Tanning Home Remedy: प्रत्येकाला ग्लोईंग आणि चमकणारी त्वचा हवी असते. परंतु ऋतूनुसार त्वचेसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. असचं उन्हाळ्याचं देखील आहे. उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे टॅनिंगची समस्या सामान्य आहे. कडक उन्हात बाहेर पडल्यास चेहरा काळवंडतो तसंच निस्तेज दिसू लागतो. महागड्या क्रिम्स, सनस्क्रीम आणि पार्लरमध्ये जाऊन देखील त्वचेवर टॅनिंग कायम असते. टॅनिंगमुळे हातपाय आणि चेहरा खराब दिसू लागतो. अशा परिस्थितीत त्वचा उजाळणे आव्हानात्मक होते. परंतु, आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलोय. ज्यामुळे तुम्हाला कमी खर्चात आणि नैसर्गिकरित्या टॅनिंग दूर करता येऊ शकते. चला तर पाहूया घरबसल्या घरात उपलब्घ असलेल्या घटकांनी चेहऱ्यावरील आणि इतर अवयवांवरील टॅनिंग दूर कशी करावी.

- दही आणि हळद: व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. या पदार्थांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. टॅनिंग दूर करण्यासाठी दही आणि हळद उत्तम मार्ग आहे. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते तर हळद नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. या दोन्ही घटकामुळे त्वचेला चमक प्रदान होते. टॅन काढण्यासाठी एक चमचा दह्यात चिमूटभर हळद मिसळा आणि हा पॅक संपूर्ण टॅन झालेल्या भागावर लावा. 20 ते 30 मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाईल आणि त्वचा उजळण्यास मदत होईल.

- कोरफड जेल: त्वचेसंबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर आहे. याचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत कतात. तसंच कोरफड जेल त्वचा थंड ठेवते. टॅनिंग दूर करण्यासाठी कोरफड जेल एक उत्तम पर्याय आहे. दररोज 30 मिनिटे कोरफडीचे मास्क चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ धूतल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा. यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

- काकडीची पेस्ट: स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असलेली काकडी शरीर तसंच त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास फायदेशीर आहे. तसंच यामुळे त्वचा ताजीतवाणी होते. टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही काकडी बारीक करून पेस्ट तयार करा. तयार झालेला पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि ज्या ठिकाणी टॅन आहे तेथे लावा. 15 ते 20 मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा यामुळे टॅनिंगपासून सुटका होईल.

- बटाट्याचा रस: बटाच्याच्या रसामध्ये एंजाइम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे त्वचेला चमकदार बनवते आणि डागं कमी करण्यास मदत करते. सर्वात आधी तुम्ही बटाटे किसून घ्या आणि त्याचा रस काढा. काढलेला रस कॉटन बॉलच्या सहाय्याने टॅन झालेल्या भागावर लावा. 15 ते 20 मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. बटाट्याचा रस नियमित टॅन झालेल्या भागाला लावल्यास टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

- पपई मास्क: पपईमध्ये पपेन नावाचे संयुगे आढळतात. जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. याकरिता पिपकलेली पपई मॅश करा आणि ती तुमच्या त्वचेवर मास्कप्रमाणे लावा. 20 ते 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

- चांगल्या परिणामांसाठी हे करा
- टॅनिंग पूर्णपणे निघून जाईपर्यंत यापैकी कोणताही उपाय दररोज किंवा प्रत्येक दुसऱ्या दिवशी करा.
- घराबाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण शरीर झाकून घ्या
- शरीर पूर्ण झाकेल असे कपडे परिधान करा
- बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा
- 30 किंवा त्याहून अधिक SPF असलेले सनस्क्रीन लावा
- स्वत:ला हायड्रेटड ठेवण्यास विसरू नका
- भरपूर फळं खा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/28040601/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/16623024/