hotel style Naralachi chutney: शेंगदाण्याच्या चटणीनंतर सर्वात खाल्ली जाणारी चटणी म्हणजे नारळाची चटणी. चविष्ट नारळाच्या चटणीसोबत सर्वांना नाश्ता करायला आवडते. नारळाची चटणी नाश्त्यात खाल्ल्याने नाश्त्याला एक वेगळीच चव येते. साउथ इंडियन नाश्त्याची चव द्विगुणीत करण्यासाठी नारळाची चटणी उत्तम आहे. इडली, डोसा, उत्तपम यासारख्या साउथ इंडियन पदार्थांसोबत नारळाची चटणी नसल्यास ते खाण्यात काही मजा नाही. हॉटेल स्टाइल नारळाची चटणी खायला सर्वांनाच आवडते. मात्र, अनेकांना ही चटणी कशी तयार करावी हे माहिती नसते. हॉटेल स्टाइल नारळाची चटणी बनवणे खूप सोपं आहे. तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय अगदी कमी वेळामध्ये नारळाची चटणी तयार करू शकता.चला तर विलंब न करता स्वादिष्ट आणि चविष्ट नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूया.

साहित्य
- नारळाचे तुकडे 1 कप
- हिरव्या मिरच्या - 2
- आल्याचा तुकडा - लहान
- चिंच - चविनुसार
- फुटाणा डाळ(रोस्टेड चना डाळ) - एक चतुर्थांश कप
- तेल -2 चमचे
- कोथिंबीरची - चविनुसार
- मीठ - चविनुसार

तडक्याकरिता लागणारे साहित्य
तेल -2 टेबलस्पून
मोहरी - अर्धा चमचा
जिरं - अर्धा चमचा
शेंगदाणे - अर्धा चमचा
उडद डाळ- अर्धा चमचा
मिरची - 2
कढीपत्ता

तयार करण्याची पद्धत
- नारळाच्या कवचापासून नारळ वेगळं करा आणि त्याचे लहान तुकडे करा.
- स्टोव्ह चालू करा, त्यावर एक कढई ठेवा आणि त्यात तेल घाला. गरम तेलात हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घाला आणि मध्यम आचेवर गरम करा.
- मिरच्या शिजल्यानंतर, स्टोव्ह बंद करा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.
- एका मिक्सर जारमध्ये भाजलेल्या हिरव्या मिरच्या, नारळाचे तुकडे, रोस्टेड चना डाळ, चिंच , धणे आणि मीठ घालून बारीक करा. चटणीमध्ये थोडं पाणी घाला आणि चांगली एकजीव होईपर्यंत वाटून घ्या.

- आता बारीक झालेली पेस्ट एका भांड्यात काढा.
- आता गॅस चालू करा आणि त्यावर पॅन ठेवा तसेच त्यात तेल घाला.
- तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, उडीद डाळ, आणि रोस्टेड चना डाळ आणि चिंच घाला आणि चांगलं परतून घ्या.
- आता वरील मिश्रणात वाढलेल्या मिरच्या घाला आणि चांगलं ढवळा आणि स्टोव्ह बंद करा.
- वरील मिश्रण पूर्वी केलेल्या नारळाच्या मिश्रणात घाला तयार आहे तुमची हॉटेल स्टाईल चविष्ट नारळाची चटणी