ETV Bharat / health-and-lifestyle

टॅावेलनं चेहरा पुसणे हानिकारक; जाणून घ्या कसे? - SKIN CARE TIPS

आपल्यापैकी बरेज जण चेहरा पुसण्यासाठी बॉडी टॉवेलचा वापर करतात. परंतु असं करणं हानिकारक ठरू शकत वाचा सविस्तर..,

STOP USING BODY TOWEL ON YOUR FACE  TIPS FOR HEALTHY SKIN  CAN YOU USE A BODY TOWEL ON FACE
चेहरा पुसण्याकरिता कोणते टॉवेल योग्य (Getty Images)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : March 24, 2025 at 12:50 PM IST

2 Min Read

Can You Use A Body Towel On Face: बहुतेक लोक आंघोळीनंतर शरीर आणि चेहरा पुसण्यासाठी तीच टॉवेल वापरतात. हे सर्वात नॉर्मल आहे आणि आपल्यापैकी बरेच जण असं करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? या सवयीचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो? तज्ञांच्या मते, चेहरा पुसण्यासाठी कापूस किंवा मायक्रोफायबरसारख्या मऊ टॉवेलचा वापर करणे चांगले. यामुळे त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहण्यास मदत होईल. कारण चेहऱ्यावर बॉडी टॉवेल वापरल्याने त्वचेवर जळजळ, मुरुमे आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसंच यामुळे त्वचेला भेगा पडू शकतात त्याचबरोबर चेहऱ्यावर डाग देखील पडू शकतात. याचा परिणाम त्वचेच्या एकूण आरोग्यावरही होऊ शकतो. ते कसं सविस्तर जाणून घेऊया.

STOP USING BODY TOWEL ON YOUR FACE  TIPS FOR HEALTHY SKIN  CAN YOU USE A BODY TOWEL ON FACE
चेहरा पुसण्याकरिता कोणते टॉवेल योग्य (Getty Images)
  • मुरुम आणि ब्रेकआउट्स वाढतात: ब्रेकआउट आणि मुरुमाची समस्या असलेल्या व्यक्तींनी त्याच टॉवेलनं चेहरा पुसल्यास या समस्या वाढू शकतात. आपण वापरत असलेले टॉवेल हार्ड अशू शकतात. टॉवेलनं चेहरा पुसताना तो चेहऱ्यावर घासला जातो. परिणामी मुरुम वाढण्याची दाट शक्यता असते.
  • बॅक्टेरिया पसरतात: काख तसंच इतर ठिकाणी बॅक्टेरिया जमा असण्याची शक्यता जास्त असते. आपण आंघोळ केल्यानंतर टॉवलनं संपूर्ण अंग पुसून काढतो. जर आपण तोच टॉवेल चेहरा पुसण्यासाठी वापरला तर इतर भागातील बॅक्टेरिया आणि जंतू चेहऱ्यावरील त्वचेवर परण्याची दाट शक्यता असते. यामुळे संसर्ग तसंच त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
  • तेल, लोशन, साबण: शरीरावर वापरलेले बॉडी लोशन, तेल आणि साबण टॉवेलवरच राहण्याचा धोका जास्त असतो. म्हणून जेव्हा तुम्ही त्याच टॉवेलने तुमचा चेहरा पुसता तेव्हा या सर्व गोष्टी तुमच्या त्वचेला चिकटू शकतात. यामुळे मुरुमांसह त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
  • खडबडीत टॉवेल: शरीराचे टॉवेल बहुतेकदा चेहऱ्याच्या टॉवेलपेक्षा जाड आणि खडबडीत असतात. यामुळे त्वचेवर जास्त दाब पडतो. यामुळे नियमितपणे या टॉवेलनं चेहरा पुसल्यास तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात किंवा कालांतराने त्याची लवचिकता कमी होऊ शकते.
  • मायक्रोफायबर टॉवेल वापरा: टॉवेल वापरणं आपण सोडू शकत नाही. परंतु चेहरा पुसण्यासाठी सामान्य टॉवेलचा उपयोग केल्यास त्याचे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकता. मात्र, चेहऱ्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरा कारण खास चेहऱ्यासाठी डिझाइन केलेले मायक्रोफायबर टॉवेल अतिशय मऊ आणि चेहऱ्याला कुठलीही हानी न करता आर्द्रता शोषण्याच्या क्षमतेसाठी उत्तम आहे. तसंच हे टॉवेल सामान्य टॉवेलपेक्षा अधिक स्वच्छ असतात आणि त्यांना धुऊन पुन्हा वापरता देखील येते.

चेहरा पुसताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  • चेहरा पुसण्यासाठी मऊ टॉवेल किंवा डिस्पोजेबल कॉटन पॅड वापरा.
  • दररोज तुमचा चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.
  • तुमच्या त्वचेवरील पाणी पुसण्याऐवजी ते टॅप करा
  • टॉवेल स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि हायपोअ‍ॅलर्जेनिक डिटर्जंट वापरा.
  • नैसर्गिक किंवा सेंद्रिय डिटर्जंटसह सर्व प्रकारचे डिटर्जंट वापरताना काळजी घ्या.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.