ETV Bharat / health-and-lifestyle

ऑलिव्ह ऑइल की मोहरीचे तेल, हृदयासाठी काय चांगलं?

मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइलच्या आरोग्यवर्धक फायद्यांची तुलना केली तर, हृदयासाठी कोणते तेल चांगले आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया..

OLIVE OIL VS MUSTARD OIL  WHICH OIL IS BETTER FOR THE HEART  MUSTARD OIL HEALTH BENEFITS  OLIVE VS MUSTARD OIL
ऑलिव्ह ऑइल की मोहरीचे तेल, हृदयासाठी काय चांगलं? (Getty Images)
author img

By ETV Bharat Features Team

Published : June 27, 2025 at 3:35 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

olive oil vs mustard oil: आपण नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत सर्व गोष्टी तयार करण्यासाठी तेलाचा वापर करतो. तज्ञांच्या मते, शरीराचे एकूण आरोग्य राखण्यासाठी तेल महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषत: हृदयाच्या आरोग्यासाठी तेल फायदेशीर आहे. मात्र, आपण बाजारातील विविध तेलाचा वापर करतो. अनेक जण विचार न करता दुकानदार देईल ते तेल घेऊन येतात. परंतु हे तेल शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. तज्ञांच्या मते, ऑलिव्ह ऑइल आणि मोहरीचे तेल या दोन्हींमध्ये विशेष पौष्टीक गुणधर्म आहेत. चला तर जाणून घेऊया हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल आहे सर्वोत्तम.

  • ऑलिव्ह ऑइल: ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतात, विशेषतः फॉलिक अ‍ॅसिड, जे तज्ञांच्या मते वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना असं आढळून आलं आहे की, ऑलिव्ह ऑइलने समृद्ध आहार घेतल्याने रक्तप्रवाहातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, आहारात ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, डिस्लिपिडेमिया, एंडोथेलियल डिसफंक्शन आणि थ्रोम्बोसिससह हृदयाशी संबंधित अनेक जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवता येते. ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन ई सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि पेशींचा ऑक्सिडेटिव्ह तणावापासून देखील बचाव करतात. परिणामी, हृदयरोगाचा धोका कमी होतो.
  • मोहरीचे तेल: मोहरीच्या बियांपासून काढलेले तेल भारतीय स्वयंपाकात, विशेषतः उत्तर भारतात सामान्यतः वापरलं जाते. तज्ञांचे म्हणणे आहे की, त्यात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड (ALA) आणि ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड असतात. हे ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास, रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करतात. तसंच हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात असं म्हटलं जाते. त्याचबरोबर मोहरीच्या तेलात असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यास मदत करतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार, लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया (LAI) ने मोहरीचं तेल हृदय आरोग्य तेल म्हणून शिफारस केली आहे.
  • दोघांपैकी कोणते चांगले आहे? तज्ञांचे म्हणणे आहे की, ऑलिव्ह ऑइल हा हृदयाच्या आरोग्यासाठी सामान्यतः सर्वोत्तम पर्याय आहे. कारण ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त प्रमाणात असतात. जे खराब (BAD) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, जळजळ आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास उत्तम मानले जाते. मोहरीचे तेल हृदयरोगासाठी देखील चांगले असले तरी, त्यात युरिकिक अ‍ॅसिड नावाचे एक संयुग आढळतात. जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)