Benefits Of Walking: चालणं ही सुदृढ जगण्याची गुरुकिल्ली आहे. काही वर्षांपूर्वी प्रत्येकजण शारीरिक श्रम करत असत, परंतु सध्यस्थिती काही वेगळी आहे. ऑफिसमध्ये तासंतास बसून काम करण्याचं प्रमाणं वाढलं आहे. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकांनी व्यायाम करणं गरजेचं आहे. परंतु वेळेअभावी किंवा कंटाळा केल्यामुळे अनेक जण व्यायामाच्या फायद्यापासून अलिप्त असतात. अनेक जण व्यायाम करतात. परंतु बहुतांश लोक व्यायाम करणं टाळतात आणि व्यग्रतेच्या जीवनामुळे अनेकांना व्यायाम करणं देखील शक्य नसते. तुम्ही देखील यापैकी एक आहात काय? तर व्यायामाऐवजी तुम्ही दररोज काही पावलं चालणं गरजेचं आहे. नियमित काही पावलं चालल्यास निरोगी जीवन जगता येते. चला तर वयानुसार किती पावलं चालणं गरजेचं आहे ते पाहूया.

तज्ञांचे मत : एंडोक्राइनोलॉजिस्टच्या मते प्रत्येकांनी (प्रौढ) दररोज किमान 10,000 पावलं चालनं आवश्यक आहे. यामुळे हृदय मजबूत तर होतेच शिवाय हृदयविकार टाळण्यासाठी फायद्याचं आहे. दररोज न चूकता चालण्यास सुरुवात केली तर मधुमेह, लठ्ठपणा, ब्रेनस्ट्रोक, स्तनाचा कर्करोग आणि नैराश्य यासारख्या भयावह आजारापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. तसंच कॅलरी बर्न करण्यासाठी देखील चालणं गरजेचं आहे.

वयानुसार किती चालावं?
40 वर्षांखालील महिलांनी - दररोज 12,000 पावलं चालावी.
40 ते 50 वयोगटातील महिलांनी - दररोज 11,000 पावलं चालण्याची शिफारस केली जाते.
50 ते 60 वयोगटातील महिला - दररोज 10,000 पावलं चालावं असा सल्ला डॉक्टर देतात.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी 8,000 पावलं दररोज चालली पाहिजे
पुरुषांसाठी,
18 ते 50 वयोगटातील पुरुषांनी दररोज 12,000 पावलं चालण्याची शिफारस केली जाते.
50 पेक्षा जास्त वयाचे पुरुष - दररोज 11,000 पावलं चालण्याचे ध्येय ठेवलं पाहिजे.
यापूर्वी नियमित किती पावलं चालावित यावर अनेक संशोधनं झालीत. अनेक अभ्यासानुसार एका व्यक्तीनं एका दिवसात किमान 4,000 ते 5,000 पावलं चालणं गरजेचं आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या पेड्रो एफ गार्सिया यांनी 2023 मध्ये केलेल्या अभ्यासात असा, निष्कर्ष काढण्यात आला की दररोज किमान 4,000 पावलं चालणं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी गरजेचं आहे.
चालण्याचे फायदे
- दररोज चालल्याणं पचनक्रिया सुधारते.
- नियमित काही पावलं चालल्यास स्थायू बळकट होतात.
- मधुमेह नियंत्रित राहतो.
- शरीरात फॅट नाहीसा होतो
- चालल्यानं मानसिक आरोग्य सुधारते.
- स्तनाच्या कर्करोगाचा धोका चालल्यानं कमी होतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://www.health.harvard.edu/staying-healthy/5-surprising-benefits-of-walking