ETV Bharat / health-and-lifestyle

कर्करोगापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत 'लहान वेलची' आहे सर्वोत्तम; वेलची खाण्याचे फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क - BENEFITS OF CARDAMOM

आपल्या स्वयंपाकघरातील वेलची या लहान पदार्थामध्ये आरोग्यविषयक अनेक फायदे दळलेले आहेत. याच्या नियमित सेवनाने मानवी शरीर तंदुरुस्त राहते. वाचा सविस्तर..,

CARDAMOM FOR WEIGHT LOSS  HEALTH BENEFITS CARDAMOM  CAN I EAT 2 CARDAMOM DAILY  BENEFITS OF CARDAMOM
वेलची खाण्याचे फायदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : May 20, 2025 at 11:30 AM IST

3 Min Read

Cardamom For Weight Loss: भारतीय स्वयंपाक घरात मसाल्यांना अधिक महत्व आहे. मसाला जेवणाची चवच वाढवत नाहीत तर त्यात अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म दळलेले आहेत. मसाल्यांमधील अनेक घटक अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये विविध प्रकारे मसाले वापरले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका मसाल्याच्या पदार्थाबाबत माहिली घेऊन आलोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण वेलचीसाठी अगदी योग्य आहे. कारण वेलची चहा, मिठाई आणि जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरी जाते. दिसायला लहान असलेली वेलची अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

CARDAMOM FOR WEIGHT LOSS  HEALTH BENEFITS CARDAMOM  CAN I EAT 2 CARDAMOM DAILY  BENEFITS OF CARDAMOM
वेलची खाण्याचे फायदे (Getty Images)

काही लोकांना पित्ताची समस्या उद्भवते. तसंच त्यांना अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे खोकला देखील येतो. काही लोक अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही, तर काही लोक तोंडाच्या दुर्गंधीमुळे परेशान असतात. अनेक लोक तर लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण वेलची करू शकते. नियमित वेलची खाल्ल्लायनं या समस्या तर दूर होतात शिवाय सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वेलची फायदेशीर आहे. चला तर पाहूया वेलची खाण्याचे फायदे.

  • श्वसन समस्या: वेलचीमधील दाहक विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म श्वसनाचे आजार कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्याचे कफनाशक गुणधर्म श्लेष्माचा चिकटपणा कमी करतात आणि ते अधिक सहजपणे बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे खोकला, सर्दी किंवा ब्राँकायटिस सारखे आजार दूर करण्यास मदत होते.
  • तोंडाचे आरोग्य सुधारते: वेलचीमधील अँटीमायक्रोबियल गुणधर्म तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं स्पष्ट करण्यात आलं की, त्यातील सिनेओल हा पदार्थ तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो आणि इतर संसर्ग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांशी लढतो. यामुळे हिरड्यांचे आरोग्य सुधारते. अल्सरची समस्या दूर करण्यासाठी देखील वेलची फायदेशीर आहे.
  • पचन सुधारते: तज्ञांचं म्हणणं आहे की, रात्रीच्या जेवणानंतर वेलची खाल्ल्याने पाचक एंजाइमचे उत्पादन वाढते. त्याशिवाय वेलची पचन सुधारते आणि पोटफुगी, गॅस, आम्लपित्त, अपचन समस्या कमी करते असं म्हटलं जातं. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी देखील वेलची फायदेशीर आहे. वेलची पोटासंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी उत्तम आहे.

वेलची खाण्याचे फायदे (NIH)
  • कर्करोग कमी करणे: वेलची कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी देखील प्रभावी असल्याचं तज्ञांचं म्हणणे आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार वेलचीमधील अँटिऑक्सिडंट, अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता आहे.
  • रक्तदाब कमी करते: वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात असं तज्ञ सांगतात. वेलचीमधील पोषक तत्वांमुळे लघवी वाढते. यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकले जाते. परिणामी रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
  • झोप सुधारते: वेलची तणाव आणि चिंता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. वयक्तीक तणाव आणि चिंतेपासून दूर राहिल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपेच्या अभावामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर वेलची खाणं चांगलं आहे.
  • साखरेची पातळी: तज्ञांनुसार, मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांना व्यक्तीसाठी वेलची फायदेशीर आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार वेचलीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. असंही म्हटलं जातं की, हे खाल्ल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी नियमितपणे वेलची खाणे फायदेशीर आहे.
  • हृदयाचे आरोग्य: वेलची केवळ रक्तदाब कमी करत नाही तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. असंही म्हटलं जातं की, वेलची भूक नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी तिचे सेवन फायदेशीर आहे.
  • त्वचेच्या आरोग्यासाठी: तज्ञांचं म्हणणं आहे की वेलचीचे नियमित सेवन केल्याने केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नाही तर सौंदर्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे होतात. वेलची अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. तसंच वृद्धत्वाचे स्वरूप कमी करेत आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून देखील संरक्षण करते. तसंच वेलची खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेच्या पेशींना पोषक तत्वे आणि ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.