ETV Bharat / health-and-lifestyle

शिलाँगला गेलेल्या जोडप्यासारखं तुमच्यासोबतही होऊ नये म्हणून हनिमूनला जाताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी - MARRIED COUPLE MISSING

इंदोर येथील जोडप्याचे बेपत्ता होण्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. तुम्ही देखील डोंगराड भागावर हनिमून ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

HONEYMOON IN SIKKIM  SONAM RAGHUVANSHI NEWS  BE AWARE OF BEFORE TRAVELING  MARRIED COUPLE MISSING
शिलाँग हनिमून कपलचे सारखं होऊ नये म्हणून हनिमूनला जाताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : June 7, 2025 at 8:32 PM IST

2 Min Read

MARRIED COUPLE MISSING: लग्नाचा हंगाम सुरू होताच, जोडपी सर्वात आधी त्यांच्या हनिमूनचे नियोजन करायला लागतात. लग्नानंतर हनिमूनला जाणाच्या ट्रेंड वेगानं वाढला आहे. हनिमून ही एक खास ट्रिप आहे जिथे नवविवाहित जोडपी त्यांचा लग्न सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी आणि एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी जातात. हा असा क्षण आहे जिथे ते एकमेकांना खोलवर जाणून घेण्याचा आणि प्रेमळ क्षण जगण्याचा प्रयत्न करतात.

कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, जोडीदारासोबत काही वेळ एकांतात घालवणे महत्वाचे आहे. हनिमूनचे हे क्षण कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण असतात. हनिमून हा एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी आणि जोडप्याचे नाते मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

लग्नाआधी बहुतेक जोडपी एकमेकांना ओळखत नाहीत. कारण लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्याचा वेळ त्यांच्याकडे नसतो. म्हणून, एकमेकांना समजून आणि ओळखून घेण्यासाठी हनिमून प्लॅन केलं जातं. जरी, जुन्या काळात असं होत नव्हतं. परंतु आता हनिमून जाणं एक फॅशल बनली आहे. जर तुम्हीही लग्न करणार असाल किंवा तुमचे लग्न होऊन काही वर्षे झाली असतील आणि तुम्ही भारतात बजेट-फ्रेंडली हनिमूनची योजना आखत असाल, तर सुरक्षिततेशी तडजोड करू नका. तुमच्या हनिमून ट्रिपचे नियोजन व्यवस्थित करा. अज्ञान ठिकाणी भेट देताना आपल्या सुरक्षितेची खात्री करा तसंच नवीन ठिकणी नेहमी गाइड सोबत ठेवा.

हनिमूनसाठी डोंगराड भागात जाण्याचा विचार करताय लक्षात ठेवा या गोष्टी

  1. हनिमूनचे नियोजन करताना सुरक्षिततेशी कोणत्याही प्रकारे तडजोड करू नका हे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हाही तुम्ही सहलीचे नियोजन करता तेव्हा तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
  2. लक्षात ठेवा की ज्या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती नाही अशा ठिकाणी जाणं टाळा.
  3. हॉटेल बुकिंगकरण्यापूर्वी हॉटेलचे रिव्हयू वाचा आणि नंतरच बुक करा.
  4. हॉटेल बुक आणि परतीची तिकीट सर्व काही फिरायला जाण्याआधी करा. यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला ताण येणार नाही
  5. पर्वतांमध्ये प्रवास करताना, हवामानाची परिस्थिती लक्षात ठेवा, तसंच हॉटेलचे स्थान पर्यटन स्थळांपासून किती अंतरावर आहे ते तपासा.
  6. तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणाची सविस्तर माहिती मिळवा, स्थानिकांशी बोला, यामुळे तुम्हाला काय करावं आणि काय करू नये याची माहिती मिळेल.
  7. सहलीला गेल्यानंतर, तुमचे लाईव्ह लोकेशन कुटुंबातील सदस्य किंवा मित्रासोबत नक्कीच शेअर करा.
  8. प्रवासादरम्यान आवश्यक असलेली कागदपत्रं जसे की पासपोर्ट, व्हिसा आणि आधार कार्ड नेहमी सोबत ठेवा.
  9. डोंगराळ भागात प्रवास करताना काळजी घ्या, कारण रस्ते वळणदार आणि अरुंद असू शकतात. तापमान आणि हवेचा दाब उंचीनुसार बदलतो, ठिकाणे धोकादायक आणि निर्जन असू शकतात. म्हणून सावधगिरी बाळगा.
  10. डोंगराळ भागात हनिमूनला गेल्यास स्थानिक मार्गदर्शकाची मदत नक्कीच घ्या. कारण डोंगराळ भागात प्रवास करणे कधीकधी आव्हानात्मक ठरू शकते. स्थानिक मार्गदर्शक तुमचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित बनवू शकतो.
  • शिलाँगला हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे जोडपे बेपत्ता: खरतर नुकतेच एक कपल शिलॉंग येथून बेपत्ता झालं. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी इंदौरमध्ये लग्न झालेले नवविवाहित जोडपे राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी शिलाँगमध्ये हनिमून दरम्यान बेपत्ता झाले. या इंदौरमधील जोडप्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. वृत्तानुसार, तरुणाचा मृतदेह सापडला, परंतु त्याची पत्नी सोनम अजूनही बेपत्ता आहे. शोध मोहीम सुरू आहे. सोनम आणि राजाचे प्रकरण भारतातील पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे जोडपे सहलीला गेले होते पण परत येऊ शकले नाहीत.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.