Summer Fruits That Increase Sugar: फळं खाण्यास सर्वांना आवडते. विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात फळं खाण्यास सर्वच प्राधान्य देतात. कारण रणरणत्या उन्हाळ्यात तळलेल किंवा इतर मसालेदार पदार्थांच्या सेवनानं प्रकृती खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून डॉक्टर देखील उन्हाळ्यात जास्त फळं खाण्याच सल्ला देतात. पंरतु उन्हाळ्याच्या हंगामातील अशी काही फळं आहेत. ज्याच्या सेवनानं मधुमेह आणखी वाढू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्याविषयी अनेक पथ्य पाडावी लागतात. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकणे अशक्य आहे. परंतु खाण्यापिण्याचे काही नियम पाडल्यास मधुमेह नियंत्रित करता येवू शकतो. अशीच काही उन्हाळी फळं आहेत. ज्यामुळे शरीराचे हायड्रेशन आणि एकूण आरोग्य राखण्यास मदत होते. ही फळ शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात. परंतु या फळांच्या जास्त सेवनानं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. परिणामी आरोग्यवर्धक अनेक समस्या उद्भवू शकतात.
- आंबा: आंबा हे एक लोकप्रिय फळ आहे. तसंच आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू शकते. म्हणून, मधुमेहींनी आंबे खाणे मर्यादित करणे किंवा टाळणे चांगले. जर आंबा खायची इच्छा झालीच तर जास्त प्रमाणात पिकलेला आंबा खाणं टाळा. कमी पिकलेले आंबे खा परंतु खाण्यापूर्वी आरोग्य तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
- स्वीट कॉर्न: हा एक असा कॉर्न आहे ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत. यांचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो. त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स देखील असतात. म्हणून, जास्त प्रमाणात स्वीट कॉर्न खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून, मधुमेहींनी स्वीट कॉर्न फक्त माफक प्रमाणात खावे. कॉर्न हे प्रथिनेयुक्त पदार्थांसोबत किंवा अॅव्होकॅडोसारख्या निरोगी चरबींसोबत खाल्ले जाऊ शकते. हे रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करेल.
- अननस: हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमामात आढळतात. त्यात भरपूर नैसर्गिक साखर असल्याने ते साखर रक्तात लवकर शोषली जाते. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्ण ज्यांना अननस आवडते ते कमी प्रमाणात खाऊ शकतात. परंतु खाण्यापूर्वी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.
- टरबूज: टरबूजामध्ये 92 टक्के पाणी असते. हे असे फळ आहे जे बहुतेक लोक उन्हाळ्याच्या काळात शरीर थंड ठेवण्यासाठी खातात. तसंच टरबूज डिहायड्रेशन रोखण्यासाठी आणि तहान शांत करण्यासाठी फायदेशीर आहे. जरी त्यात अनेक पौष्टिक फायदे असले तरी, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. म्हणून, मधुमेहींनी टरबूज खाणे टाळणे चांगले.
- द्राक्षे: हे एक असे फळ आहे ज्यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त आहे. म्हणून, जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. म्हणून, मधुमेहींनी द्राक्षे खाणे टाळणे चांगले.
- चेरी: जरी चेरी आरोग्यदायी असल्या तरी, मधुमेहींनी चेरी खाणे टाळणे चांगले. यामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे. म्हणून, जास्त प्रमाणात चेरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी जलद वाढू शकते. दरम्यान, काजू आणि दह्यासोबत चेरी कमी प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)