New Style Chutney For Dosa Idli: सकाळी घरात साउथ इंडियन नाश्ता बनला की, हमखास शेंगदाणा आणि नारळाची चटणी तयार केली जाते. परंतु नेहमी एकाच प्रकारीच चटणी खाणं कंटाळवाणे वाटत असेल. वेगवेगळ्या पदार्थांसोबत वेगवेगळ्या चटण्या खाणं लहानंपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. घरात इडली किंवा डोसा बनला तर प्रामुख्यानं नारळाची आणि शेंगदाण्यांची चटणी बनवली जाते. परंतु तुम्ही देखील नवीन स्टाईलची चटणीची खाण्याचा प्लान करत आहात का? तर आज आम्ही तुमच्यासाठी एक आगळीवेगळ्या चटणीची रेसिपी घेऊन आलोय. ही स्वादिष्ट तर आहे, परंतु अगदी कमी वेळात तुम्ही ती तयार करू शकता. साऊथ इंडियन पदार्थं जसे की, डोसा, इडली, सांबर वडा आदींसोबत ती खायला खूप छान लागते. चला तर जाणून घेऊया चणाडाळीपासून तायर करण्यात येणारी ही चटणी.

साहित्य
- तेल - एक चमचा
- हिरव्या मिरच्या - दोन
- कांदा - एक
- टोमॅटो - एक
- रोस्टेड चना डाळ - अर्धा कप
- लसूण पाकळ्या - आठ
- जिरं - ½ टीस्पून
- चिंच - चवीनुसार
- आलं - लहान तुकडा
- मीठ - चवीनुसार

कृती
- वेगळ्या चवीची ही चविष्ट चटणी तयार करण्यासाठी, प्रथम कांदा आणि टोमॅटोचे छोटे तुकडे करा आणि बाजूला ठेवा.
- आता चुलीवर एका पॅन ठेवा त्यात थोडं तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला आणि थोडा वेळ परतून घ्या.

- नंतर चिरलेला कांदा आणि टोमॅटोचे तुकडे घाला, ढवळा आणि थोडा वेळ परतून घ्या, नंतर झाकण ठेवून थोडा वेळ उकळू द्या.
- टोमॅटोचे तुकडे ७०% शिजले की, झाकण काढा, चांगलं मिसळा आणि स्टोव्ह बंद करा.
- आता, एक मिक्सर जार घ्या आणि त्यात रोस्टेड चना डाळ, सोललेल्या लसूण पाकळ्या, जिरे, चिंच आणि आल्याचा तुकडा घाला.
- तसंच, तुम्ही आधी तयार केलेलं कांदा-टोमॅटो मिश्रण बारीक करा, चवीनुसार मीठ घाला आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून ते बारीक करा.

फोडणीकरिता लागणारे साहित्य
- तेल - दोन चमचे
- मोहरी - ½ टीस्पून
- जिरं
- शेंगदाणे - एक चमचा
- काळे हरभरे - एक चमचा
- लसूण पाकळ्या - चार
- मिरची - एक
- कढीपत्ता

कृती
- तडका लावण्यासाठी गॅस स्टोव्हवर एक लहान कढई ठेवा आणि त्यात तेल घाला. तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरं, बेसन आणि काळे हरभरे घाला आणि फ्राय करा.
- चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यात लसूण पाकळ्या, मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घाला आणि चांगल परतून घ्या
- हे मिश्रण चांगलं फ्राय झाल की स्टोव्ह बंद करा आणि पूर्वी तयार केलेल्या चटणीवर घाला आणि चांगलं मिक्स करा
- तयार आहे तुमची रोस्टेट चना डाळ चटणी.