health benefits of watermelon: उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूज हा एक चांगला पर्याय मानला जातो. हे असे फळ आहे ज्यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते. टरबूज पाण्यासोबतच शरीरातील विविध खनिजांची कमतरता पूर्ण करू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच, उन्हाळ्यात विविध पेयांमध्ये टरबूज देखील लोकप्रिय आहे. पोषणतज्ञ म्हणतात की कोणत्याही ऋतूत फळे खाणे चांगले असते. मात्र, इतर फळांच्या तुलनेत टरबूजाचे फायदे काहीसे जास्त आहेत. तीव्र उष्णतेमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी टरबूजचा रस परिपूर्ण आहे. टरबूजमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, बी6 आणि पोटॅशियम असते. तसंच त्यात लाइकोपीन नावाचा अँटीऑक्सिडंट देखील असतो, जो शरीराचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून बचाव करतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की, त्यात पोटॅशियम, रिबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, जस्त, फायबर, नियासिन, लोह, जीवनसत्त्वे अ, ब, क आणि लायकोपिन सारखे अनेक पोषक घटक असतात. हे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यासाठी टरबूज हे एक उत्तम औषध आहे. ते खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय इतर अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे फायदे आणि ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

- डिहायड्रेशन रोखते: टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. हे सर्वांना माहिती आहे. तसंच हे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. डिहायड्रेशनपासून संरक्षण करण्यासोबतच ते शरीराला थंड ठेवते. उन्हाळ्यात टरबूज तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवा.
- पचनक्रिया चांगली राहते: टरबूज खाल्ल्याने पोट भरते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवते. तसंच पचनक्रिया नियंत्रित ठेवते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते आणि पोट हलके राहते. उन्हाळ्यातील जड जेवणानंतर काही टरबूजाचे तुकडे खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.
- वजन कमी करण्यास मदत करते: वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी टरबूज हा एक उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.
- त्वचा उजळवते: टरबूजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते त्वचा उजळवण्यास मदत करते. हे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करते. तसंच यात व्हिटॅमिन अ, बी6 आणि क पुरेशा प्रमाणात आढळतात. जे त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
- हृदय निरोगी ठेवते: टरबूजमध्ये लायकोपिन नावाचा घटक असतो, जो हृदयरोगापासून बचाव करण्यास मदत करतो. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. रक्तदाब संतुलित ठेवते.
- डोळ्याचे आरोग्य सुधारते: टरबूजामध्ये असलेल्या लायकोपिन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. नियमित टरबूज खाल्ल्यास तुमचे डोळे तीक्ष्ण राहण्यास मदत होते. तसंच यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे दृष्टी कमकुवत होण्याचा धोकाही कमी होतो.
- रोगप्रतिकार शक्ती मजबूत: रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी टरबूज फायदेशीर आहे. कारण यात व्हिटॅमिन सीची मात्रा मुबलक प्रमामात असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसंच हे शरीराला संसर्ग आणि रोगांशी लढण्यात देखील मदत करते.
- मूत्रपिंडाच्या आरोग्यास लाभदायक: टरबूजामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते. जे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत करते. तसंच यातील उच्च पाण्याचे प्रमाण निरोगी लघवीला प्रोत्साहन देते. ज्यामुळे किडनीस्टोनचा धोका कमी होतो. उन्हाळ्याच्या कडक उन्हात टरबूज खाणं तुमच्या मूत्रपिंडांना लाभदायक ठेवण्याचा एक नैसर्गिक मार्ग असू शकते.
- कोणत्या लोकांनी टरबूज खावू नये
- मधुमेह असलेल्या लोकांनी टरबूजाचं सेवन कमी करावं.
- अॅसिडिटीची समस्या असलेल्यांनी टरबूज खाताना काळजी घ्यावी.
- मूत्रपिंडाच्या रुग्णांनी अतिप्रमाणात टरबूज खावू नये.
- तस सर्दी झालेल्यांनी टरबूज कमी खावं.
- टरबूज खाण्याची सर्वोत्तम वेळ
टरबूजाचं सेवन सकाळी 10 ते 12 च्या दरम्यानं करावं कारण यावेळी शरीराला हायड्रेशनची आवश्यकता जास्त असते. तसंच टरबूज रिकाम्या पोटी खावू नये. त्याचं सेवन कधीही नाश्त्यानंतर करावं.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4464475/