RAJA RAGHUVANSHI MURDER CASE: देशात हजारो धबधबे आहेत, जे त्यांच्या सौंदर्य आणि आकर्षणासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु मेघालयातील वेई सोडोंग धबधबा सध्या काही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरं तर, ईस्ट प्रेसिडेंट हिल्समधील वेई सोडोंग धबधब्याजवळ राजा रघुवंशी यांचं मृत शरीर सापडल्यापासून या धबधब्याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत, भारतातील कोणते धबधबे प्रसिद्ध आहेत. याची माहिती पाहूया.

- कुंचिकल धबधबा: कुंचिकल धबधबा हा कर्नाटकातील एक अद्वितीय नैसर्गिक आश्चर्य आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधबा असूनही, त्याच्या सौंदर्याबद्दल लोकांना फारसे माहिती नाही. हा धबधबा पश्चिम घाटामधील एक लपलेला रत्न आहे. कर्नाटकात स्थित कुंचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. तर आशियातील दुसऱया नंबरचा धबधबा आहे. 1493 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण आहे. हा सुंदर धबधबा कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील मस्तिकट्टे गावाजवळ पश्चिम घाटात आहेत. हा धबधबा पश्चिम घाटातून वाहणाऱ्या वराही नदीने तयार केला आहे आणि हा घनदाट जंगलं आणि खडकाळ भूभागातून खाली कोसळतो. त्याच्या दुर्गम स्थानामुळे, हा धबधबा अजूनही व्यापारीकरणापासून अलिप्त आहे. धबधब्यांमुळे या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण जपण्यास मदत झाली आहे.

- बरेहिपाणी धबधबा: बरेहिपाणी धबधबा हा कुंचिकल धबधब्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. बरेहिपाणी धबधब्याची एकूण उंची 399मीटर (1309 फूट) आहे. हा धबधबा ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात आहे. बरेहिपाणी धबधबा दोन आश्चर्यकारक स्तरांमध्ये पडतो आणि एक सुंदर दृश्य प्रदान करतो. हा धबधबा ओडिशाच्या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात आहे आणि बुधाबलंगा नदीच्या काठावर आहे.

- नोहशांगथियांग: धबधबा हा मेघालयाच्या मध्यभागी असलेला एक सुंदर धबधबा आहे. सात प्रवाह एकत्र वाहत असल्याने याला सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल असंही म्हणतात. हे ठिकाण हिरवळ आणि मनमोहक दृश्यांनी भरलेले आहे. नोहशांगथियांग धबधबा मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील मावसमई गावाजवळ आहे. हा नेत्रदीपक धबधबा या प्रदेशातील पर्यटन आकर्षणांचा एक अविभाज्य भाग आहे आणि मेघालयात येणाऱ्या प्रत्येकाने तो अवश्य पाहावा. या धबधब्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा, म्हणजे जून ते सप्टेंबर. या धबधब्याची उंची सुमारे 315 मीटर आहे.

- नोहकालिकाई धबधबा: नोहकालिकाई हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा 340 मीटर उंचीवरून पडतो आणि निसर्गप्रेमींना निसर्गाचे अद्भुत दृश्याचं दर्शन देतो. हा धबधबा मेघालयातील चेरापुंजीजवळील पूर्व खासी टेकड्यांमध्ये आहे. देशातील सर्वात सुंदर आणि भव्य धबधब्यांपैकी हा एक आहे. या धबधब्याचं मनमोहक दृश्य बघण्याकरिता लाखो पर्यंट दरवर्षी येतात. या सुंदर धबधब्याला मेघालयाचा अभिमान म्हणून देखील ओळखलं जातं. एका मोठ्या खडकावरून जमिनीवर पडणारा या धबधब्याचा सुंदर देखावा आणि त्याचे सौंदर्य पर्यटकांना मोहित करते.

- किनरेम धबधबा: किनरेम धबधबा हा भारतातील मेघालय राज्यातील चेरापुंजी (सोहरा) जवळील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात स्थित एक अद्वितीय धबधबा आहे. भारतातील सातवा सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. हा धबधबा सुमारे 305 मीटर (1,001 फूट) उंचीवरून तीन पातळ्यांवर कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाखा आहे. शिलाँगपासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या किनरेम धबधब्याचा अंदाजे 70 मीटर उंचीवरून पडतो. या धबधब्यांचे सौंदर्य अनुभवताना तुम्ही आजूबाजूच्या टेकड्यचे विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता. सर्व बाजूंनी हिरवाईने नटलेला हा धबधबा मंत्रमुग्ध करतो. हा धबधबा नोक्रेक बायोस्फीअर रिझर्व्हमधून उगम पावणाऱ्या मिंटडू नदीवर स्थित आहे.

- दूधसागर धबधबा: दूधसागर धबधबा, ज्याला दुधाचा समुद्र म्हणूनही ओळखलं जातं, हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे जो सुमारे 310 मीटर उंच आणि 30 मीटर रुंद आहे. तो गोवा राज्यातील मांडवी नदीवर आहे. या धबधब्यांपर्यंत तुम्ही रस्त्याने पोहोचू शकता कारण ते पणजी शहरापासून 60 किमी अंतरावर आहेत. मडगाव-बेळगाव रेल्वे मार्गावर असल्याने, ते मडगावच्या पूर्वेस 46 किमी आणि बेळगावच्या दक्षिणेस 80 किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि पश्चिम घाटाच्या मध्यभागी असलेल्या मोलेम राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे. दूधसागर धबधबा अवर्णनीय आहे.