ETV Bharat / health-and-lifestyle

तेलाचा एक थेंबही न घालता फक्त 10 मिनिटांत तयार करा ही झणझणीत चटणी - HOW TO MAKE ONION CHILLI CHUTNEY

जेवणाची चव वाढवण्याकरिता बरेच जण हमखास विविध प्रकारच्या चटणी तयार करतात. अशाच एका चटणीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वाचा सविस्तर

ONION GREEN CHILLI CHUTNEY  HOW TO MAKE ONION CHILLI CHUTNEY  ONION CHILLI CHUTNEY MAKING PROCESS
कांदा हिरवी मिरची चटणी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : April 17, 2025 at 6:42 PM IST

Updated : April 17, 2025 at 7:03 PM IST

2 Min Read

How To Make Onion Chilli Chutney: अनेकदा असं होतं की आपल्याकडे भाजीला पर्याय नसतो किंवा भाजी तयार करण्याचा वेळ नसतो. अशावेळी महिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे आता स्वयंपाकाला काय करायचं. अशा प्रसंगी बहुतांश घरामध्ये पिठलं किंवा डाळ फ्राय तयार केलं जाते. परंतु आज आम्ही तुमच्याकरिता एक वेगळा पर्याय घेऊन आलोय. घरी भाजीसाठी पर्याय नसल्यास तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.

प्रत्येकाच्या घरी चटणीकरिता लागणारे साहित्य उपलब्ध असतातच. कुणी मिक्समरमध्ये बारीक करून काही प्रकारच्या चटण्या तयार करतात किंवा विविध पदार्थ आणि तेल घालून चटणी तयार करतात. परंतु अशी एक चटणी आहे जी तेल न वापरता तयार केली जाते. त्यासाठी स्टोव्ह देखील चालू करण्याची गरज नाही. त्याचबरोबर ही चटणी बनवण्यासाठी जास्त मेहनत देखील लागत नाही. खूप कमी घटकांमध्ये आणि खूप कमी वेळात ही एक चविष्ठ चटणी तयार करता येते. चला तर जाणून घेऊया 10 मिनिटात तयार होणारी कांदा आणि मिरचीची चटणी तयार करण्याची पद्धत.

  • कांदा हिरवी मिरची चटणीसाठी आवश्यक साहित्य
  • हिरव्या मिरच्या - 10 ते 12
  • मोठे कांदे - 1
  • जिरे - 1 चमचा
  • चिंच - एका मोठ्या लिंबाच्या आकाराएवढी
  • सोललेल्या लसूण पाकळ्या - 10
  • कोथिंबीरची पाने - आवडीनुसार
  • मीठ - गरजेनुसार
  • कृती
  • आपण दररोज वापरत असलेल्या गडद हिरव्या रंगाच्या मिरच्यांपेक्षा कमी हिरव्या असलेल्या जाड हिरव्या मिरच्या निवडा. कारण बारीक मिरच्यांपेक्षा जाड मिरच्या कमी तिखट असतता.
  • आता मिरच्या बारीक कापून घ्या
  • जर तुम्हाला चटणी झणझणीत बनवायची असेल तर त्यात दोन किंवा तीन गडद हिरव्या मिरच्या घालू शकता.
  • चिंचाचे तुकडे घ्या आणि ते एका भांड्यात भिजत ठेवा.
  • लसूण पाकळ्या सोलून बाजूला ठेवा
  • आता एक मोठ्या आकाराचा कांदा घ्या आणि तो मध्यम आकारात चिरा
  • नंतर एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य टाका सोबत त्यात एक चमचा जिरं घाला.
  • या मिश्रणात भिजवलेल्या चिंचेचे पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  • हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या परंतु लक्षात ठेवा आपल्याला संपूर्ण मिश्रण एकजीव करायचं नाही. त्याला गरेदार ठेवावं
  • चटणी खरखरीत असेल तरच ती खाताना चिवष्ट लागेल.
  • स्वादिष्ट चटणी तयार आहे
  • ही चटणी तुम्ही भाकर किंवा गरम भातासोबत खावू शकता.

हेही वाचा

Last Updated : April 17, 2025 at 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.