ETV Bharat / health-and-lifestyle

गरोदर महिलांनी कामाच्या ठिकाणी घ्यावी ही काळजी; आईसह बाळाचं आरोग्य राहिल सुरक्षित

गरोदर महिलांना स्वत:च्या आरोग्यासोबतच बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. परंतु काम करणाऱ्या महिलांसाठी हे कठीण असते. मात्र, काही टिप्स पाळल्यास आरोग्य चांगलं राहते.

WORK AND PREGNANCY  HOW TO MANAGE WORK DURING PREGNANCY  HEALTHY PREGNANCY TIPS  PREGNANCY AT WORK
गरोदर महिलांनी कामाच्या ठिकाणी घ्यावी ही काळजी; आईसह बाळाचं आरोग्य राहिल सुरक्षित (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : July 24, 2025 at 6:12 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Work and Pregnancy: गर्भधारणेचा संपूर्ण प्रवास प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळे अनुभव घेऊन येतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांत, महिलेलांमध्ये भावनिक, शारीरिक, मानसिक, हार्मोनल असे अनेक बदल होतात. हा काळ नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फार कठीण असतो. कारण या काळात नोकरी करणाऱ्या महिलेला स्वत:च्या आरोग्यासह गर्भशयातील बाळाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. गर्भाशयातील बाळासह स्वत:ची जीवनशैली आणि ऑफिसचे काम व्यवस्थित करणे या दोन गोष्टी त्यांना एकत्र कराव्या लागतात. असा परिस्थितीत महिलांच्या जबाबदाऱ्या दुप्पट होतात. कधीकधी योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. म्हणून, नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांनी त्यांचा गर्भधारणेचा प्रवास सोपा आणि अधिक सुंदर करण्यासाठी काही टिप्स फॉलो करणे गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया गर्भधारणेचा प्रवास सुरळीत करण्यासाठी जॉब करणाऱ्या महिलांनी कोणती काळजी घेणे गरजेचं आहे.

WORK AND PREGNANCY  HOW TO MANAGE WORK DURING PREGNANCY  HEALTHY PREGNANCY TIPS  PREGNANCY AT WORK
गरोदर महिलांनी कामाच्या ठिकाणी घ्यावी ही काळजी; आईसह बाळाचं आरोग्य राहिल सुरक्षित (Getty Images)
  • पौष्टिक अन्न खा: गरोदर महिला जे काही खातात ते गर्भाशयातील बाळाच्या विकासासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून असं म्हटलं जाते की, महिलांनी या काळात शक्य तितके पौष्टिक अन्न खावे. पौष्टिक आहार म्हणजे तुमच्या अन्नात सर्व आवश्यक पोषक तत्वे योग्य प्रमाणात असणे. या काळात महिलांनी ताजी फळं, भाज्या, काजू, सुकामेवा, डाळी, दूध, दही इत्यादींचा समावेश करणे महत्वाचे आहे. कारण यामध्ये प्रथिने, फायबर, खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जे आई आणि गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
  • काम करणाऱ्या महिलांनी गर्भधारणेदरम्यान घरातील पौष्टक अन्न आणि पचन्यास पुरक असलेले अन्न स्वत: सोबत घेऊन जावं. बाहेरचं तळलेले आणि पॅकेजिंग युक्त अन्न खाणं टाळावं.
  • शरीर हायड्रेटेड ठेवा: गर्भधारणेदरम्यान महिलांनी पुरेसे पाणी पिणे फार गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. महिलांना थकवा जाणवू शकतो. यामुळे महिलांनी गरोदरपणात दिवसभर किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे असं तज्ञ म्हणतात. महिला काम करताना ताज्या फळांचा रस, नारळ पाणी इत्यादी पिऊ शकतात. यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते आणि दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तसंच पुरेसं पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान देखील नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरात पाण्याचे प्रमाण सुरळीत राहिल्यास रक्ताभिसरण सुधारते. परिणामी बाळ आणि आई दोघांचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आणि दोघांनाही पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळू शकतात.
  • दररोज स्ट्रेचिंग करा: नोकरी करणाऱ्या महिलांनी दिवसभर बसून काम करावं लागतं. यामुळे गरोदर महिलांना पाठ आणि कंबरदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत दर अर्ध्या तासाने ५ मिनिटांचा ब्रेक घेऊन हलकी स्ट्रेचिंग किंवा चालणे गरेजचं आहे. नियमितपणे हलका व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. यामुळे आईसह बाळ देखील निरोगी राहण्यास मदत होते.
  • जास्त ताण घेणे टाळा: गरोदरपणात महिलांनी नेहमी हॅपी राहावं. परंतु बऱ्याच महिलांना मानसिक स्थितीतून जातात. यामुळे त्याच्या बाळावर विपरीत परिणाम होतो. म्हणून गरोदर महिलांनी नेहमी आनंदी राहावं. घरातील तसंच ऑफिसमधील जास्त ताण घेऊ नये. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी गरोदर महिलांनी नियमित ध्यान आणि योगासने करावीत. तसंच आवडत्या गोष्टी करण्यास प्राधान्य द्यावे. जसे की, गाणे ऐकणे, वाचन करणे, जर्नल लिहणे, चित्र काढणे अशा एक ना अनेक अक्टीव्हिटी गरोदर महिला करू शकतात. यामुळे तुमचा ताण तर कमी होण्यास मदत होईल शिवाय तुम्ही तुमच्या बाळाचा सर्व पैलूंमध्ये विकास होण्यास मदत होईल.
  • वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्या: गर्भधारणेदरम्यान, एका महिलेला दर महिन्याला तिच्या शरीरात विविध बदल अनुभवायला मिळतात, जे अगदी सामान्य आहे, परंतु तपासणी करत राहणे महत्वाचे आहे. या काळात डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावं.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.nhs.uk/pregnancy/keeping-well/your-health-at-work/#:~:text=Coping%20with%20pregnancy%20symptoms%20at%20work&text=Try%20to%20use%20your%20lunch,another%20job%20cleaning%20and%20cooking.

हेही वाचा