ETV Bharat / health-and-lifestyle

गरोदर होण्याचं योग्य वय कोणतं? तज्ज्ञांच्या मते, कोणत्या वयानंतर बाळ जन्मण्यास होते कठीण?

प्रेंगन्सीबद्दल अनेक महिला गोंधळात असतात. यामुळे कोणत्या वयात प्रेग्नंट रहावं याबद्दल तज्ञांनी काही माहिती दिली आहे. वाचा सविस्तर..,

RIGHT AGE TO PLAN FOR A BABY  RISKS AND AGE OF PREGNANCY  RIGHT AGE FOR PREGNANCY
गरोदर होण्याची योग्य वय कोणतं? (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : February 17, 2025 at 5:56 PM IST

|

Updated : February 17, 2025 at 7:46 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Right Age For Pregnancy: वय वाढत असताना, स्त्रीची प्रजनन क्षमता हळूहळू कमी होते, ज्यामुळे गरोदर राहणे कठीण होते. वाढत्या वयात आई होण्यामुळे गर्भधारणेशी संबंधित धोके आणि गुंतागुंत निर्माण होऊ निर्माण होवू शकते. अलिकडच्याच एका लोकप्रिय पॉडकास्टमध्ये, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी दरोदरपणा आणि गरोदरपणामध्ये येणाऱ्या समस्या तसंच आई होण्याच्या सामाजिक दबावांबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. या पॉडकास्टमध्ये त्यांनी गरोदर राहण्यासाठी योग्य वय काय आहे यावर सखोल चर्चा केली.

त्यांच्या मते, महिलांसाठी गरोदर होण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे 28 वर्षे वय आहे, परंतु आजकाल 30 ते 35 वर्षे वय देखील व्यावहारिक मानले जाते. डॉ. नंदिता म्हणतात की महिलांसाठी वय खूप महत्वाचे आहे, वयाच्या 28 व्या वर्षी अंड्यांची संख्या कमी होऊ लागते आणि विज्ञानाने देखील हे सिद्ध केलं आहे. मात्र, 35 वर्षांनंतरही गर्भवती राहणे शक्य आहे. परंतु ही प्रक्रिया अधिक कठीण असू शकते.

2002 च्या एका अभ्यासानुसार, पहिल्या मुलाच्या जन्मासाठी आदर्श वय 30.5 वर्षे आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, पहिल्या मुलाच्या जन्मासाठी आदर्श वय सुमारे 27 वर्षे आहे. 2016 च्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, 30 च्या दशकातील महिलांची प्रजनन क्षमता सर्वोत्तम आहे. तर 20 च्या दशकातील महिलांची प्रजनन क्षमता खूपच कमी होती.

  • गर्भधारणेसाठी योग्य वय काय आहे?

अनेक वैज्ञानिक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, गरोदर होण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे महिला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मातृत्वासाठी तयार असते ती होय. गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वय म्हणजे 25 ते 35 वर्षे आहे. कारण या वयात महिलांची प्रजनन क्षमता सर्वोत्तम असते. 35 वर्षांनंतर गरोदत राहण्यात अडचणी येऊ शकतात.

वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की 20 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 30 च्या दशकाच्या सुरुवातीला गर्भवती राहणे शारीरिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टने 2008 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, या वयात गरोदर राहिल्यास गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. डॉ. नंदिता पोळशेतकर म्हणतात की, आजकाल महिला 30 वर्षांच्या आधी लग्न करत नाहीत, त्यामुळे 30 ते 35 वयोगटातील पहिलं मूल होणे ही एक चांगली आणि व्यावहारिक मर्यादा असू शकते.

  • 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना जन्म देण्याची शक्यता

काही अभ्यासातून असेही दिसून आलं आहे की, काही प्रकरणांमध्ये, उशिरा आई होणे फायदेशीर ठरू शकते. 2012 च्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, ज्या महिलांनी 40 किंवा त्याहून अधिक वयाच्या शेवटच्या मुलाला जन्म दिला त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होती. वयाव्यतिरिक्त, आई होण्यासाठी इतर अनेक घटक खूप महत्वाचे आहेत, जसे की, मुलासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असणे. प्रत्येक स्त्रीसाठी हा काळ वेगळा असतो.

  • वयाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम

एक स्त्री तिच्या संपूर्ण आयुष्यात सुमारे 20 लाख ओव्हम तयार करते आणि वयानुसार ओव्हमची संख्या कमी होते. 37 वर्षांच्या वयात फक्त पंचवीस हजार ओव्हम उरतात आणि 51 वर्षांच्या वयात 1000 ओव्हम उरतात. तसंच या ओव्हमचा दर्जाही कालांतराने खराब होवू लागतो. परिणामी वंध्यत्व येवू शकते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

Last Updated : February 17, 2025 at 7:46 PM IST