Warning Signs Of Kidney Disease: जगभरात किडनीची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत किडनीच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार हे मूत्रपिंडाच्या आजारात वाढ होण्यास कारणीभूत ठरणारे एक प्रमुख घटक आहेत. आकडेवारीनुसार भारतातील 17 टक्के लोकसंख्येला मूत्रपिंडाचा आजार आहे.
योग्य उपचार न मिळाल्यामुळे दरवर्षी लाखो लोक किडनीच्या आजाराने जीव गमावतात. याचे कारण म्हणजे मूत्रपिंडाचे नुकसान झाल्यास त्याचे लवकर निदान होत नाही तसंच मूत्रपिंडावरील उपचारांचा खर्च जास्त असतो. त्यातही महत्त्वाचं म्हणजे किडनी निकामी झाल्यास त्याची लक्षणं खूप उशिरा दिसू शकतात. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? मूत्रपिंडाचे कार्य बिघडलेले असल्यास शरीर काही संकेत देतो, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. चला तर जाणून घेऊया मूत्रपिंड निकामी होण्याची काही लक्षणे.
- लघवीमध्ये बदल: लघवीमध्ये बदल हे मूत्रपिंड निकामी होण्याच्या सर्वात सामान्य आणि सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. वारंवार लघवी लागणे. विशेषतः रात्री लघवीला फेस येणे आणि लघवीचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे ही लक्षणे दिसू शकतात. लघवी करताना त्रास होणे आणि वेदना होणे हे देखील मूत्रपिंडाचे नुकसान दर्शवते.
- त्वचेच्या समस्या: जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा तुम्हाला खाज सुटणे, चिडचिड होणे आणि कोरडी त्वचा जाणवू शकते. या परिस्थिती उद्भवतात कारण मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त खनिजे काढून टाकण्यात अपयशी ठरतात. ज्यामुळे ते त्वचेवर जमा होतात.
- चवीतील बदल: जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य बिघडते तेव्हा रक्तात विषारी पदार्थ जमा होतात. यामुळे तोंडात धातूची चव येऊ शकते तसंच चव आणि भूकेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आजारपण तसंच उलट्या होणे हे देखील मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण आहे.
- झोपेचा त्रास: झोपेचा त्रास हा मूत्रपिंडाच्या आजाराशी देखील संबंधित आहे. जर तुम्हाला खूप थकवा असूनही झोप येत नसेल किंवा झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी करून घ्यावी.
- श्वास घेण्यास त्रास होणे: जेव्हा मूत्रपिंडे योग्यरित्या काम करत नाहीत तेव्हा फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होऊ शकतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो मूत्रपिंडाच्या आजारामुळे अशक्तपणा येतो यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होवू शकते. परिणामी श्वास घेण्यास देखील त्रास होतो. म्हणून, जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्या.
- सूज: जर तुमच्या पायांमध्ये, गुडघ्यावर, तसंच हात आणि बोटांमध्ये अस्पष्ट सूज असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय, चेहऱ्यावर आणि डोळ्यांभोवती दिसणारी सूज देखील मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे होऊ शकते. म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
- दीर्घकालीन थकवा: पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणे हे देखील मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे. म्हणून, जर तुम्हाला अकारण थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
हेही वाचा
उतार वयात महिलांना होऊ लागतात 'या' समस्या; 80 टक्के महिलांनी सांगितले वास्तव
उन्हाळी हंगामातील ही फळं मधुमेही रुग्णांनी चुकूनही खावू नये
तुम्ही देखील पाठदुखीच्या समस्येनं त्रस्त आहात काय? असू शकते ‘ही’ मोठी समस्या