आहारावर लक्ष केंद्रित करत आहेत. भूमध्यसागरीय आहार हा भूमध्य समुद्रातील देशांच्या पारंपारिक खाद्यपदार्थांवर आधारित आहे. या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, काजू, कडधान्ये, मासे, कोंबडी, अंडी आणि निरोगी चरबी यांचा समावेश आहे. यामध्ये लाल मांस, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचे सेवन केले जात नाही.
  • तळलेले, जास्त कॅलरी असलेले अन्न टाळा: आजकाल जीवनशैलीतील बदलांमुळे लोकांना अधिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोक जास्त कॅलरीज असलेले अन्न खातात. यामुळे कॅलरीज बर्न होत नाही. तसंच शारीरिक हालचालींचा अभाव वाढत आहे. या गोष्टी यकृत आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी चांगल्या नाहीत. यामुळे शरीरात चरबी जमा होते. त्याचबरोबर तळलेले पदार्थ, गोड पेये, बेकरी उत्पादने, साखर, कोला पेये यकृतासाठी चांगली नाहीत.
  • दारूमुळे यकृताचे नुकसान: डॉ. अजय दुसेजा यांच्या मते, त्यांच्याकडे यकृतांशी संबंधित येणारे रूग्ण बहुतेक मद्यपान करणारे असतात. यामुळे यकृताचे नुकसान होते. त्याला अल्कोहोलशी संबंधित यकृत रोग म्हणतात. याशिवाय आणखी दोन कारणे समोर आली आहेत. यामध्ये फॅटी लिव्हरचा समावेश आहे, जो जास्त कॅलरीजच्या सेवनामुळे होतो. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलमुळे यकृतामध्ये चरबी जमा होत असल्याने यकृताला चरबीयुक्त बनवतात. तिसरे कारण म्हणजे विषाणू ज्यामध्ये हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी विषाणू देखील यकृताच्या आजाराचे कारण बनू शकतात.
  • यकृत निकामी होण्याची लक्षणे
  • जास्त थकवा
  • डोळ्यांचा आणि त्वचेचा रंग बदलणे
  • कावीळ
  • भूक न लागणे
  • लघवीचा रंग बदलणे, तो गडद होणे
  • मळमळ आणि उलट्या
  • वारंवार बद्धकोष्ठता
  • खाज सुटणे आणि पुरळ येणे
  • यकृताचे नुकसान कसे ओळखावे?: यकृताच्या समस्येच्या बाबतीत, सर्वप्रथम तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर यकृत चांगलं आहे की नाही. हे तपासण्याकरिता चाचण्या लिहून देतात. ज्याद्वारे यकृत कसे कार्य करत आहे हे पूर्णपणे स्पष्ट होते. यामध्ये सर्वात सामान्य चाचणी म्हणजे यकृत कार्य चाचणी म्हणजेच एलएफटी. यामध्ये, रक्त तपासणीद्वारे अनेक गोष्टी मोजल्या जातात ज्यामुळे यकृताच्या समस्या शोधण्यास मदत होते. तसंच, कधीकधी पोटाच्या काही समस्या असल्यास, डॉक्टर अल्ट्रासाऊंड स्कॅन देखील करतात ज्याद्वारे फॅटी लिव्हर सहजपणे शोधता येते. परंतु या सर्व चाचण्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली कराव्यात.

संदर्भ

https://liverfoundation.org/health-and-wellness/healthy-lifestyle/liver-disease-diets/

https://www.hopkinsmedicine.org/health/wellness-and-prevention/5-ways-to-be-kind-to-your-liver

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.