Best Places To Visit In June: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होताच अनेकांचा कुटुंबासह फिरण्याचा बेत असतो. दोन महिन्यांच्या सुट्ट्यामंध्ये घरी बसून राहण्यापेक्षा अनेक लोक नवीन ठिकाणं एक्सप्लोर करतात. परंतु, अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. यामुळे स्थळ मनसोक्त बघायला मिळत नाही आणि प्रवास करणे मजेदार होण्याऐवजी कठिण बनते. गर्दीमुळे तुम्हाला सर्वत्र रांगेत उभं देखील राहावं लागते. मे-जून महिन्यात मनाली, शिमला आणि मसूरी सारख्या हिल स्टेशन्समध्ये सर्वाधिक गर्दी असते. जर तुम्ही गर्दीची ठिकाण टाळत असाल आणि नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची तुमची इच्छा असेल तर काही ठिकाणं अगदी नैसर्गिक सौंदर्यनं नटलेली आहेत. जूनच्या कडक उष्णतेपासून वाचण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणं सर्वोत्तम आहेत.

- मक्लोडगंज, हिमाचल प्रदेश: मक्लोडगंज हे त्याच्या सुंदर दृश्यांसाठी आणि हिरव्यागार टेकड्यांसाठी तसंच आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे तिबेटी लोकसंख्या आणि संस्कृती बघायला मिळते. तुम्ही येथील नामग्याल मठ, भागसू धबधबा, त्सुगलागखांग कॉम्प्लेक्स, धरमकोट आणि मिनिकियानी खिंडला भेट देऊ शकता. मक्लोडगंजचे सर्वात जवळचे विमानतळ कांगळा विमानतळ आहे, जे अंदाजे 21 किमी अंतरावर आहे. याशिवाय पठाणकोट रेल्वे स्टेशन 92 किमी अंतरावर आहे. हे ठिकाणं ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे प्रसिद्ध तिबेटी अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांचं घर आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे ठिकाण देशभरातील पर्यटकांसोबत विदेश पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित करते.

- धनोल्टी उत्तराखंड: हिमालायाच्या कुशीत सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल तर धनोल्टी एक उत्तम डेस्टिनेशन आहे. हे मसुरीच्या अगदी 62 किलोमिटीर अंतरावर आहे. धनोल्टीमधील सुरकंडा देवी मंदिर, धनोल्टी अॅडव्हेचर पार्क, जाबरखेत नेचर रिझर्व्ह या ठिकाणी भेट देण्यास विसरु नका. धनोल्टी अॅडव्हेंचर पार्कमध्ये , माउंटन बाइकिंग, स्काय वॉकिंग, रॅपलिंग, झिप स्विंग, रॉक क्लायम्बिंग आणि व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेता येतो. निसर्गप्रेमींसाठी हा एक सर्वात चांगला पर्याय आहे.

- चिकमंगलूर कर्नाटक: चिकमंगलूर हे त्याच्या नेत्रदीपक दृश्यांसाठी आणि हिरव्यागार टेकड्यांसह सुगंधित कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथील अद्भुत धबधबे मनाला आकर्षित करणारे आहेत. जून महिना हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिन्यांपैकी आहे. येथील कॉफी म्युझियम, भद्रा वन्यजीव अभयारण्य, भद्रा धरण, हनुमान गुंडी धबधबा, मडू गुंडी फॉल्स, हिरेकोल तलाव आणि वीरा नारायण मंदिर पाहण्यासारखे आहे. चिकमंगळूरचा सर्वात जवळ मंगलोर विमानतळ आहे तसंच कदूर रेल्वे स्टेशन सर्वात जवळ आहे.

- कूर्ग कर्नाटक: कुर्ग हे कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. हे त्याच्या धबधबे, कॉफी मळे आणि सांस्कृतिक वारसा जपते. निसर्गप्रेमींसाठी हे एक चांगलं ठिकाण आहे. कूर्ग समुद्रसपाटीपासून 1525 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी राजाची कबर, नामद्रोलिंग मठ, मंडलपट्टी व्ह्यूपॉइंट, चिकलीहोल जलाशय, हरंगी धरण, इरुप्पु धबधबा, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य अशी अनेक ठिकणे फिरण्यासारखी आहेत.

हेही वाचा |