ETV Bharat / health-and-lifestyle

अंगदुखीमुळे त्रस्त आहात? असू शकतो फायब्रोमायल्जिया; पुरुषांच्या तुननेत महिलांमध्ये आजाराची शक्यता जास्त

फायब्रोमायल्जिया हा आजार संधिवात आणि थकवा सिंड्रोमपेक्षा अधिक गंभीर आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता तीनपट जास्त आहे. वाचा सविस्तर..,

FIBROMYALGIA SYMPTOMS  FIBROMYALGIA REMEDIES  FIBROMYALGIA
अंगदुखीमुळे त्रस्त आहात (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : January 31, 2025 at 5:56 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

Fibromyalgia: दिवसभरातीच्या कामामुळे आणि धावपळीमुळे अनेकांना अंगीदुखीची समस्या भेडसावते. अधूनमधून हलकेसे अंग दुखणे चिंतेची बाब नाही. परंतु अंगीदुखीची समस्या वारंवार आणि दीर्घकाळ राहिल्यास चिंतेची बाब ठरू शकते. जर तुम्ही सतत वेदना अनुभवत असाल तर हे फायब्रोमायल्जियाची लक्षणं असू शकते. ही एक दीर्घकालीन वेदनादायी स्थिती आहे. पुरुषांच्या तुननेत महिलांमध्ये या आजाराचा धोका तीनपट जास्त आहे. 30 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना हा आजार जडण्याची शकता असते. डॉक्टरांच्या मते, फायब्रोमायल्जिया हा आजार संधिवात आणि थकवा सिंड्रोमपेक्षा अधिक गंभीर आहे. केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही हा परिणाम करू शकते.

  • फायब्रोमायल्जिया म्हणजे काय?

फायब्रोमायल्जिया ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये शरीराच्या सर्वभागामध्ये सतत वेदना जाणवतात. झोप, मूडस्विंग तसंच स्मरणशक्तीवर याचा परिणाम होतो. फायब्रोमायल्जियामुळे महिलांना झोपेची कमतरता, थकवा तसंच काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. फायब्रोमायल्जियामध्ये संधिवाताप्रमाणेच थकवा वेदना जाणवतात. हा एक धोकादायक विकार आहे.

  • फायब्रोमायल्जिया लक्षणं
  • संपूर्ण शरीरात वेदना
  • अशक्तपणा
  • थकवा
  • नैराश्य
  • झोपेच्या समस्या
  • मायग्रेन
  • शांत राहण्याची इच्छा
  • स्नायूंवर सूज
  • मूडस्विंग
  • उपाय
  • संतुलित आहार घ्या. कोबी, लसूण, कांदा, सफरचंद, गाजर, टोमॅटो, पालक यासरख्या पोषक घटकांचा समावेश आहारात करा.
  • वेदना कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यानं आंघोळ करा.
  • शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी प्या.
  • मद्यपान आणि धूम्रपान बंद करा.
  • नियमित किमान 30 मिनिटं व्यायम करा.
  • मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा
  • ताण व्यवस्थापन करा.
  • वेदना वाढवणारे पदार्थ टाळा जसे की, कार्बोहायड्रेट्स, रिफाइंड, साखर तसंच जंक फूड.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK540974/

हेही वाचा

  1. युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ फायदेशीर
  2. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे? या ७ पदार्थांचे सेवन करा
  3. गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; 'या' पदार्थापासून रहा दहा हात लांब
  4. अशाप्रकारे करा शरीरातील 'व्हिटॅमिन बी 12' ची कमतरता पूर्ण