Summer Special Mint Juice Recipe: उन्हाळ्याच्या कडक उष्णतेपासून स्वत:च बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. गरमीपासून आराम मिळावं याकरिता आपण लिंबू पाणी आणि फळांचा रस या आरोग्यदायी पेयांना उन्हाळात जास्त महत्व देतो. फक्त पाणी पिऊन तहान भागवण्यापेक्षा ही पेय घेणे आरोग्यासाठी फार चांगले आहेत. काही प्रकारचे आरोग्यदायी पेय घरीच तयार करता येतात. तुमच्या घरातील स्वयंपाकघरात आणि फ्रिजमध्ये नेहमी उपलब्ध असलेल्या विविध घटकांपासून विविध पेय तयार करता येतात. चला तर उन्हाळ्यात तहान भागवण्यापासून ते आरोग्यदायी फायदे देणाऱ्या या पेयाबद्दल जाणून घेऊयात.
उन्हाळ्याच्या कडक उन्हात, शरीराला थंडावा देणारे आणि उष्णतेवर मात करणारे पदार्थ आणि पेये घेणे सामान्य आहे. उन्हाळ्यामध्ये सर्व ताक, नारळपाणी, उसाचा रस आणि फळांचे रस घेणे पसंत करतात. मात्र, तुम्ही कधी 'पुदीना जल जीरा पाणी' वापरून पाहिले आहे का, जे शरीराला त्वरित थंड करते? ते कमी खर्चात घरी सहज बनवता येतात. हे पेय बनवण्यासाठी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले घटक पुरेसे आहेत. उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी नियमित पिल्यास शरीराचे तापमान राखण्यास मदत होते. तसंच पोटाशी संबंधित समस्यांवर देखील पुदिना उत्तम आहे. यासोबतच पुदिन्याचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी नियमित पुदिना पाण्याचं सेवन करावं.
- मळमळ कमी: उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना मळमळ किंवा मोशन सिकनेस होते. यावर पुदिना पाणी उत्तम आहे. पुदिना थंड असल्याने मळमळ आणि मोशन सिकनेसच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
- श्वसन आणि घशाचे विकार: पुदिना श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. पुदिन्याच्या पाण्यामुळे खोकला, घसा बसणे आणि सायनुसायटिसची लक्षणं कमी होण्यास मदत होते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते: पुदिन्यात व्हिटॅमिन ए आणि सी, लोह, थायमिन, लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स , अँटीव्हायरल गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तसंच कोणत्याही संसर्गापासून तुमचा बचाव करतात.
- तणाव कमी: पुदिन्याचे पाणी तणाव कमी करण्यासाठी उत्तम आहे. हे प्यायल्यास ताण कमी होवू शकतो.
- आवश्यक साहित्य
- पुदिन्याची पाने - अर्धा कप
- लिंबाचा रस - ६ टेबलस्पून
- काळे मीठ - २ चमचे
- पाणी - ८ कप
- जिरे - २ टेबलस्पून (भाजलेले)
- धणे - अर्धा कप
- किसलेले आले - २ टेबलस्पून
- साखर - ४ टेबलस्पून
- चिंचेचा कोळ - २ टेबलस्पून
- मीठ - चमचा
- बर्फाचे तुकडे
- कृती
- प्रथम पुदिना आणि कोथिंबीरची पाने धुवून बारीक चिरून घ्या.
- हे सर्व एका भांड्यात घ्या, त्यात चिंचेचा कोळ, भाजलेले जिरे आणि किसलेले आले घाला आणि चांगले मिसळा.
- नंतर, ते सर्व एका मिक्सर जारमध्ये घाला, त्यात मीठ, काळे मीठ, साखर, लिंबाचा रस आणि चार कप पाणी घाला आणि सर्व साहित्य चांगले बारीक करून घ्या.
- आता हे मिश्रण चाळणीच्या मदतीने एका भांड्यात गाळून घ्या आणि उरलेला लगदा फेकून द्या.
- मिश्रणात चार कप पाणी घाला आणि चांगले मिसळा.
- शेवटी, हे मिश्रण एका ग्लासमध्ये ओता त्यात बर्फाचे तुकडे घाला, लिंबाच्या फोडी आणि पुदिन्याने सजवा आणि सर्व्ह करा.
- स्वादिष्ट आणि ताजेतवाने करणारा 'पुदिना जल जीरा पेय' तयार आहे.