Male Menopause: चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडल्यानंतर महिलांना मोनोपॉजचा म्हणजेच रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो हे सर्वांना माहिती आहे. रजोनिवृत्ती हा शब्द ऐकल्यास याचा संबंध सर्वसामान्यपणे महिलांशी जोडला जातो. परंतु पुरुषांनाही वयोमानानुसार हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो. महिलांप्रमाणे पुरुषांनाही मोनोपॉज फेझमधून जावं लागते. परंतु पुरुषांच्या मोनोपॉजला अँड्रोपॉज असं म्हणतात. वैद्यकीय भाषेत या स्थितीला टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी सिंड्रोम किंवा अँड्रोजन डेफिशियन्सी किंवा हायपोगोनॅडिझम असं म्हणतात. वयानुसार पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण कमी होते. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तसंच लैंगिक आरोग्यावर होतो. यामुळे त्यांच्या जीवशैलीत बदल होऊ शकतात.

अँड्रोपॉज हा एक नैसर्गिक टप्पा असून त्याबद्दल फासशी जागरूकता नसल्यामुळे याच्या लक्षणंकडे दुर्लक्ष केलं जातं. हा टप्पा पुरुषांध्ये 40-50 दरम्यान येतो. अँड्रोपॉज टप्पा पुरुषांकरिता तितकाच संवेदनशील असतो, जितका महिलांसाठी मोनोपॉजचा. चला तर जाणू घेऊया पुरुषांच्या रजोनिवृत्ती लक्षणं आणि उपाय.

- अँड्रोपॉजची लक्षणं
- चिडचिड आणि वारंवार मूड स्विंग्स होणे
- सतत उदास असणे
- शरीरात शक्तीचा अभाव
- आनंद, उत्साह आणि उर्जेचा अभाव
- निद्रानाश, थकवा जास्त
- अति प्रमाणात घाम येणे
- टक्कल पडणे, केस गळणे
- लठ्ठपणा वाढणे
- हाडे आकुंचन पावणे
- आत्मविश्वास कमी होणे
- वंध्यत्व
- ऑस्टियोपोसोसिसच्या प्रमाणात वाढ
- लैंगिक इच्छा कमी होणे
- वृषणाचा आकार कमी होणे
- अल्पकालीन स्मरणशक्ती कमी होणे

- आहार काय घ्यावं
- कॅल्शियम: आहारात कॅल्शियमचा समवेश करावा. कॅल्शियम सेवन योग्यरित्या केल्यास अँड्रोजनची लक्षणं दूर करण्यास मदत होऊ शकते. याकरिता आहारात दूध, तीळ, नाचणी, अंडी, मासे, ब्रोकोली आणि विविध प्रकारच्या नट्संचा समावेश करा. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
- निरोगी चरबी: आवश्यक फॅटी अॅसिडचे सेवन केल्यास टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन वाढू शकते. याकरिता तुम्ही तुमच्या आहारात काजू, दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी, तूप किंवा बटर यासारखे निरोगी चरबी असलेल्या चरबीचा समावेश करा.
- झिंक: झिंक हे आवश्यक खनिज आहे, जे प्रजनन आरोग्य राखण्याचे आणि टेस्टोस्टेरॉनसह हार्मोन्सचे संतुलन निर्माण करण्याचे कार्य करते. झिंकच्या कमतरतेमुळे मूडस्विंग्स होऊ शकतो. शरीरातील झिंकची पातळी सुरळीत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शेंगा, काजू आणि डार्क चॉकलेट्सचा समावेश करा.
- वजन योग्य ठेवा: जास्त वजन अनेक आरोग्यविषयक समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे तुमचं वजन योग्य ठेवा. अँड्रोपॉज लक्षणं कमी करण्यासाठी वजन सामान्य असणे गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी जंक फूड्स, गोड पदार्थ आणि वाईट चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.
(अस्वीकरण: सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिली आहे. ईटीव्ही भारताबद्दल किंवा माहितीच्या वैज्ञानिक वैधतेबद्दल कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC1070997/