Colourful Cities In India: भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. काही ठिकाणं त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत, तर काही शहरे त्यांच्या खाणपाणासाठी आणि आदरातिथ्यासाठी ओळखली जातात. मात्र, भारत केवळ त्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांसाठी, मंदिरांसाठी आणि स्वादिष्ट अन्नासाठी प्रसिद्ध नाही, तर अनेक शहरे त्यांच्या खास रंगांसाठी देखील जगभरात ओळखली जातात.
जयपूर हे गुलाबी शहर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे तर जोधपूर हे निळे शहर म्हणून ओळखलं जातं. भारतातील अनेक शहरं जे विशेष रंगांनी चिन्हांकित आहेत त्यांची नावं जाणून घेणं आश्चर्यकारक तर आहेच सोबत त्यामुळे आपल्या ज्ञानातही भर पडेल. प्रत्येक रंगाचा एक अर्थ असतो, उदाहरणार्थ, गुलाबी रंग आदरातिथ्य दर्शवितो. निळा रंग थंडपणाचे प्रतीक आहे, पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग निसर्गाशी असलेल्या संबंधाचे प्रतीक आहे. तुम्ही एकदा तरी या शहरांना भेट दिली पाहिजे. चला त्या शहरांबद्दल अधिक जाणून घेऊया

- गुलाबी शहर, जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरला 'गुलाबी शहर' म्हटले जाते. १८८६ मध्ये, प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर गुलाबी रंगात रंगवण्यात आले होते, जे आदरातिथ्याचे प्रतीक मानले जाते. आजही येथील जुने राजवाडे आणि बाजारपेठा गुलाबी रंगाने सजवलेल्या आहेत. येथे तुम्ही हवा महल, आमेर दुर्ग, सिटी पॅलेस आणि जंतर मंतर सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. जयपूर शहर केवळ भारतातच नाही तर जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

- ब्लू सिटी, जोधपूर: राजस्थानमधील जोधपूर शहराला सूर्य नगरी म्हणून ओळखलं जातं. हे राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसंच हे शहर भारताचे निळे शहर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. येथील घरे, रस्ते आणि सर्वकाही निळ्या रंगात रंगवलेले आहे. निळा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानले जातं. जोधपूरचा जुना भाग विशेषतः निळ्या रंगात रंगवला आहे. पूर्वी ते ब्राह्मणांच्या घरांचे प्रतिनिधित्व करत होते, परंतु हळूहळू ते संपूर्ण शहराची ओळख बनले. येथे मेहरानगड किल्ला, उमेद भवन पॅलेस, जसवंत थंडा आणि ब्लू रोडची जुनी कॉलनी पाहता येते.

- सुवर्णनगरी, जैसलमेर: जैसलमेरला सुवर्णनगरी म्हणून ओळखलं जातं. कारण या भव्य ठिकाणी सोनेरी वाळवंटाचे मोठे पट्टे आहेत. जैसलमेरचे सुवर्णनगरी हे नाव त्याच्या प्राचीन आणि समृद्ध ऐतिहासिक वारशाचे प्रतिबिंब आहे. जे जगभरात प्रसिद्ध आहे. येथील इमारती सूर्यप्रकाशात सोनेर रंगाने चमकतात. तुम्ही येथील सुवर्ण किल्ला, पटवान की हवेली आणि साम बाली टिब्बा यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. जैसलमेर किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

- पांढरे शहर, उदयपूर: नैनिताल व्यतिरिक्त, उदयपूरला 'तलावांचे शहर' म्हणूनही ओळखलं जातं. पांढऱ्या संगमरवरी राजवाड्यांमुळे याला 'पांढरे शहर' असेही म्हणतात. येथे राजवाडा बांधण्यासाठी संगमरवराचा वापर करण्यात आला होता. त्याचे नैसर्गिक सौंदर्य लोकांना आकर्षित करते. गेल्या काही वर्षांत हे एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. तुम्ही येथील लेक पिचोला, सिटी पॅलेस, सज्जनगड किल्ला आणि जग मंदिराला भेट देवू शकता.

- ऑरेंज सिटी, नागपूर: महाराष्ट्रातील नागपूर हे संत्र्याच्या लागवडीसाठी आणि त्याच्या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही नागपूरला आलात तर दीक्षा भूमी, नागलोक, सेमिनरी हिल्स, अंबाझरी तलाव आणि नागपूर संग्रहालयाला नक्की भेट द्या.

- येलो सिटी, चेन्नई: चेन्नईतील अनेक ऐतिहासिक इमारती पिवळ्या रंगाच्या आहेत, विशेषतः या ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या आहेत. तुम्ही येथे मरीना बीच, फोर्ट सेंट जॉर्ज आणि कपालेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.

- ग्रीन सिटी, कुन्नूर: तामिळनाडूतील कुन्नूर शहर त्याच्या हिरवळीसाठी ओळखले जाते. येथील दऱ्या आणि बागा याला 'ग्रीन सिटी'चा दर्जा देतात. हे तामिळनाडूमधील सुंदर शहरांपैकी एक आहे. तुम्ही येथे सिम्स पार्क, डॉल्फिन्स नोज, लॅम्ब्स रॉक आणि टी गार्डनला भेट देऊ शकता.
हेही वाचा |