international yoga day 2025: व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कामाचा ताण या कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे अनेक लोक तणाव, नैराश्य आणि चिंतेत जगत आहेत. ताणतणावाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सोपे योगासन घेऊन आलोय. ही योगासानं दररोज केल्यास तुम्हाल तणावापासून त्वरीत आराम मिळू शकतो.
- शवासन: हे आसन करण्यासाठी, पाठीवर झोपा आणि स्पर्श न करता तुमचे पाय एकमेकांच्या जवळ आणा. तुमचे हात बाजूला ठेवा आणि तुमचे तळवे वरच्या दिशेने ठेवा. या दरम्यान, लक्षात ठेवा की डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर जास्त दबाव येऊ नये. यानंतर, दीर्घ श्वास घेत डोळे बंद करा आणि डोक्याच्या वरच्या भागापासून पायांपर्यंत लक्ष केंद्रित करा. 4-5 मिनिटे योगा करा. हे प्राणायाम शरीराला आराम देते आणि मज्जासंस्था आणि रक्तदाब देखील बरा करते. तणाव कमी करण्यासाठी देखील हे सर्वोत्तम आसन आहे.
- बाल मुद्रा योग: ताण कमी करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी बालासन फायदेशीर आहे. सर्वप्रथम, वज्रासन स्थितीत पाय मागच्या बाजूला मोडून बसा. आता श्वास घेताना दोन्ही हात वर घ्या आणि श्वास सोडत पुढं वाका. तळवे जमिनीला स्पर्श करेपर्यंत हा क्रम चालू ठेवा. यानंतर या आसनात आल्यानंतर डोके जमिनीवर ठेवा आणि शरीराला हलकं सोडा. आता श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घेतना आणि सोडताना घाई करू नका. तुम्ही या आसनात 2 ते 3 मिनिट राहू शकता. हे आसन दररोज किमान 5 वेळा करा.
- भ्रामरी प्राणायाम: तणावाच्या परिस्थितीत भ्रामरी प्राणायम करणे खूप फायदेशीर आहे. या योगासनाने मनाला शांती मिळते आणि ताण-तणाव दूर होतो. या प्राणायमाने उच्च रक्तदाब कमी होतो तसंच झोपेसंबंधित समस्या देखील दूर होतात. नियमित भ्रामरी प्राणायाम केल्याने आरोग्यविषयक अनेक फायदे होतात. भ्रामरी प्राणायम करताना शांत ठिकाणी डोळे बंद करून बसा. दोन्ही हातांची तर्जनीची बोटे कानांवर ठेवा. तसंच तोंड बंद करून फक्त नाकानं श्वास घ्या. आता श्वास घ्या आणि सोडा. हे योगासने 5-10 मिनिटे करा.
- कॅट काउ स्ट्रेच: कॅट काउ स्ट्रेच करण्यासाठी श्वास सोडा आणि तुमची पाठ छताकडे वळवा आणि तुमची नाभी तुमच्या मणक्याकडे वर आणा. पाठीचा कणा आणि डोके सरळ करून त्याच स्थितीत परत या. गायीच्या आसनासाठी, खोलवर श्वास घ्या आणि स्वतःला मागे वाकवा जेणेकरून तुमचे शेपटीचे हाड वरच्या दिशेने जाईल आणि तुमची नाभी आत खेचा आणि तुमच्या पोटाचे स्नायू तुमच्या मणक्याच्या जवळ ठेवा. ही आसने कंबरेच्या खालच्या भागाला आराम देतात आणि ताण कमी करतात.
- सेतुबंधासन (ब्रिज पोज): ब्रिज पोज देखील अद्भुत आहे आणि ते करणं देखील फार कठीण नाही. हे करण्यासाठी, तुमच्या पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही गुडघे वाकवा, पाय जमिनीवर सपाट ठेवा. यानंतर, तळवे खाली तोंड करून हात शरीराला स्पर्श करा आणि नंतर एक दीर्घ श्वास घ्या, पाठीचा कणा जमिनीच्या वर उचला. यानंतर, श्वास घ्या आणि 4-8 सेकंद धरून ठेवा. हे आसन चिंता, थकवा, पाठदुखी आणि निद्रानाशासाठी देखील फायदेशीर आहे.