pink vs white colour guava: आजकाल सर्व ऋतूंमध्ये सर्व प्रकारची फळ उपलब्ध आहेत. त्यातही हिवळ्यात उपलब्ध असलेली फळं चवदार तर असतात शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. पेरू हे फळ अतिशय चवदार असून त्यात अनेक आरोग्यवर्धक रहस्य दळलेले आहेत. आंबट गोड चव असलेला पेरू लोह, पोटॅशिय, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्सनं समृद्ध आहे. बाजारामध्ये दोन प्रकारचे पेरू उपलब्ध आहेत. परंतु लाल पेरू की पांढरा पेरू आरोग्याच्या दृष्टीनं चांगला आहे. हे तुम्हाला माहिती आहे काय?

तज्ञांच्या मते, पांढऱ्या रंगाच्या पेरूपेक्षा गुलाबी रंगाचा पेरू जास्त फायदेशीर आहे. गुलाबी पेरूला सुपरफूड म्हटलं जाते. त्यात बीटा-कॅरोटीन आणि अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात. 100 ग्रॅम गुलाबी पेरू फळामध्ये 20% फायबर असते. आरोग्य तज्ञ म्हणतात की त्यात जीवनसत्त्वे अ, ब आणि ई देखील असतात.

- रक्तदाब नियंत्रण: अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने केलेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, आंबट, गोड आणि दाणेदार चवीचे मिश्रण असलेल्या पेरू फळांचे अनेक आरोग्य फायदे आहेत. या अभ्यासात उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या काही लोकांना बारा आठवडे जेवणापूर्वी पेरूचे फळ देण्यात आले. अभ्यासादरम्यान त्यांचा रक्तदाब दररोज तपासण्यात आला. यात गुलाबी पेरू खात असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब किमान 8 ते 9 अंकांनी कमी झाल्याचे आढळून आलं.
- मधुमेह प्रतिबंधित करते: पेरू, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. तसंच तो कोलेस्ट्रॉल कमी करून मधुमेह प्रतिबंधित करतो. एवढेच नाही तर नियमित पेरूच्या सेवनानं एचडीएल कोलेस्ट्रॉल आठ टक्क्यांनी वाढते. संशोधनातून असं दिसून आलं आहे की, पेरूमधील फॉलिक अॅसिड प्रजनन क्षमता वाढवते तसंच हे गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असते.
- हृदयाचे आरोग्य: पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते. पेरूमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गुलाबी पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबर असते. हे फळ रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. ( संशोधन अहवालासाठी येथे क्लिक करा ). पेरूतील उच्च फायबर सामग्री पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.
- फायबरचे प्रमाण जास्त: पेरू त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचा निरोगी ठेवण्यास आणि वांगाचे डाग कमी करण्यास मदत करते. कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ते शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. तुमच्या आहारात गुलाबी पेरूचा समावेश करून तुम्ही अनेक आरोग्य फायदे मिळवू शकता.
- जास्त वजन कमी करण्यास मदत करते: गुलाबी पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात. फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त. ही फळे खाल्ल्याने तुम्हाला बराच काळ भूक लागणार नाही. परिणामी कमी खाल्ल्यामुळ यामुळे वजन कमी होते. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, ते रक्तपुरवठा सुधारते आणि रक्ताभिसरण नियंत्रित करते. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांना गुलाबी पेरू फळांचे सेवन केल्याने आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
- तज्ञांच्या मते पांढरा आणि गुलाबी दोन्ही पेरूचे आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही कोणताही पेरू खावू शकता. परंतु गुलाबी पेरू खाणं सर्वात चांगलं आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ