Tips For Oily Skin In Summer: उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे त्वचेच्या समस्या वाढतात . उच्च तापमानामुळे सेबमचे उत्पादन वाढू शकते आणि त्वचेवर जास्त तेलकटपणा येऊ शकतो. सेबम हा त्वचेतील सेबेशियम ग्रंथीपासून तयार होणारा तेलकट आणि चिकट द्रवपदार्थ आहे. यामुळे जळजळ आणि पुरळ यांसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, त्वचेला आतून खोलवर पोषण देणे आणि विषारी पदार्थ काढून टाकणे महत्वाचे आहे. तेलकट त्वचेपासून मुक्तता मिळविण्यासाठी येथे काही पेय अत्यंत उपयुक्त आहेत.

- टरबूजाचा रस: टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय फळ आहे. 90 टक्के पाणी असलेले टरबूज उन्हाळ्यात शरीराचे हायड्रेशन राखण्यास मदत करते. उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. तसंच यातील लाइकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट शरीर ऑक्सिडेटिव्ह ताणापासून बचाव करतो. टरबूज खाल्ल्यास डिहायड्रेशनच्या समस्येपासून बचाव होतोच शिवाय पचनक्रिया सुरळीत होते. तसंच यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचा उजाळ्यासाठी चांगली आहे.

- नारळपाणी: नारळपाणी हे आवश्यक पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. तसंच नारळ पाणी, एक उत्कृष्ट डिटॉक्स पेय, शरीरातील बॅक्टेरिया बाहेर काढण्यास आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करू शकते. तसंच नारळपाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखते. तसंच यामुळे पोटफुगीसारखी समस्या देखील दूर होते.
- चिया सि्डस: चिया सिड्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे त्वचेच्या आरोग्याला देखील आधार देतात. त्वचेतील जळजळ कमी करण्यासाठी आणि हायड्रेशन राखण्यासाठी हे प्रभावी आहे. तसंच हे त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यास आणि सेबम उत्पादन कमी करण्यास देखील मदत करते. एक चमचा चिया सिकड्स एक ग्लास पाण्यात भिजवून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
- काकडी आणि पुदिन्याचे पाणी: काकडी आणि पुदिन्याचे पाणी त्वचेच्या संबंधित फायद्यांसाठी ओळखले जाते. त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी काकडी आणि पुदिना पाणी पिणे चांगले. त्वचेचे हायड्रेशन राखण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. पुदिन्यातील अँटिबॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावर मुरुम येण्यास रोखतात. तसंच यातील अँटीऑक्सिडंट्स यकृताचे कार्य सुरळीत करतात.
- ताक: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी ताक सर्वात लोकप्रिय पेय आहे . हे त्वचेला ताजेतवाने करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. मुरुमांपासून बचाव करण्यासाठी नियमित दही पिणे देखील फायदेशीर आहे. याशिवाय, हे पचनाच्या समस्यांसाठी देखील एक उत्तम उपाय आहे.
- ग्रीन टी: ग्रीन टी हा अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. हे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि जळजळ रोखण्यास मदत करते. त्वचेवरील काळे डाग आणि मुरुमे दूर करण्यासाठी देखील ग्रीन टी फायदेशीर आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4464475/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/24835026/