ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक प्रथमोपचार दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्व - World First Aid Day 2024

World First Aid Day 2024: प्रथमोपचाराचं महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या प्रथोमपचार दिवसाचा इतिहास, महत्व आणि थीम...

author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 14, 2024, 11:41 AM IST

Updated : Sep 14, 2024, 1:45 PM IST

World First Aid Day 2024
जागतिक प्रथमोपचार दिवस (Getty Images)

हैदराबाद World First Aid Day 2024 : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो. कोणत्याही शारीरिक व्याधिंवर उपचार करण्यापूर्वीची पहिली पायरी म्हणजे प्रथमोपचार. प्रथमोपचाराचं महत्व लोकांना समजावं या उद्धेशानं जगभरात हा दिवस साजरा केला जातो. आजारी व्यक्तीस डॉक्टरांकडं नेण्यापूर्वी प्रथमोपचार दिल्यास पुढील उपचार घेण्यासाठी त्यांना मदत होते. यामुळे प्रथमोपचाराबद्दल सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे.

इतिहास : सन 1859 मध्ये ऑल्फेरिनोच्या लढाईमध्ये हेन्री ड्युनंट नावाचा तरुण व्यापारी हत्याकांडानं भयभीत झाला. या घटनेचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्यांनी ए मेमरी ऑफ सॉल्फेरिनो नावाच्या पुस्तकामध्ये त्याचा अनुभव लिहीला. त्यानंतर सन 2000 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अ‍ॅण्ड क्रिसेंट सोसायटी या संस्थेनं जागतिक प्रथमोपचार दिवस घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो.

या वर्षीची थीम : दरवर्षी हा दिवस वेगवेगळ्या थीमनुसार साजरा केला जातो. ''प्रथमोपचार आणि खेळ'' ही यावर्षीच्या जागतिक प्रथमोपचार दिनाची थीम आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये प्रथमोपचाराची भूमिका किती महत्वाची आहे, याबद्दल जाणीव करुन देणं हा या मागील उद्देश आहे.

अशा प्रकारे तयार करा प्रथमोपचार किट

कोणतंही रिकामे कंटेनर घ्या. त्याला पूर्णपणे स्वच्छ करा. वरच्या बाजूला टेप किंवा पेंटने क्रॉस तयार करून चिन्हांकित करा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत बॉक्स ओळखण्यास मदत होईल. यामध्ये बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, ताप, जुलाब आणि डोकेदुखीचं औषधं, वेदना आराम स्प्रे, गरम पट्टी, बर्नॉल, अँटी ऍसिड, डेटॉल आणि अँटी बॅक्टेरियल क्रीम यासारख्या काही महत्त्वाच्या वस्तू ठेवा. तुम्ही प्रथमोपचार पेटी तयार करताना मुलांची देखील मदत घेऊ शकता. कारण यामुळे त्यांच्यात याबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि ते देखील जागृत होतील.

प्रथमोपचाराची उद्दिष्टे:

जखमी व्यक्तीचे प्राण वाचवणे

जखमी व्यक्तीला वाईट परिस्थितीतून बाहेर काढणे

आरोग्य प्रोत्साहन

प्रथमोपचाराचे महत्व

प्राण वाचू शकते: एखाद्याचा अपघात झाल्यास जास्त रक्तस्रावामुळे अनेकदा रुग्णाचा मृत्यू होतो. परंतु दुखापत झाल्यानंतर प्रथोपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

वेदना कमी होवू शकतात: अपघतांमुळे किंवा इतर कारणांमुळे झालेल्या जखमा खूप वेदना देतात. वेदना कमी करण्यासाठी प्रथमोपचार आवश्यक आहे.

रिकवरी टाईम कमी : प्रथमोपचारामुळे जखम बरे होण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो.

हेल्थकेअर खर्च कमी करणे: वेळेवर प्रथमोपचार केल्याने नंतर अधिक व्यापक आणि महागड्या वैद्यकीय उपचारांची गरज कमी होऊ शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

Source

https://www.pacehospital.com/world-first-aid-day

https://firstaidchampions.redcross.org.uk/en/about/news/world-first-aid-day-2024/

हेही वाचा

  1. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - World Suicide Prevention Day 2024
  2. 'नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान' राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा का साजरा केला जातो; जाणून घ्या महत्व - Eye Donation Fortnight 2024

Last Updated : Sep 14, 2024, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.