health benefits of Ice Apple: उन्हाळा सुरु झाल्यास आपण आंबे, टरबूज, जांभूळ तसंच फणसाचे गरे आवर्जून खातो. परंतु उन्हाळ्यात मिळणारे आइस अॅप्पल म्हणजेच ताडगोळे तुम्ही खाले आहे काय? आरोग्याच्या दृष्टीने ताडगोळे अमृत आहे. हे अतिशय रसदार आणि मऊ असतात. याची चव नारळातील पाण्यासारखीच असते. तज्ञांच्या मते, ताडफळ अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. यामुळे त्याच्या सेवनानं आरोग्यविषयक अनेक फायदे होवू शकतात.
ताडगोळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी हे चांगलं आहे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येते तसंच यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसंच यातील फायबर पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात. (रिपोर्टसाठी येथे क्लिक करा) यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने, मधुमेहींसाठी वरदान म्हणता येईल. तसंच वजन कमी करणाऱ्यांसाठी हे उत्तम आहे. ताडगोळ्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यातील पोटॅशियम यकृताशी संबंधित विकार कमी करते.
संशोधन काय म्हणतो: संशोधनातून असे दिसून आले आहे, की ताडगोळ्यामध्ये अँथोसायनिन्ससारखे फायटोकेमिकल्स असतात. जे विविध प्रकारच्या ट्यूमर आणि स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. हे फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने कर्करोगापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. "नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन" या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2018 च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक ताडगोळे खातात त्यांन पोटाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसंच ताडगोळ्यामध्ये दाहक-विरोधी, जीवाणूरोधी, कर्करोग-विरोधी आणि मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात.
- गर्भवती महिलांना ताडगोळे घेण्याची शिफारस डॉक्टर करतात. तज्ञांच्या मते, यामुळे पचनक्रिया सुरळीत होते तसंच बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तासारख्या आरोग्य समस्या टाळल्या जातात. बरेच लोक ताडगोळ्यांची तपकिरी त्वचा फेकून देतात. मात्र, त्याच्या सालीमध्येच अनेक पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी चांगले असल्याचे म्हटले जाते.
- उन्हाळ्यात काही लोकांच्या चेहऱ्यावर येणारे लहान मुरुमांसारखे अडथळे ताडगोळे खावून टाळता येते.
- शरीराला आवश्यक असलेले खनिजे आणि साखरेचे प्रमाण संतुलित करते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/37493014/
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8533271/#sec1-biology-10-01028