ETV Bharat / health-and-lifestyle

तंबाखूच नाही तर घरातील या 6 वस्तुंनी देखील होऊ शकतो कर्करोग! - CANCER CAUSING DAILY ITEMS

आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या अनेक गोष्टींमुळे कर्करोगासह विविध आजार होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या 6 गोष्टी कोणत्या

CANCER CAUSING DAILY ITEMS  TOP CANCER CAUSING THINGS IN HOME  HOUSEHOLD ITEMS THAT CAUSE CANCER  THINGS THAT CAUSE CANCER AT HOME
कॅन्सर (Getty Images)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : March 11, 2025 at 5:33 PM IST

2 Min Read

Cancer Causing Daily Items: जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि प्रदूषण हे सर्व घटक कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत आहेत. मात्र, या सर्वांव्यतिरिक्त, आपण दररोज अन्न शिजवण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरत असलेल्या काही गोष्टींमुळे देखील कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कोणत्या पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो, जाणून घेऊया.

CANCER CAUSING DAILY ITEMS  TOP CANCER CAUSING THINGS IN HOME  HOUSEHOLD ITEMS THAT CAUSE CANCER  THINGS THAT CAUSE CANCER AT HOME
नॉन स्टिक कुकवेयर (Getty Images)
  • नॉन स्टिक कुकवेयर: नॉनस्टिक कुकवेअरचा वापर कर्करोगासह विविध आरोग्य समस्यांचे एक कारण आहे. जेव्हा टेफ्लॉन-लेपित नॉन-स्टिक कुकवेअर जास्त गरम केले जाते, तेव्हा लेप तुटू शकतो आणि त्यातून विषारी रसायनं बाहेर पडतात. यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग आणि वृषणाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून, स्वयंपाकासाठी नॉनस्टिक पॅन वापरणे टाळा आणि त्याऐवजी स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न आणि सिरेमिक भांडी निवडा.

प्लास्टिक पाणी बॉटल्स (Getty Images)
  • प्लास्टिक पाणी बॉटल्स: प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलामध्ये बिस्फेनॉल ए आणि फॅथलेट्स सारखी रसायने असतात, जी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे शरीरात हार्मोनल व्यत्यय येऊ शकतात. अशा बाटल्यात गरम पाणी साठवल्यास आणखी नुकसान होते. विविध अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, यामुळे स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो. म्हणून पाणी साठवण्यासाठी काचेच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वापरा.

अ‍ॅल्युमिनियम फॉइल (Getty Images)
  • अ‍ॅल्युमिनियम फॉइल: बरेच लोक अन्न गुंडाळण्यासाठी आणि पॅक करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरतात. याचा नियमित वापर केल्याने न्यूरोलॉजिकल समस्या आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. टोमॅटो, व्हिनेगर आणि लिंबूवर्गीय फळे असलेले पदार्थ गुंडाळण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरल्याने दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून, अन्न गुंडाळण्यासाठी चर्मपत्र, कागद किंवा केळीची पाने वापरणे चांगले.

प्लास्टिक कंटेनर (Getty Images)
  • प्लास्टिक कंटेनर: प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये बिस्फेनॉल ए, फॅथलेट्स आणि डायऑक्सिन्स असतात. जेव्हा प्लास्टिकच्या डब्यामध्ये गरम अन्न साठवले जाते तेव्हा ही घातक रसायने अन्नात मिसळतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून, अन्न साठवण्यासाठी प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी तुम्ही काच, स्टेनलेस स्टील आणि सिलिकॉन कंटेनर निवडू शकता.
  • रिफाइंड तेल: हे कर्करोगाचा धोका वाढवणारे आणखी एक घटक आहे. विशेषतः ज्या तेलात ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. उच्च तापमानाला गरम केल्यावर ते ट्रान्स फॅट्स आणि फ्री रॅडिकल्स तयार करते. जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते. तसंच कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या कर्करोगाचाही धोका वाढू शकतो.
  • प्लास्टिक कटिंग बोर्ड: प्लास्टिक कटिंग बोर्ड वापरून अन्न कापताना, प्लास्टिकचे छोटे कण अन्नात मिसळू शकतात. हे शरीरात जाऊ शकते, ज्यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते आणि विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. म्हणून, तुम्ही प्लास्टिक कटिंग बोर्डऐवजी लाकडी किंवा बांबूचे कटिंग बोर्ड वापरू शकता.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.