ETV Bharat / health-and-lifestyle

गरोदर महिलांनी कोथिंबीरीचा रस पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात

गरोदर महिलांनी कोथिंबीरीचा रस प्यावा की नाही याबद्दल अनेकांचे मत विभिन्न असू शकतात. चला जाणून घेऊया गरोदर महिला कोथिंबीरीचा रस पिऊ शकतात की नाही..

BENEFITS OF CORIANDER JUICE  HEALTH BENEFITS OF GREEN CORIANDER  CORIANDER JUICE HEALTH BENEFITS  GREEN CORIANDER HEALTH BENEFITS
गरोदर महिलांनी कोथिंबीरीचा रस पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : July 1, 2025 at 7:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

Benefits Of coriander juice: प्रत्येक पदार्थांना वेगळी चव प्रदान करण्याचे काम कोथिंबीर करते. म्हणून प्रत्येक स्वयंपाकघरात कोथिंबीर उपलब्ध असतेच असते. भाजी असो वा चटणी कोथिंबीर घातल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. एवढेच नाही तर, तुम्हाला माहिती आहे काय? कोथिंबीराची पानं भाजीलाच चवच प्रदान करत नसून ती आरोग्यासाठी देखील चांगली आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध असलेल्या कोथिंबीरच्या पानं पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि त्यांच्या नियमित सेवनाने होणारे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

BENEFITS OF CORIANDER JUICE  HEALTH BENEFITS OF GREEN CORIANDER  CORIANDER JUICE HEALTH BENEFITS  GREEN CORIANDER HEALTH BENEFITS
गरोदर महिलांनी कोथिंबीरीचा रस पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात (Getty Images)

रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, यकृततज्ञ डॉ. पवन हंचले यांच्या मते, कोथिंबीर पौष्टिकतेचे भांडार आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरीचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. कोथिंबीरीचा रस काही आजारांवर औषध म्हणून देखील काम करतो. कोथिंबीरीची हिरवी पाने फायबरने समृद्ध आहेत. यासोबतच त्यामध्ये जीवनसत्त्वे अ आणि क, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, लोह, पोटॅशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. कोथिंबीर उच्च रक्तदाबासाठी देखील फायदेशीर आहे. या संदर्भात केलेल्या काही संशोधनांच्या निकालांनुसार, कोथिंबीरीमधील घटक कॅल्शियम आयन आणि न्यूरोट्रांसमीटर एसिटाइलकोलीनसह एकत्रितपणे काम करतात, जे रक्तवाहिन्यांचा ताण कमी करण्यास मदत करतात.

BENEFITS OF CORIANDER JUICE  HEALTH BENEFITS OF GREEN CORIANDER  CORIANDER JUICE HEALTH BENEFITS  GREEN CORIANDER HEALTH BENEFITS
गरोदर महिलांनी कोथिंबीरीचा रस पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात (Getty Images)
  • पचन सुधारते: नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, कोथिंबीरच्या रसात असलेले अँटीऑक्सिडंट फायबर पचनसंस्थेला चालना देते. रिकाम्या पोटी हा रस प्यायल्याने पोटफुगी, गॅस आणि पचनाच्या समस्या कमी होतात. त्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: कोथिंबीर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. दररोज सकाळी कोथिंबीरीचा रस प्यायल्याने सर्दी आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.
  • त्वचेचे आरोग्य सुधारते: कोथिंबीरच्या रसात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि मुरुम आणि त्वचेच्या समस्या कमी करतात. तसंच त्वचा मऊ आणि चमकदार बनविण्यास देखील कोथिंबीर रस उत्तम आहे.
  • वजन कमी करण्यासाठी चांगलं: कोथिंबीरच्या रसात कॅलरीज कमी असतात आणि ते चयापचय गतिमान करते. रिकाम्या पोटी कोथिंबीरीचा रस पिल्याने शरीराला चरबी जाळणे सोपे होते. वजन नियंत्रित करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.
  • किडनीचे आरोग्य राखते: कोथिंबीरचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे किडनीचे कार्य सुधारते. त्यात असलेली खनिजे किडनीचे आरोग्य राखतात आणि किडनी स्टोन टाळण्यास मदत करतात.
  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते: कोथिंबीरचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो, जो मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ते इन्सुलिन संतुलन सुधारते.
BENEFITS OF CORIANDER JUICE  HEALTH BENEFITS OF GREEN CORIANDER  CORIANDER JUICE HEALTH BENEFITS  GREEN CORIANDER HEALTH BENEFITS
गरोदर महिलांनी कोथिंबीरीचा रस पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात (Getty Images)
  • गरोदर महिलांनी कोथिंबीरचा रस प्यावा की नाही? डॉ. पवन हंचाळे यांच्या मते, गरोदर महिलांनी कोथिंबीरचा रस प्यावा की नाही यावर प्रत्येक तज्ञांचे वेगवेगळे मत असू शकते. काही लोक ते फायदेशीर मानतात, तर काही लोक ते हानिकारक मानतात. काही तज्ञांचे म्हणणे आहे क, कोथिंबीरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे गर्भधारणेदरम्यान खूप महत्वाची असतात. मॉर्निंग सिकनेस आणि उलट्या यासारख्या समस्या कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशरी ठरू करू शकते. अॅसिडीच्या समस्येनं त्रस्त असलेल्या लोकांसाठी देखील कोथिंबीर फायदेशीर आहे. परंतु काही तज्ञांच्या मते, कोथिंबीरमध्ये फायटोएस्ट्रोजेन असते जे गर्भाशयात आकुंचन निर्माण करू शकते, जे गर्भधारणेसाठी हानिकारक असू शकते. काही लोकांना कोथिंबीरची ऍलर्जी असू शकते. कोथिंबीरचे जास्त सेवन केल्याने मूत्रपिंड आणि हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा