omad diet for weight loss: बदलती जीवनशैली, खाण्याच्या वाईट सवयी आणि नगण्य शारीरिक हालचालींमुळे मोठ्या संख्येने लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. जगभरात लठ्ठपणा ही एक सामान्य आणि गंभीर समस्या बनत चालली आहे. वजन वाढल्यामुळे अनेक आजार न कळत शरीरात शिरकाव करतात. ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, कोलस्ट्रॉल आणि काही प्रकरच्या कर्करोगांचा समावेश आहे. मात्र वाढत्या समस्येसह लोक फिटनेसबद्दल देखील जागरूक होत आहेत. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जिम आणि व्यायाम करत आहेत. काही जण सकाळ सायंकाळ धावत किंवा वेगाने चालत आहेत. परंतु, वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम आवश्यक नाही, त्यासाठी योग्य आहार घेणे देखील आवश्यक आहे.

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक इंटरमिटंट फास्टिंग पद्धत मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहेत. ही पद्धत सेलिब्रिटींमध्येही खूप लोकप्रिय आहे. परंतु OMAD फास्टिंग देखील वजन कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अनेक लोक या फास्टिंगचाही अवलंब करत आहेत. चला तर पाहूया OMAD फास्टिंग काय आहे आणि त्याचे फायदे काय
- OMAD फास्टिंग म्हणजे काय? OMAD फास्टिंग म्हणजे One Meal A Day ज्याला 23:1 असंही म्हटलं जातं. या फास्टिंगमध्ये दिवसातून एकदाचं जेवण केले जाते आणि 23 तासांत फक्त पाणी किंवा डिटॉक्स वॉटर पिलं जावू शकते. हा डाएट वजन झपाट्यानं कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त चयापचय गतिमान करण्यासाठी देखील हे उत्तम आहे. ही पद्धत इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि हार्मोन्स नियंत्रित करते.
- OMAD आहार कसा घ्यावा:आहारतज्ञ दीपशिखा शर्मा यांनी आपल्या शोसल मिडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी OMAD फास्टिंग काय आहे याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणतात या आहारापद्धतीत तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करता आणि फक्त एकदाच जेवण करता आणि हे तुमचे संतुलित जेवण आहे. म्हणजे तुम्हाला एकदाच जेवावं लागेल आणि त्याच जेवणात तुम्हाला आवश्यक असलेल्या कॅलरीज घ्याव्या लागतील. उर्वरित 23 तास तुम्ही फक्त पाणी किंवा डिटॉक्स वॉटर पिऊ शकता.
- OMAD आहाराचे फायदे
- वजन कमी होते: बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी ओमेड डाएट फॉलो करतात. कारण यामध्ये फक्त एकदाच अन्न खाल्ल जाते तसंच या जेवणात कॅलरीजचे प्रमाण जास्त नसते. हा आहार वजन कमी करण्यासाठी उत्तम डाएट प्रकार आहे.
- इन्सुलिनची पातळी सुधारते: नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या अहवालानुसार OMAD डाएट आहारामुळे इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारते. दिवसातून एकदाच खाल्ल्याने इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहेत. ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील कमी होतो.
- आयुर्मान वाढू शकते: ओमाडसारख्या डाएटमुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी होऊ शकते. ज्यामुळे आयुर्मान वाढते.
- रोगप्रतिकार शक्ती मजबूत: तज्ञांच्या मते, या आहारपद्धतीनं रोगप्रतिकार शक्ती देखील वाढू शकते. ज्यामुळे तुम्ही केवळ हंगामी आजारांपासून वाचू शकत नाही तर कर्करोगासारख्या भयावह आजाराचा धोका देखील तुम्ही टाळू शकता.
(अस्वीकरण: सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिली आहे. ईटीव्ही भारताबद्दल किंवा माहितीच्या वैज्ञानिक वैधतेबद्दल कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संदर्भ
https://par.nsf.gov/servlets/purl/10219619