Natural Ways To Burn Belly Fat: पोटाची चरबी कमी करणे हे अनेकांसमोरील एक आव्हान आहे. बरेच लोक जिममध्ये जाऊन किंवा घरी व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकूण वजन कमी करण्यापेक्षा, पोटाची चरबी कमी करणं खूप कठीण आहे. व्यायामासोबतच, आहाराकडं लक्ष देणं आवश्यक आहे. पोटावरील चरबी ज्याला व्हिसरल बॉडी फॅट म्हणून ओळखलं जातं आरोग्यासाठी धोकादायक आहे. व्हिसरल बॉडी फॅटमुळे यकृत, पोट, आतडे इत्यादींच्या कार्यावर देखील परिणाम होऊ शकते. म्हणून, पोटात चरबी जमा होण्यापासून रोखणे आणि त्यावरील चरबी जाळणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या भाज्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.

- पालेभाज्या: पालक, केल आणि लेट्यूस या अशा पालेभाज्या आहेत ज्यात कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. या भाज्या फायबर समृद्ध असल्याने याच्या सेवनाने पोट जास्त काळ भरलेलं राहण्यास मदत होते. यामुळे वारंवार जेवण टाळण्यास मदत होते. तसंच या भाज्या जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. पालेभाज्या चयापचय वाढवतात आणि शरीरातील चरबी नियंत्रित करण्यास मदत करतात.

- क्रूसिफेरस भाज्या: क्रूसिफेरस भाज्या फायबर आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. त्या फायटोन्यूट्रिएंट्समध्ये देखील समृद्ध असतात. यामुळे चयापचय सुरळीत होते. तसंच याच्या सेवनाने पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे जास्त खाण्याची लालसा कमी होते. तसंच या भाज्यांमध्ये फायबरेच प्रमाण देखील जास्त असल्याने पचन सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहे. क्रूसिफेरस भाज्यांपैकी एक असलेल्या ब्रोकोलीमध्ये फायटोकेमिकल्स नावाचे नैसर्गिक रसायन आढळते. यामुळे शरीरातील चरबी जाळण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होते. म्हणून, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राउट्स इत्यादी एक चांगला पर्याय आहेत.

- दुधी भोपळा(लौकी): उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दुधी भोपळा खाल्ला जातो. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त. यामुळे वजन कमी करण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे. तसंच यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पनच सुधारते. यातील दाहक विरोधी गुणधर्म पोटफुगी आणि चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. म्हणून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी ही एक चांगली भाजी आहे.

- गाजर: गाजर हे केवळ दृष्टी सुधारण्यासाठी नाही तर कंबरेचा घेर कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. गाजरामध्ये कमी कॅलरीज असतात. तसंच यात फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात आढळतात. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातुन असं स्पष्ट झालं आहे की, गाजरासारख्या उच्च फायबर असलेल्या भाज्या खाल्लयाने तृप्तता वाढते आणि एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होते.

- सेलेरी: ही आणखी एक भाजी आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. फायबर समृद्ध असल्याने, ते पचनास मदत करते आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. सेलेरी चयापचय गतिमान करण्यास आणि कॅलरीजचे सेवन कमी करण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे सेलेरीचा समावेश करू शकता.

- काकडी: काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, ते खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यामुळे पोटफुगीसारख्या समस्या टाळण्यास देखील मदत होते. काकडी पचनास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील काकडी फायदेशीर आहे. या सर्वांमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
- मशरूम: मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात. तसंच मशरुम शरीरातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. चरबी जाळण्यासाठी आणि निरोगी शरीराचे वजन राखण्यासाठी मशरूम उत्तम आहेत. म्हणूनच, शरीराचे वजन राखण्यासाठी मशरूमचा आहारात नियमितपणे समावेश केला जाऊ शकतो.
- मिरची: मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग असते. हे शरीराचे तापमान वाढवते आणि चयापचय गतिमान करते. तसंच मिरची शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करते. तसंच मिरची कॅलरीज कमी करण्यास मदत करू शकते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4177517/