Makhana Raita: मखाणा आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. इंग्रजीत याला फॉक्स नट म्हणतात. हा कमळाच्या बियांपासून बनवला जातो. हा पोषक तत्वांचा खजिनाच आहे. भारतातच नाही तर विदेशातही लोकप्रिय पदार्थांपैकी मखाना एक आहे. सामान्यतः वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याशिवाय रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यातही तो महत्वाची भूमिका बजावतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार यामधील प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. 2017 मध्ये जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या 'मखानाचे पोषण आणि फायटोकेमिकल विश्लेषण (युरिल फेरॉक्स सॅलिस्ब)' या अभ्यासातही हे उघड झाले.

उन्हाळ्याच्या उष्ण हवामानात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दही फार उपयुक्त आहे. तसेच अनेकांना थेट मखाना खाणं आवडत नाही. अशावेळी दही आणि मखाण्यापासून चविष्ट मखाणा रायता तयार करता येऊ शकतो. हा चवदारच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर पाहुया हा बहुउपयोगी मखाना रायता कसा तयार करावा?
- मखणा रायता बनवण्यासाठी साहित्य
- 1 कप दही
- 2 कप मखाना
- 1 टीस्पून रायता मसाला
- चवीनुसार लाल तिखट
- 1 टीस्पून चाट मसाला
- 1टीस्पून गरम मसाला
- 1 टीस्पून देशी तूप
- 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- कृती
मखाणा रायता बनवण्यासाठी, प्रथम एक पॅन घ्या आणि तो मध्यम आचेवर गरम करा. नंतर त्यात एक चमचा देशी तूप घाला आणि थोडे गरम झाल्यावर मखाणा घाला आणि परतून घ्या. मखान्यांचा रंग हलका सोनेरी झाल्यावर गॅस बंद करा आणि मखाणा एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. मखाणे थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करून घ्या. आता एक भांडे घ्या, त्यात दही घाला आणि चांगले फेटून घ्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दही मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकूनही फेटू शकता. दही चांगले मिसळल्यावर त्यात चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, रायता मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा. आता त्यात बारीक वाटलेला मखाणा घाला आणि मिक्स करा. जर रायता तयार झाल्यानंतर जाड वाटत असेल तर तुमच्या गरजेनुसार पाणी घाला. तुमचा स्वादिष्ट मखाणा रायता तयार आहे. आता त्यावर हिरव्या कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.