Hare Care Tips: आपल्यापैकी प्रत्येक जण चांगले केस असण्याचे स्वप्न पाहतो. असे क्वचितच असेल ज्याला लांब, सुंदर आणि निरोगी केस हवे नसतील. परंतु दिवसेंदिवस केसांसंबंधित तक्रारी वाढत आहेत. प्रदूषण, पौष्टिक आहाराचा अभाव आणि इतर कारणांमुळे केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे केसांची जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. केसांच्या आरोग्याकरिता प्रोटीनयुक्त आहार घेणे चांगलं आहे. परंतु चांगल्या केसांसाटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टाळू किती स्वच्छ आणि किती निरोगी आहे. केस स्वच्छ करण्यासाठी केस धुण्याची पद्धत योग्य हवी. काही असे लोक आहेत वेळोवेळी केसं शांपूने धुतात. परंतु हेअर टाइपनुसार आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करावं हे बऱ्याच जणांना माहिती नाही. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. चला तर जाणून घेऊया सुंदर आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून किती दिवस केस धुवावे.

- स्टेट हेअर: स्टेट हेअर असलेल्या लोकांचे त्यांच्या चमकदार आणि रेशमी केसांबद्दल त्यांचे कौतुक केले जाते, परंतु सरळ केस राखण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ते सहजपणे तेलकट आणि चिकट होतात. जर तुमचे केस फक्त एका दिवसात तेलकट झाले तर तुम्ही दर दुसऱ्या दिवशी ते धुवू शकता. कोरडे केस राखण्यासाठी धुण्याच्या चक्रांमध्ये ड्राय शॅम्पू देखील वापरू शकता.
- तेलकट केस: ज्याचे केस लगेचच तेलकट होतात त्यांनी त्याच्या केसांची जास्त काळजी घ्यावी. अशा लोकांनी आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस केस धुवावेत. यामुळे तुमच्या केसांची गुणवत्ता सुधारेल. तेलकट केस होणाऱ्या लोकांनी टाळूची काळजी न घेतल्यास केस गळती, कोंडा होणे, तसंच त्वचा अधिक कोरडी होणे आणि केस दुभंगणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून त्यांनी केसांची काळजी जास्त घ्यावी.

- कोरडे केस किंवा कुरळे केस: ज्या लोकांचे केस खूप कोरडे आणि कुरळे आहेत त्यांनी केसांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. तसंच त्यांनी आठवड्यातून एक किंवा दोनदा किंवा त्या पेक्षा जास्त वेळा केस धुवावेत. तसंच कुरडे केस असणाऱ्यांनी डोक्यावरील त्वचेवर कंडिशनर लावू नये. कंडिशनर करण्यासाठी केस आधी कोमट पाण्याने धुवावीत.

- पातळ केस: ज्या लोकांचे केस पातळ आहेत त्यांनी दर दुसऱ्या दिवशी केस धुवावेत. तसंच आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू करू करावं. कारण पातळ केसांमध्ये घाण आणि तेल जास्त दिसते. त्यामुळे अशा लोकांनी केसांची अधिक काळजी घ्यावी.
- जाड किंवा खडबडीत केस: ज्यांचे केस खूप जाड आहेत त्यांनी आठवड्यातून एकदा केस धुवावेत. जेणेकरून त्यांची टाळू ओलसर राहील. मात्र, त्यांच्यासाठी मॉइश्चरायझेशनची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून, केसांना मास्क लावणे किंवा तेल लावणे यासारख्या पद्धती वापरून पाहिल्या पाहिजेत.
- फ्रिजी हेअर: ज्या लोकांचे केस फ्रिजी आहेत त्यांना हेअरची काळजी घेणे कठीण असते. फ्रिजी हेअरचे कलर, केमिकल ट्रीटमेंटमुळे नुकसान होते. अशा व्यक्तींनी शॅम्पू केल्यास केसांचे क्युटिकल्स कोरडे पडण्याची दाट शक्यता असते. यामुळे या लोकांनी आठवड्यातून 2 ते 3 वेळा नॅचरल पोषक तत्त्व असलेल्या शॅम्पूने केस धुवावेत. तसंच केस धुतल्याव हेअर ड्रायरने केस कोरडे करणे टाळावं.

- वेव्ही हेअर: वेव्ही हेअर असलेल्या लोकांनी आठवड्यातून तीनदा शॅम्पू करावं. तसंच या व्यक्तींनी तेल लावून केस धुणे टाळावं. कारण केसांना तेल लावून धुतल्यास कर्ल्स खराब होतात. त्याचबरोबर अशा व्यक्तीनी कधीही ओल्या केसांना कंगवा करू नये. केसांमधील गुंता बोटांनी सोडवावा.
- तुमच्या केसांच्या गुणवत्तेची काळजी घ्या
- आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत हे व्यक्तीपरत्वे बदलते. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपल्या केसांची गरजेनुसार काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवावेत असे आवश्यक नाही. म्हणून, जेव्हाही तुम्ही केस धुता किंवा शाम्पू वापरता तेव्हा ते तुमच्या केसांच्या गुणवत्तेनुसार करा. तरच तुम्हाला निरोगी केस मिळू शकतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा |