nutritional benefits of mangoes: उन्हाळा लागताच सर्वजण आतुरतेनं वाट पाहतात ते म्हणजे फळांचा राजा असलेल्या आंब्याची. आंबा हा आपल्यापैकी सर्वांचाच आवडता फळ आहे. त्यासाठी लोकं एप्रिल मे महिण्याची वाट पाहतात. आंबा चविनेच नाही तर औषधीय गुणांनी सुद्धा समृद्ध आहे. आंब्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलन आणि ल्युकेमिया कॅन्सर पासून बचाव होवू शकतो. तसंच आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई आणि के, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं तसंच बीटा कॅरोटीन ही पोषक तत्त्वे असतात. आंबे केवळ स्वादिष्टच नाही तर आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. आंब्याला आरोग्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर आंब्याला उन्हाळी सुपरफूड म्हणून देखील ओळखलं जाते. भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे.

- पचक्रिया सुधारते: आयुर्वेदानुसार आंब्यामध्ये असलेल्या अमायलेज एंझाइममुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अमायलेज एंझाइम अन्न पचवण्यास मदत करतात. तसंच कॉम्प्लेक्स स्टार्च तोडण्यात देखील मदत करतात. तसंच आंब्यात पुरेशा प्रमाणात फायबर आढळते जे बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम आहे. विशेष म्हणजे पिकलेले आंबे खाल्ल्यास अपचन, पोटफुगी तसंच बद्धकोष्ठता कमी होते.
- वजन कमी करण्यासाठी उत्तम: आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात जे पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसंच आंब्यातील फायबरमुळे पोट बराच काळ भरलेलं असतं. परिणामी जास्त भूक लागत नाही. तसंच यामुळे तुम्ही अस्वास्थ्यकर स्नॅक्स पासून दूर राहता जे वजन कमी करण्याठी उत्तम आहे. त्याचबरोबर आंबा हे कमी कॅलरीज युक्त फळ आहे जे उच्च पोषण प्रदान करते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.
- उष्णतेशी संबंधित विकार कमी करण्यासाठी फायदेशीर: आंब्याला थंड फळ मानले जाते. जे उन्हाळ्याच्या महिन्यांत शरीराची उष्णता संतुलित करण्यास मदत करते. आंब्याच्या रसापेक्षा पनं प्यायल्यास उष्माघात आणि निर्जलीकरण यासारख्या उष्णतेशी संबंधित विकारांपासून आराम मिळतो.
- केस आणि त्वचेसाठी उत्तम: आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6 सी आणि ई आढळते. जे त्वचा आणि केसांसाठी महत्वाचे आहे. हे अँटीऑक्सिडंट्स प्रदूषणामुळे तसंच सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे बचाव करतात. तसंच यातील बीटा कॅरोटीन वद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आंब्याच्या लगद्याचा वापर केल्यानं सूर्यप्रकाशातील जळजळ कमी होते तसंच कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझिंग प्रदान करते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते: आंब्यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तसंच शरीराला संसर्ग आणि रोगांशी लढण्यास मदत करते. उन्हाळ्यात नियमितपणे आंब्याचं सेवन केल्यास सर्दी, फ्लू तसंच इतर हंगामी आजार टाळण्यासाठी आंबा खाणे चांगलं आहे.
- मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले: आंब्यातील व्हिटॅमिन बी6 संज्ञानात्मक कार्य आणि मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. तसंच यातील सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखे घटक न्यूरोट्रांसमीटर निर्मितीस मदत करतात. जे मूड नियंत्रित करतात तसंच मानसिक आरोग्य सुधारतात.
- दृष्टी सुधारते: आंबे व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहेत जे दृष्टी सुधारण्यासाठी आवश्यक आहे. नियमित आब्याच्या सेवनानं मॅक्युलर डिजेनेरेशन आणि दृष्टी कमी होणे यासारख्या डोळ्यांच्या आजारापासून तुमचं संरक्षण करते आणि डोळ्यांचे एकूण आरोग्य सुधारते.
- हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले: आब्यातील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवते तसंच ऑक्सिडेटिव्ह ताण रोखून हृदयाचं आरोग्य चांगल करण्यात हातभार लावते. तुम्ही नियमित आंब्याच सेवन केल्यास हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. परंतु एकाच वेळी खूप आंबे खावू नये असा सल्ला तज्ञ देतात.
- चांगला डिटॉक्सिफाय एजंट: आंबामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म आढळता जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. तसंच मूत्रपिंडाचे आरोग्य आणि मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध करतात. तुम्ही तुमच्या आहारात आंब्याचा समावेश केल्यास शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला चालना मिळते.
- आंबा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहते: आंब्यातील बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवते. तुम्ही आंबा नियमित खावू शकता परंतु ज्यांना साखरेचा त्रास आहे त्यांनी आंब्याच मर्यादित सेवन करावं.
- आंबे खाण्याची मार्गदर्शक तत्त्वे
- पचनक्रिया सुधारण्यासाठी तसंच उर्जेची पातळी वाढवण्यासाठी पिकलेल्या आंब्याचं सेवन सकाळी रिकम्या पोटी करावं.
- आंब्यासोबत दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळा कारण आयुर्वेदानुसार हे मिश्रण विसंगत मानलं जाते त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
- मधुमेही रुग्णांनी आंब्याचं सेवन जास्त करू नये. कारण आंब्याचं ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम आहे. ज्यामुळे रक्ताील साखरेची पातळी वेगानं वाढू शकते. मधुमेह ग्रस्त लोकांनी आंबे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- ज्यांना किडनी संबंधित समस्या आहे तसंच रक्तातील साखरेची पातळी जास्त असलेल्या आणि आंब्याीच अॅलर्जी असलेल्यांनी आंबा खाणं टाळावं.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ