Summer Diabetes Control Tips: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बऱ्याच लोकांचा फिरायला जाण्याचा बेत असतो. परंतु सामान्य लोकांपेक्षा मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे थोडे त्रासदायक ठरू शकते. कारण उष्ण हवामानात मधुमेहाचे रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरू शकतात. तसंच मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेवर पाणी पिलं नाही तर त्यांच्या रक्ततातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. तसंच वारंवार लघवीला जाणे आणि तीव्र घामामुळे देखील डिहायड्रेशनची समस्या उद्भवणे सहाजिक आहे. यामुळे रक्तवाहिन्या आणि नसांचं नुकसान होते. तसंच घामाच्या ग्रंधी योग्यरित्या कार्य करत नाहीत, ज्यामुळे शरीर थंड होते. मात्र, काही टीप्स फॉलो केल्यास मधुमेहाचे रुग्ण देखील उन्हाळाच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकतात.
- इन्सुलिनची वेळवर तपासणी: मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात वेळेवर रक्तातील साखरेची पातळी तसंच इन्सुलनिनची तपासणी करणे गरजेचं आहे. या दिवसांमध्ये शरीरात काही बदल जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर ऋतूनुसार औषधांचा डोस बदलण्याची गरज भासल्यास डॉक्टरांकडून बदलून घ्या. कारण काही औषध किंवा गोळ्यांमुळे पोटात उष्णता वाढू शकते.
- भरपूर पाणी प्या: मधुमेह असलेल्या लोकांनी तहान लागली नसेल तरीही भरपूर पाणी पिलं पाहिजे. कारण शरीरातील पाणी कमी झाल्यास ग्लोकजची पातळी आपोआप वाढण्याची शक्यता जास्त असते. तसंच या दिवासंमध्ये थंड पेय पिण्याची जास्त इच्छा होते. परंतु मधुमेह असलेल्या लोकांनी कॅफिनयुकत कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि अल्कोहोलं पिणं टाळावं. तज्ञांच्या मते, यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते.
- सन्सक्रीमची लावा: उन्हाळ्यात शरीरासोबतच त्वचा देखील हायड्रेट ठेवण्यासची गरज आहे. कारण सनबर्नमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. परिणामी थकवा, चक्कर, मळमळ आदी समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात नियमित सन्सक्रिमचा वापर केल्यास तुम्ही स्वत:च तीव्र उष्णतेपासून संरक्षण करू शकता.
- उन्हात बाहेर जावू नका: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्लुकोजची पातळी वाढते आणि कमी होते. विशेषतः दिवसाच्या उष्णतेमध्ये. उच्च तापमानामुळे शरीर इन्सुलिन वापरण्याच्या पद्धतीतही बदल होतो. मधुमेह असलेल्या लोकांनी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर निघू नये. निघाल्यास शक्य तितके सावलीत राहण्याची काळजी घ्यावी अशी शिफारस तज्ञ करतात. तसंच घराबाहेर निघताना पाण्याची बाटली आणि शरीराला सन्सक्रिम लावून बाहेर पडा.
- फायबरयुक्त आहार घ्या: उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी फायबरयुक्त आहार घ्या. कारण फायबरयुक्त आहार पचनासाठी उत्तम आहे. तसंच यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे कमी खाल्लं जाते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
- कमी सारखरयुक्त ज्युस: उन्हाळ्याच्या दिवसात ताजेतवाने राहण्यासाठी फळांच्या ज्यूसची गरज असते. परंतु मधुमेही रुग्णांनी साखर घातलेले ज्यूस पिणं टाळलं पाहिजे. तुम्ही फळांच्या ज्यूस व्यत्तीरिक्त लिंबू किंवा टोमॅटोचा रस, तुळस, जिरे तसंच पुदिन्याचं पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर ताक घेणं देखिल चांगलं आहे.
- सैल आणि हलके कपडे: उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर फिरताना तुन्ही हलक्या रंगाचे सुती आणि सैल कपडे घालावीत. कारण घट्ट कपडे घातल्यास रक्ताभिसण योग्य होत नाही. यामुळे उन्हाचा अधिकच त्रास होतो. तसंच या दिवसांमध्ये कॉटनची कपडे घालणे उत्तम आहे. कारण कॉटन शरीरातील घाम शोषून घेते. तसंच पिवळे, पांढरे तसंच इतर हल्क्या शेड्सचे कपडे घाला. कारण डार्क फॅब्रिक्स सूर्यकिरण शोषून गेतात. परिणामी आणखी गरमी होण्याची शक्यता जास्त असते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
हेही वाचा
- उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी वापरा 'या' टिप्स
- धक्कादायक! मानवी मेंदूत जमा होतंय प्लास्टिक; तज्ञांचा खुलासा
- वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आंबा खाण्याचे आहेत अनेक फायदे
- उतार वयात महिलांना होऊ लागतात 'या' समस्या; 80 टक्के महिलांनी सांगितले वास्तव
- उन्हाळी हंगामातील ही फळं मधुमेही रुग्णांनी चुकूनही खावू नये
- वजन कमी करण्यासाठी तुम्ही सप्लिमेंट्स वापरता का? होवू शकतात गंभीर परिणाम